Viral video: लेकराला वाचवण्यासाठी आईने दिले बलिदान; आईचं प्रेम दर्शवणारा हृदयस्पर्शी व्हिडीओ एकदा पहाच..

0

Viral video: आई ही जगातली निस्वार्थी प्रेम करणारी एकमेव व्यक्ती आहे. आपल्या लेकरासाठी आई काहीही करू शकते. हे कोणालाही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. मनुष्य असो किंवा प्राणी असो, आईसाठी लेकरू सर्वप्रथम असतं. आई आपल्या लेकरांसाठी काहीही करू शकते, याची अनेक उदाहरणे तुम्ही वाचली, ऐकली असतील. यासंदर्भातलाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. एक हरीण आपल्या जीवाची पर्वा न करता लेकराला मगरीच्या तोंडातून वाचवतानाचा हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर रोज प्राण्यासंदर्भातले. नव-नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओंना यूजर्स देखील चांगलंच पसंत करत असल्याचं पाहायला मिळतं. प्राण्यासंदर्भातले अनेक व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील, कधी काळजाचा थरकाप उडवणारे व्हिडीओ, तर कधी मन हेलावून टाकणारे व्हिडिओ, तर कधी प्राण्यांच्या एकमेकांविषयी असणाऱ्या प्रेमाचे व्हिडिओ नेहमी व्हायरल होत असतात. आता असाच एक आईचं आपल्या लेकरावर किती प्रेम असतं, याचं जिवंत उदाहरण दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

हरिण प्रचंड भित्रं असतं, हे तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल. आपली शिकार करणारऱ्या इतर प्राण्यांना हरणाने पाहिलं तरी हरीण किती घाबरतं, हे आपण अनेक वेळा पाहिलं असेल. मात्र जेव्हा आपल्या लेकरावर संकट येतं, तेव्हा आपल्यातली आई जागी होते, आणि मग ती कोणाशीही दोन हात करायला तयार असते. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ याचीच प्रचिती असून, आपल्या लेकराला वाचवण्यासाठी हरणाने आपल्या जीवाचे बलिदान केल्याचं या व्हिडिओत पाहायला मिळत असून, हा ऋदयस्पर्शी व्हिडिओ पाहून अनेकांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहतील यात शंका नाही.

 काय घडलं नक्की?

आयएएस अधिकारी सोनल गोयल यांनी आपल्या ट्विटरवरून यासंदर्भातला एक व्हिडीओ शेअर केला आहे. हरीण आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाचं बलीदान दिल्याचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओला कॅप्शन देताना त्यांनी म्हटलं आहे, “आईच्या प्रेमाची ताकद, सौंदर्य आणि धैर्याचे शब्दात वर्णन कदापिही करता येऊ शकत नाही”

आपलं लेकरू वाचवायचं असेल तर आपल्याला जीव द्यावा लागेल, हे माहित असताना देखील या आईने आपल्या जिवाची पर्वा न करता बलिदान दिल्याचं या व्हिडिओत पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत एक हरणाचे छोटसं पिल्लू पाण्यातून तलाव ओलांडताना पाहायला मिळत आहे. तेवढ्यात त्या हरणाच्या पिल्लाला लांबून मगर पाहते. आणि हल्ला करायच्या उद्देशाने, या पिल्लाच्या दिशेने जोरदार आक्रमण करते. मात्र ही घटना या पिल्लाची आई असणारी हरीण पाहते. आणि कशाचाही विचार न करता, पाण्यात प्रवेश करते.

आपलं लेकरू आणि मगर या दोघांमधील अंतर खूप कमी राहिले असतानाच, हरीण दोघांच्यामधे जाऊन उभी राहते. आपलं लेकरू आणि मगरीच्यामध्ये हे हरीण उभा राहिल्यानंतर, हरीण आपल्या लेकराला लवकर कड गाठ, असा इशारा करत असल्याचं देखील या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. हरणाचं छोटासा पिल्लू देखील प्रचंड घाबरून जोरजोराने कडेला जाऊन उभं राहतं. मात्र तोपर्यंत त्याची आई मगरीच्या तोंडात असते, हे दृश्य मनाला हादरवून टाकणार असून, डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहतात.

हरणाच छोटेसं पिल्लू, तलावाच्या कडेवर जाऊन, आपली आई मगरीच्या तोंडात आहे, हे डोळ्याने पाहत आहे. मात्र ते हतबल झाल्याचं पाहायला मिळत असून, हे दृश्य पाहून तुमच्या डोळ्यातूनही पाणी आल्याशिवाय राहणार नाही. हा हृदयस्पर्शी व्हिडीओ, सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

काय म्हणाले नेटकरी? 

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली असून, आईच्या प्रेमाचं तोंड भरून कौतुक देखील केलं आहे. एका युजर्सनी या व्हिडिओवर कमेंट करताना म्हटले आहे, ‘आई’ ही आई असत. ते आपल्या लेकरावर किती प्रेम करते, हे शब्दात व्यक्त करणं कोणालाही शक्य नाही. हा व्हिडिओ पाहून, पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. आई जगात सगळ्यात श्रेष्ठ आहे. तर दुसऱ्या एका युजर्सने म्हटलं आहे, स्वामी तिन्हीं जगाचा आईविना भिकारी, का म्हटलं आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.

हे देखील वाचा Viral video: माकडाच्या पिल्लाची आणि पक्षांची अनोखी मैत्री पाहून तुम्हीही व्हाल अवाक्..; व्हिडिओ एकदा पहाच..

Viral video: मगरीने क्षणात हरणाचे तुकडे-तुकडे केले; तुम्हीच पहा काळजाचं पाणी करणारा व्हिडिओ..

Viral video: डब्यात तोंड अडकलेल्या सापाची झालेली केविलवाणी अवस्था तुम्हालाही पाहवणार नाही; एकदा पहाच व्हिडिओ..

यावर क्लिक करून पाहा व्हिडिओ… 

Viral video: स्विमिंग करताना महिलेच्या कानात चक्क खेकडा घुसला; विश्वास नाही ना बसत? मग तुम्हीच पहा व्हिडिओ..

Viral video: दोन वर्षाच्या लहान मुलीचं आणि माकडाचं मोबाईलवरून जबरदस्त भांडण; व्हिडिओ पाहून, तुम्हीही व्हाल लोटपोट..

Viral video: चार वाघांना एकटं माकड पुरून उरलं; व्हायरल व्हिडिओ पाहून..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.