अजित पवारांनी केला गेम! अर्थसंकल्पात तब्बल 57 टक्के निधी राष्ट्रवादीच्या खात्याला; शिवसेनेला केवळ 16 तर कॉंग्रेसला..

0

अर्थसंकल्पीय अधिवेशनात  Maharashtra Budget 2022 नुकताच महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. अजित पवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा पाच लाख 48 हजार 777 हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आहे. शेती, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण, उद्योग असा हा पंचसूत्री अर्थसंकल्प असल्याचं अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले. त्याचबरोबर हा अर्थसंकल्प येणाऱ्या काळात महाराष्ट्राचा कायापालट करणारा ठरणार असल्याचे अजित पवार यांनी म्हंटलं. मात्र अजित पवार यांनी हा अर्थसंकल्प सादर करताना सहयोगी दोन्ही पक्षांवर मोठी खेळी केली असल्याचं आता पाहायला मिळत आहे.

समान किमान या कार्यक्रमावर महाराष्ट्रात काँग्रेस,शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन वेगवेगळ्या विचारधारेचे पक्ष एकत्र येत महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आलं. भारतीय जनता पार्टीने सर्वाधिक 105 जागा जिंकून देखील त्यांना विरोधी पक्षात बसावं लागलं. आणि तेव्हापासून शिवसेना आणि भाजप हा वाद विकोपाला गेल्याचं वेळोवेळी दिसून येऊ लागलं. विधानसभा निवडणूक शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी एकत्र लढली, मात्र निकालानंतर शिवसेनेने आपली वेगळी भूमिका घेतल्याने, भारतीय जनता पार्टीला विरोधी बाकावर बसावे लागले.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेता म्हणून विरोधी बाकावर बसावे लागले. देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षाच्याची सूत्रे हातात घेतल्यानंतर, महाविकास आघाडीवर वेळोवेळी हल्ला करण्याची एकही संधी सोडली नाही. एवढेच नाहीतर भारतीय जनता पार्टीचे अनेक बडे नेते महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याच्या वेगवेगळ्या तारखा देखील देत असल्याचे दिसून आले. विरोधी पक्षाने केलेल्या या आरोपाला उत्तर देताना महाविकास आघाडीचे नेते हे सरकार पाच वर्षे अजिबात कोसळणार नसल्याचं बोलताना पाहायला मिळतात. जोपर्यंत मॅजिक फिगर आमच्याकडे आहे, तोपर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारचा धोका नसल्याचे सांगण्यात येतं.

या तिन्हीं पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडून सातत्याने केला जातो, गेल्या काही महिन्यांपूर्वी या सरकारमध्ये काँग्रेस एकाकी पडल्याचे देखील पाहायला मिळालं होतं. काँग्रेस सरकारमधून बाहेर पडण्याच्या चर्चा देखील रंगल्या होत्या. मात्र आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनावरून पुन्हा एकदा हे सरकार समान किमान कार्यक्रमावर काम करत नसल्याचं, देवेंद्र फडणवीस यांनी समोर आणून दिलं आहे. हा अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार यांनी सर्वाधिक पैसे राष्ट्रवादीकडे खाती असणाऱ्या खात्यांना दिले असल्याची आकडेवारी जाहीर केली.

अजित पवार यांनी हा अर्थसंकल्प सादर करताना तब्बल 57 टक्के निधी आपल्या पक्षाकडे जी खाती आहेत, त्याच खात्यांना दिला. या संदर्भातली आकडेवारी जाहीर करताना देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्या पक्षाला किती निधी मिळाल, याचा लेखाजोखा अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सभागृहात मांडला. मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे असून देखील, या अर्थसंकल्पात शिवसेनेच्या वाट्याला फक्त केवळ 16 टक्के निधी आल्याचं त्यांनी सांगितल्यानंतर, अजित पवार यांच्या कपाळाच्या आट्या पाहण्यासारख्या झाल्या होत्या.

अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेला 2022/23 चा अर्थसंकल्प हा पाच लाख 48 हजार 777 हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आहे. या पाच लाख 48 हजार 777 हजार कोटी रुपयांपैकी राष्ट्रवादीकडे जी खाती आहेत, त्या खात्यांना तब्बल 3 लाख 48 हजार 820 कोटी रुपयांची तरतूद अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना केली आहे. त्याच बरोबर काँग्रेसकडे जी खाती आहेत, त्या खात्यांना 1 लाख 44 हजार 993 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आणि ज्यांच्यामुळे सरकार स्थापन झाले, त्या शिवसेनेला मात्र सर्वात कमी निधी देण्यात आला आहे. शिवसेनेनेच्या खात्यांना अवघे 90 हजार 81 कोटी निधी मिळाला आहे.

एकूण निधी वाटपापैकी राष्ट्रवादीला सर्वात जास्त 57 टक्के, काँग्रेसला 26 टक्के, तर शिवसेनेला केवळ 16 टक्के निधी या अर्थसंकल्पात देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ज्या विभागाला सर्वात जास्त पैसे वाटायचे असतात, ती खाती काँग्रेस आणि शिवसेनेकडे आहेत. शिक्षण विभाग आणि उच्च शिक्षण विभाग या विभागाला सर्वात जास्त पैसे वाटायला लागतात. ही दोन्ही खाती काँग्रेस आणि शिवसेनेकडे आहेत. देवेंद्र फडणीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही गोष्ट लक्षात आणून देताच, संपूर्ण सभागृह शांत झाल्याचं पाहायला मिळालं.

हे देखील वाचा ‘या’ पद्धतीने मार्चमध्ये केवळ दोनच भाज्या करा, आणि लाखो रुपये कमवा..

माणुसकीला काळीमा फासणारी घटना! तरुणांच्या टोळक्याने भररस्त्यात तरुणीसोब केले अश्लील घाणेरडं कृत्य; व्हिडिओ व्हायरल..

Maharashtra Budget 2022:* *अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी २३ हजार कोटींची तरतूद; वाचा कोणत्या योजनेतून काय काय मिळणार..

 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.