Xiaomi: चा पुन्हा धमाका! 6GB रॅम 128GB स्टोरेज, 50MP कॅमेरा असणारा फोन केवळ दहा हजारांत; पहा कुठे सुरू आहे सेल…

0

Xiaomi redmi10: या कंपनीने अनेक स्मार्टफोन (smartphone) कंपन्यांचा बाजार उठवला आहे. जेव्हापासून कंपनी मार्केटमध्ये आली, तेव्हापासून अनेक कंपन्यांना आपल्या प्रॉडक्टवरच्या किमती कमी कराव्या लागल्या. कमी किंमतीत जबरदस्त फीचरसह, आकर्षक फोन अशी ओळख निर्माण करणाऱ्या xiaomi ने आता पुन्हा एकदा ग्राहकांना उन्हाळ्यात दिवाळी दाखवली आहे. xiaomi आपला नवीन ब्रँड redmi 10 हा बाजारात उपलब्ध केला असून, हा फोन केवळ दहा हजार रुपयांत मिळत असल्याने, ग्राहकांची मोठी झुंबड पडली आहे.

Xiaomi च्या Redmi 10 या स्मार्टफोनचा सेल सुरु झाला असून, हा स्मार्टफोन ग्राहकांना दहा हजार रुपयांत खरेदी करता येणार आहे. हा फोन फ्लिपकार्ट, mi.com आणि रिटेल स्टोअर्सवरून देखील ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. कॅमेरा फोनसाठी ओळखल्या जाणाऱ्या Xiaomi ने या फोनमध्ये देखील जबरदस्त कॅमेरा ऍड केला आहे. या फोनमध्ये ग्राहकांना तब्बल 50MP कॅमेरा मिळणार आहे. विशेष म्हणजे या फोनला वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे.

अधिक संरक्षणासाठी Xiaomi ने या फोनला अतिरिक्त संरक्षण प्रदान केलं आहे. या फोनमध्ये ग्राहकांना गोरिला ग्लासचे ३ स्क्रीन प्रोटेक्टर देण्यात येणार आहेत. अनेकांना बॅटरीची चिंता असते, मात्र या फोलला तब्बल 6,000mAh बॅटरी प्रदान केली आहे. तसेच 18W चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे. यामुळे तुमचा मोबाईल काही मिनिटांतच फुल चार्ज होणार आहे. हा फोन तुम्ही Flipkart वरून खरेदी केल्यास, तुम्हाला आकर्षक ऑफर देखील मिळणार आहेत.

शाओमीने हा फोन लाँच करताना फीचर्स बरोबर याची आकर्षकता देखील जोपासली आहे. हा फोन विविध रंगांमध्ये ग्राहकांना युज करता येणार आहे. तब्बल तीन रंगांमध्ये हा फोन ग्राहकांना मिळणार आहे. या तीन रंगांमध्ये कॅरिबियन ग्रीन, मिडनाईट ब्लॅक आणि पॅसिफिक ब्लू अशा रंगांचा समावेश असणार आहे. त्यामुळे आता या फोनकडे असंख्य ग्राहक आकर्षित होताना पाहायला मिळत आहेत.

कमी किंमतीत कुठे मिळणार

या फोनच्या किंमतीचा विचार करायचा झाला तर, या फोनच्या किंमती दहा हजारापासून सुरू होणार आहेत. या फोनच्या बेसिक व्हेरिएंटची किंमत कंपनीने दहा हजार ठेवली आहे. दहा हजार रुपयात तुम्हाला 4GB RAM + 64GB स्टोरेज असणारा स्मार्टफोन मिळणार आहे. ज्या ग्राहकांना अतिरिक्त स्टोरेज हवं असेल, अशा ग्राहकांसाठी देखील कंपनीने 6GB + 128GB व्हेरिएंटचा फोन उपलब्ध केला आहे. या फोनची किंमत साधारण 13 हजाराच्या आसपास असणार आहे.

Xiaomi redmi10 हा फोन तुम्ही Flipkart, Mi.com, Mi Home आणि रिटेलर स्टोअरमधूनही खरेदी करू शकणार आहे. जर तुम्ही हा फोन फ्लिपकार्टद्वारे खरेदी करणार असाल, तर तुम्हाला अतिरिक्त एक हजार रुपयांची सूट देखील मिळणार आहे. Flipkart वरून जर तुम्ही हा फोन एचडीएफसी क्रेडीट कार्ड नुसार खरेदी केला, तर तुम्हाला एक हजार रुपयांची सूट मिळणार आहे

स्‍पेसिफिकेशन आणि फिचर्स

Xiaomi ने redmi10 हा फोन कमालीचा आकर्षक आणि जबरदस्त फीचर्ससह मार्केटमध्ये उतरवला आहे. या फोनच्या कनेक्टिव्हिटी आणि फीचर्सचा विचार करायचा झाल्यास, हा फोन सर्वोत्तम वाटतो. फोनमध्ये तुम्हाला ड्युअल-सिम (नॅनो) तसेच MIUI 13 सह Android 11 द्वारे हा फोन चालतो. शिवाय 20.6:9 रेशो असलेला 6.7-इंचाचा HD+ डिस्प्ले दिला जात आहे. जो एकप्रकारे उत्तम मानला जातो. Redmi 10 या फोनला, 3 लेयरने कॉर्निंग गोरिल्ला ग्लास आली आहे. ज्यामुळे हा फोन अतिरिक्त सुरक्षित मानला जातोय.

या फोनच्या प्रोसेसरचा विचार करायचा झाल्यास, प्रोसेसर देखील या फोनचा उत्तम आहे. या फोनला ऑक्टाकोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 SoC चिपसेट देण्यात आली आहे. तसेच या फोनचा अतिरिक्त टू जीबी रॅम देखील वाढवण्याची सोय करण्यात आली आहे. Redmi 10 या फोनच्या बॅटरी विषयी बोलायचं झालं, तर या फोनची बॅटरी तब्बल 6,000mAh ची आहे. शिवाय 18W चार्जिंग सपोर्ट देखील दिला जात असल्याने, तुमचा मोबाईल काही मिनिटांतच फुल चार्ज होणार आहे.

Redmi 10 च्या फिचर्सबद्दल बोलायचं म्हटलं तर, 4G LTE, Wi-Fi 802.11ac, ब्लूटूथ, GPS, USB टाइप-C आणि 3.5mm हेडफोन अशा जबरदस्त कनेक्टिविटीसह हा फोन कंपनीने सादर केला आहे. तसेच बोर्डवर अॅम्बियंट लाइट, प्रॉक्सिमिटी एक्सीलरोमीटर सारखे सेन्सर देखील देण्यात आले आहेत.

हे देखील वाचा या’ दहा 5G स्मार्टफोनने गाजवलंय मार्केट! ‘यापैकी’ तुम्ही कोणताही फोन खरेदी करू शकता; दमदार कॅमेऱ्यासह भन्नाट फिचर्स, किंमत केवळ..

E-gram swaraj: ‘असा’ चेक करा ग्रामपंचायतीला आलेला निधी,आणि उठवा सरपंचाचा बाजार..

PM Yojna: ‘या’ योजनेअंतर्गत मिळतेय मोफत शिलाई मशीन; कसा करायचा अॉनलाईन अर्ज? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत..

Viral Video: चार वाघांना एकटं माकड पुरून उरलं; व्हायरल व्हिडिओ पाहून…

Ration Card Update: रेशनकार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव समाविष्ट करायचंय? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत

या’ दोन वेबसाइट्सनी Amazon आणि Flipkart चा उठवलाय बाजार; निम्म्यापेक्षा कमी किमतीत विकतायत वस्तू…

IPL 2022: आयपीएल पाहण्यासाठी आता Disney+ Hotstar ला रिचार्ज करण्याची गरज नाही; ‘असा’ घ्या लाभ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.