Smartphone: ‘या’ दहा 5G स्मार्टफोनने गाजवलंय मार्केट! ‘यापैकी’ तुम्ही कोणताही फोन खरेदी करू शकता; दमदार कॅमेऱ्यासह भन्नाट फिचर्स, किंमत केवळ..

5GSmartphone: डिजिटल युगात स्मार्टफोनची प्रत्येकाला गरज निर्माण झाली आहे. स्मार्टफोनमुळे अनेकांना रोजगार देखील मिळाला आहे. स्मार्टफोनच्या जीवावर अनेक जण लाखो रुपये कमवत असल्याची अनेक उदाहरणे आपल्या अवतीभवती पाहायला मिळतील.  स्मार्टफोन (smartphone)  हा प्रत्येकाच्या जीवनातला अविभाज्य घटक बनला आहे. स्मार्टफोन अनेकांची गरज असल्यामुळे, आम्ही देखील तुम्हाला आज अशा दहा स्मार्टफोन विषयी सांगणार आहोत,  ज्यांचं बजेट तुम्हाला परवडणारं तर आहेच, पण फिचर्स देखील भन्नाट, सोबत कॅमेरा देखील दमदार असणार आहे.

                          iQOO Z6

iQOO Z6 हा स्मार्टफोन नुकताच लाँच झालाय. जर तुम्ही स्मार्टफोनच्या शोधात असाल आणि तुम्हाला जबरदस्त बॅटरी सोबत उत्तम कॅमेरा सर्वोत्तम प्रोसेसर या सगळ्या गोष्टी कमी किमतीत हव्या असतील, तर तुम्ही या फोनला परचेस करू शकता. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 SoC मिळणार आहे. जो बिल्ट-इन 5G मॉडेमसह देण्यात येतो. सोबतच तुम्हाला या फोनचा रॅम हा तब्बल 8GB मिळणार आहे.

अनेकांना बॅटरी बॅकअपची चिंता असते, मात्र या फोनला 120Hz रिफ्रेश रेट आणि तब्बल 5000mAh ची बॅटरी देखील देण्यात आली आहे. त्यामुळे या फोनचा बॅटरी बॅअप कमालीचा असणार आहे. अनेकजण स्मार्टफोन खरेदी करताना कॅमेऱ्याचा विचार हा करतोच. परंतु या फोनमध्ये तुम्हाला कॅमेरा निराश करणार नाही. या फोनचा कॅमेरा हा 50MP + 8MP + 2MP ट्रिपल रियर कॅमेरा असणार आहे. विशेष म्हणजे एवढे जबरदस्त फिचर्स असूनही या फोनची किंमत फक्त 14,999 रुपये आहे.

                     Realme 9 5G:

Realme 9 5G: हा फोन देखील तुमच्या बजेटमध्ये मिळणार असून, या फोनने देखील बाजारात धुमाकूळ घातला आहे. हा  स्मार्टफोन मीडियाटेक डायमेन्सिटी 810 चिपसेटसह मार्केटमध्ये आला आहे. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 90Hz रिफ्रेश रेटसह डिस्प्ले मिळणार आहे. तसेच 18W फास्ट चार्जिंगसह याची देखील बॅटरी मोठी देण्यात आली आहे. जर तुम्ही घाई गडबडीत असाल, आणि तुमचा फोन चार्जिंग नसेल, तर तुम्ही पाच दहा मिनिटे चार्जिंग लावून देखील भरपूर चार्जिंग करू शकता.

या फोनच्या कॅमेराने सर्वांना वेड लावले आहे. या फोनमध्ये तुम्हाला 48MP + 2MP आणि 2MP सेन्सर असलेला ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही रिल्स बनवणार असाल, तर हा फोन देखील तुम्हाला निराश करणार नाही. हा  ड्युअल सिम 5G सपोर्टसह येतो.  Realme 9 5G या स्मार्टफोनची किंमत केवळ 14,999 रुपये आहे.

                          Vivo T1

जसं की तुम्हाला माहिती आहे, विवोचे सगळेच फोन आकर्षकतेसाठी आणि कॅमेरासाठी ओळखले जातात. Vivo T1 मध्येही तुम्हाला उत्तम प्रोसेसर मिळणार आहे. हा फोन तुम्हाला Snapdragon 695 SoC, 120Hz रिफ्रेश रेटसह मिळणार आहे. या फोनचा कॅमेरा जबरदस्त असणार आहे. तब्बल 50MP + 8MP + 2MP ट्रिपल रियर कॅमेरा, सेटअपसह हा फोन तुम्हाला मिळणार आहे.

सोबतच या फोनचा सेल्फी देखील लाजवाब येणार आहे. या फोनचा 16MP फ्रंट कॅमेरा असणार आहे. तसेच याची बॅटरी देखील उत्तम आहे. तब्बल 5,000mAh ची बॅटरी या फोनला देण्यात आली आहे.  या फोनची किंमत देखील तुमच्या बजेटमध्ये ठेवण्यात आली आहे. हा फोन तुम्हाला केवळ  15,990 रुपयाला मिळणार आहे.

                       Realme 9 Pro

अलीकडे Realme 9 Pro या फोनने देखील मार्केट चांगलंच गाजवल्याचं पाहायला मिळतं.  यापूर्वी देखील आपले अनेक ब्रँड बाजारात आणून, ग्राहकांना आकर्षित करण्याचे काम या ब्रँडनं केलं आहे. हा फोन देखील तुमच्या बजेटमध्ये मिळणार असून, या फोनचे फिचर्स देखील भन्नाट आहेत. 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजचा फोन तुम्हाला मिळतो. या फोनच्या कॅमेराचा विचार केला तर, याचा कॅमेरा सर्वोत्कृष्ट आहे. तब्बल 64MP + 8MP + 2MP ट्रिपल कॅमेरा सेटअपसह हा फोन येतो. याचा प्रोसेसर देखील कमालीचा आहे. स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटसह हा फोन ग्राहकांना मिळणार आहे. या फोनची किंमत 17,999 रुपये असणार आहे.

                    POCO M4 Pro 5G

POCO M4 Pro 5G या  फोनने देखील ग्राहकांचे मन जिंकण्यात यश संपादन केले आहे. हा फोन तुम्हाला 19 हजार रुपयांच्या आसपास मिळत असला तरी, या फोनचे फिचर्स खूप दमदार आहेत. POCO M4 Pro 5G या मध्ये तुम्हाला मीडियाटेक डिमेन्सिटी 810 चिपसेट मिळतो. जो एक शानदार आहे. सोबतच तुम्हाला 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे.  या फोनचा कॅमेरा देखील जबरदस्त आहे. 50MP + 8MP चा ड्युअल कॅमेरा सेटअप तुम्हाला मिळतो. 6.6 इंचाचा 90Hz रिफ्रेश रेट असलेला एलसीडी डिस्प्ले देखील तुम्हाला मिळणार आहे. या फोनची बॅटरी दमदार आहे. या फोनला 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

                      Moto G71 5G

Moto G71 5G हा फोन देखील ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. या फोनमध्ये देखील तुम्ही डोळे झाकून इन्व्हेस्ट करू शकता. या फोनमध्ये तुम्हाला नॅपड्रॅगन 695 चिपसेट मिळते. जी सर्वोत्कृष्ट मानली जाते. तसेच या फोनचा कॅमेरा देखील दमदार आहे. या फोनला 16MP  फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तर याचा मेन कॅमेरा 50MP + 8MP + 2MP च्या ट्रिपल कॅमेरा, सेटअपसह मिळणार आहे. याची बॅटरी देखील दमदार आहे. तब्बल 5,000mAhची बॅटरी या फोनला देण्यात आली आहे. Moto G71 5G हा फोन एकोणीस हजार रुपयांना मिळणार आहे.

                  Samsung Galaxy F23

Samsung Galaxy F23  फोनकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित झाले आहेत. एकेकाळी सॅमसंग स्मार्टफोनचा रेडमीने बाजार उठवला होता, मात्र काळानुसार आपल्या प्रॉडक्टमध्ये बदल करत सॅमसंगने, पुन्हा एकदा ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित केले आहे. Samsung Galaxy F23  या फोनचा Snapdragon 750G SoC 6GB RAM आणि 128GB स्टोरेजसह ग्राहकांना मिळणार आहे.
फोटोग्राफीसाठी हा फोन जबरदस्त मानला जात आहे. या फोनमध्ये तुम्हाला तब्बल 50MP + 8MP + 2MP ट्रिपल कॅमेरा-सेटअप मिळणार आहे. या फोनची किंमत 19,999 रुपये असणार आहे.

                Realme 9 5G SE

Realme 9 5G SE या फोनचा स्नॅपड्रॅगन 778G चिपसेट असणार आहे. जी दमदार मानली जाते. तसेच 90Hz रिफ्रेश रेट, देखील या फोनला दिला आहे. या फोनचा कॅमेरा देखील उत्तम असणार आहे. हा फोन 48MP + 2MP आणि 2MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. या फोनची किंमत वीस हजर असणार आहे.

                     Infinix Zero 5G

Infinix Zero 5G या फोनला  120Hz रिफ्रेश रेट, मीडियाटेक डिमेन्सिटी 900 चिपसेट देण्यात आली आहे. जी खूप दमदार मानली जाते. तसेच याची बॅटरी देखील दमदार आहे. या फोनची बॅटरी 5,000mAh ची देण्यात आली आहे. 33W फास्ट चार्जिंग आणि 48MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देखील या फोनला देण्यात आला आहे. या फोनची किंमत देखील वीस हजार असणार आहे.

                 Redmi Note 11 Pro+ 5G

‌वरील सर्व फोनमध्ये ग्राहकांच्या सर्वाधिक पसंतीस उतरलेला फोन Redmi Note 11 Pro+ 5G  हा आहे. हा फोन कमालीचा आकर्षक असून याचे फीचर्स देखील सर्वोत्कृष्ट आहेत. या फोनला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 5G चिपसेट मिळते. जी जबरदस्त मानली जाते.  सोबतच या फोनला 8GB रॅम आणि १२८ jb स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच या फोनचा कॅमेरा हा तब्बल 108MP  ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्याचा दमदार स्पेक्स ग्राहकांना पाहायला मिळणार आहे. याची किंमत एकवीस हजार असणार आहे.

हे देखील वाचा ‘या’ दोन वेबसाइट्सनी Amazon आणि Flipkart चा उठवलाय बाजार; निम्म्यापेक्षा कमी किमतीत विकतायत वस्तू….

 E-gram swaraj: ‘असा’ चेक करा ग्रामपंचायतीला आलेला निधी,आणि उठवा सरपंचाचा बाजार..

वीस वर्षाच्या कोवळ्या पोराची सहा जणांनी ‘या’ किरकोळ कारणासाठी बोकसून केली ‘ह’ ‘त्या’; घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद..

PM Yojna: ‘या’ योजनेअंतर्गत मिळतेय मोफत शिलाई मशीन; कसा करायचा अॉनलाईन अर्ज? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत..

Viral Video: चार वाघांना एकटं माकड पुरून उरलं; व्हायरल व्हिडिओ पाहून…

मुली या वयात मुलांना नेहमी धोका देतात; सर्वेत धक्कादायक सत्य आले समोर, जाणून जाल चक्रावून…

Viral video: रस्त्याने जात असताना म्हताऱ्याचा किडा वळवळला; विनाकारण बैलाला मारली काठी अन्.. पहा व्हायरल व्हिडि…

डोळ्यात पाणी आणणारा व्हिडिओ; माकडाच्या तोंडात तोंड घालून टॅक्सी चालकानं वाचवला जिव, डोळे उघडताच माकडाने मारली मीठी…

Ration Card Update: रेशनकार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव समाविष्ट करायचंय? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.