Accelero+: ‘या’ इलेक्ट्रिक दुचाकीने उठवला सगळ्याच टू-व्हीलरचा बाजार; जबरदस्त फीचर्ससह मिळतेय केवळ 50 हजारांत..

0

Accelero+: दिवसेंदिवस इंधनाची विक्रमी दरवाढ होत असल्याने, देशातली जनता त्रस्त आहे. पेट्रोल डिझेलने शंभरी पार केल्याने, आता पेट्रोल डिझेलवर गाडी चालवणं फारच कठीण होऊन बसलं आहे. दिवसेंदिवस इंधनाचे दर वाढत असल्याने, आता फोर-व्हीलर टू-व्हीलर कंपन्यांनी, इलेक्ट्रिक गाड्या मार्केटमध्ये उतरवायला सुरुवात केली. आता या गाड्यांना ग्राहकांकडून देखील चांगली पसंती मिळत असल्याचे, पाहायला मिळत आहे. आता  Automotiveने पुन्हा एकदा आपली नवीन Accelero+ ही इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली असून, ही स्कूटर ग्राहकाच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे.

इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने, भारतामध्ये आता इलेक्ट्रॉनिक वाहनांना मोठी मागणी असल्याचे पाहायला मिळते. सर्वसामान्यांना इंधनावर दुचाकी चालवणं आता परवडणारं राहिलं नाही. त्यामुळे अनेक जण इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करताना पाहायला मिळत आहेत.  बाजारपेठेत इलेक्ट्रिक स्कूटरचे खूप सारे प्रकार उपलब्ध आहेत. अनेक कंपन्यांच्या अनेक इलेक्ट्रिक स्कूटर बाजारपेठेत उपलब्ध असल्याने, याचा खूप मोठा फायदा ग्राहकांना होत आहे.

                 काय आहेत वैशिष्ट्ये?

अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरचा बाजार उठवण्यासाठी आता  NIJ Automotive या कंपनीने बाजारात नवीन Accelero+ ही इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली असून, या इलेक्ट्रिक स्कूटर कडे ग्राहक कमालीचे आकर्षित होत असल्याचे पहायला मिळत आहे. ही स्कूटर ड्युअल एलईडी हेडलॅम्पसह ग्राहकांना मिळणार आहे. सोबतच एलईडी डीआरएल तसेच, बूमरॅंग- एलईडी इंडिकेटरमुळे  ही इलेक्ट्रिक स्कूटर कमालीची आकर्षक दिसत आहे. ग्राहकांना ही स्कूटर ब्लॅक ब्युटी, ग्रे टच, पर्ल व्हाइट तसेच इम्पीरियल रेड या चार आकर्षक कलर्समध्ये मिळणार आहे.

                      फिचर्स

Accelero+ या स्कूटरने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक जबरदस्त फीचर्स दिले आहेत. या स्कूटरमध्ये क्रूझ कंट्रोल यासारखे जबरदस्त फीचर्स दिले गेले आहेत. सोबतच लांब प्रवास करायचा झाल्यास, हे फीचर्स खूप जबरदस्त मानलं जात आहे. इलेक्ट्रिक स्कूटर तब्बल चार बॅटरी कॉन्फिगरेशनमध्ये ग्राहकांना मिळणार आहे.  ज्यात लीड-ऍसिड बॅटरी तसेच 3 LFP बॅटरीचा समावेश असणार आहे. यामध्ये ड्युअल बॅटरी सेटअपसह 1.5 Kw (48V), 1.5 Kw (60V) तसेच 3 Kw 48V LFP अशा जबरदस्त बॅटरींचे पर्याय देण्यात आले आहेत.

                 आकर्षक किंमत

अलीकडच्या काळात ऑटोमोबाईलच्या किंमती भरमसाठ वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र Accelero+ ही स्कूटर ग्राहकांना अगदी बजेटमध्ये मिळणार आहे. या इलेक्ट्रिक स्कूटर च्या किमती 53 हजारापासून एक लाख रुपयांच्या आसपास असणार आहेत. विशेष म्हणजे, ही इलेक्ट्रिक स्कूटर, तब्बल 190 किलोमीटरचा टप्पा गाठू शकणार आहे. Accelero तसेच Accelero+ इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत केवळ 53,000 हजार ते 98,000 हजारांपर्यंत ठेवण्यात आली आहे.  1.5 kW व्हेरिएंटकरीता 69 हजार तसेच 3 kW व्हेरिएंटकरीता 98 हजार रूपरे ठेवण्यात आली आहे.

हे देखील वाचा –Mahindra Thar: महिन्यांत तब्बल ५ हजाराहून अधिक विक्री; का एवढी लोकप्रिय झालीय थार? जाणून घ्या, किंमत,वैशिष्ट्ये, आणि बरंच काही..

Amazon sale: Xiaomi ने आता आयफोनचाही उठवला बाजार; 108MP कॅमेरा,12GB रॅमचा फोन केवळ..

Video: ग्रामपंचायतीचा अजब कारभार! पाणी असूनही पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा नाही; वयोवृद्ध महिलांचा पाण्यासाठी टाहो..

Viral video: झाडावरून नदीत उडी घेत, जग्वारने केली मगरीची शिकार; काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.