Viral video: चार वाघांना एकटं माकड पुरून उरलं; व्हायरल व्हिडिओ पाहून…

0

वाघ हा खूप शक्तिशाली प्राणी म्हणून ओळखला जातो. वाघाला समोर पाहिल्यानंतर काय करावं अनेकांना सुचत नाही. जंगलातले अनेक प्राणी वाघाला पाहिल्यानंतर पळून जातात. हे कोणालाही वेगळं सांगण्याची आवश्यता नाही. वाघ हा प्रचंड ताकदवान असला, तरी प्रत्येक प्राण्याची एक strength असते. आणि त्याच्याच जीवावर समोरचा कितीही ताकदवान असला, तरी तो त्याला पराभूत करू शकतो. असाच एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला असून, एका माकडाने तब्बल चार वाघांना धोबीपछाड केले आहे.

होय तुम्ही बरोबर ऐकलंय. एका माकडाने तब्बल चार वाघांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. आपल्या ताकदीचा कधीही गर्व न बाळगता, समोरच्याला कमी लेखण्याची चूक आयुष्यात कोणीही करू नये. नाहीतर तुमचा खूप मोठा पचका होऊ शकतो. माकडाने अनेकवेळा वाघाची मजा घेतल्याचे अनेक व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील, मात्र हा व्हायरल झालेला व्हिडिओ पाहिल्यानंतर, तुम्ही या माकडाला सलाम ठोकला.

रामायणात वानर सेनेची ताकद काय असते, हे आपण पाहिलेच आहे. वानर हे बजरंग बलीचं रूप असल्याचं बोललं जातं. अनेक मंदिरांच्या बाहेर वानर असतात, त्यांना भाविक मोठ्या श्रद्धेने नेहमी खायला देत असतात. व्हायरल झालेल्या व्हिडिओत वानराचे धैर्य आणि स्वतःवर असलेला विश्वास पाहून, तुम्हीदेखील वानर हे बजरंग बलीचे रूप असल्याचं मान्य कराल. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ तब्बल चार वाघ माकडाची शिकार करण्यासाठी धडपड करत आहेत. शिकार करणे खूप लांबची गोष्ट आहे, याउलट या माकडाने या चौघांनाही वेड्यात काढले.

  नक्की काय झालं

एका तलावाच्या कडेला छोट्याशा झाडावर माकड बसलं होतं. बरोबर त्या झाडाच्या खाली चार वाघ माकडाची शिकार करण्यासाठी टपले होते. तलावात माकडाच्या हातून पावासारखा पदार्थ पडल्याचं दिसत आहे. आणि म्हणून पदार्थ घेण्यासाठी माकड झाडावरून वाघाच्या अगदी दोन फूट जवळ असणाऱ्या फांदीवर आले. एका वाघाने माकडाची शिकार करण्यासाठी झेप देखील घेतली, मात्र तेवढ्यात माकड उडी मारून दुसऱ्या फांदीवर गेलं.

माकडाने दुसऱ्या फांदीवर उडी मारली, ती फांदी देखील वाघाच्या अगदी दोन अडीच फूट अंतरावरच होती. पावासारखा दिसणारा पदार्थ पाण्यात पडल्याने माकड तो पदार्थ घेण्यासाठी एका हाताने फांदी धरून पायाने पाव आपल्या जवळ आणण्याचा प्रयत्न करु लागलं. हा सगळा प्रकार चारही वाघ उघड्या डोळ्याने पाहत होते, मात्र तरीदेखील या माकडाची शिकार करू शकले नाही. एका वाघाने दुसऱ्या वाघाच्या अंगावर पाय ठेवून, या माकडावर झडप घालण्याचा प्रयत्न करत असताना व्हायरल झालेल्या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. मात्र तरीदेखील माकड या चौघांनाही घाबरलं नाही. आणि अखेर हा पदार्थ ते पाण्यातून बाहेर काढण्यात यशस्वी झालं.

पावासारखा दिसणारा पदार्थ पाण्यातून बाहेर काढून, माकड झाडावर जाऊन बसलं. हा सगळा प्रकार अगदी दोन फूट अंतरावरून चारही वाघ पाहत होते, मात्र ते काहीही करू शकले नाही. आणि आपल्या ताकदीचा प्रचंड घमंड बाळगणार्‍या वाघाचं मांजर झाल्याचे या व्हायरल झालेल्या या व्हिडिओत पाहायला मिळतं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर अनेक भन्नाट कमेंट्सचा केल्या आहेत.

काय म्हणाले नेटकरी

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओला अनेकांनी लाइट्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडल्याचं पाहायला मिळत आहे. एका युजर्सने या व्हिडिओला लाईक करताना म्हंटले आहे, तू असशील कितीही ताकदवान पण मी देखील लंका जाळलीय हे लक्षात ठेव. दुसऱ्या एका युजर्सने थेट पुष्पा चित्रपटातील डायलॉग हाणला आहे. हा युजर्स म्हणाला, माकड समझ के क्या फ्लावर समझा, फ्लावर नहीं फायर है मै।

 यावर क्लिक करून पहा व्हिडिओ..

हे देखील वाचा मुली या वयात मुलांना नेहमी धोका देतात; सर्वेत धक्कादायक सत्य आले समोर, जाणून जाल चक्रावून..

Viral video: रस्त्याने जात असताना म्हताऱ्याचा किडा वळवळला; विनाकारण बैलाला मारली काठी अन्.. पहा व्हायरल व्हिडि…

डोळ्यात पाणी आणणारा व्हिडिओ; माकडाच्या तोंडात तोंड घालून टॅक्सी चालकानं वाचवला जिव, डोळे उघडताच माकडाने मारली मीठी.

Ration Card Update: रेशनकार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव समाविष्ट करायचंय? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.