Viral video: रानडुकराची शिकार कराय गेली वाघीण, रानडुकरानेही केला जोरदार प्रतिकार; पण शेवटी.. 

0

Viral video: वाघ अतिशय हिंस्र प्राणी म्हणून, ओळखला जातो. वाघाच्या तावडीत एखादा प्राणी सापडला तर सुटणे अशक्यच. वाघ अनेक मोठ्या प्राण्यांचे शिकार सहजतेने करताना अनेकदा पाहायला मिळतं. अगदी हत्तीची देखील शिकार वाघाने अनेक वेळा केल्याचं आपण सोशल मीडियावर पाहिलं असेल. आता या संदर्भातला एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. एक वाघिण भल्यामोठ्या रानडुक्कराची शिकार करत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर नेहमी प्राण्यासंदर्भातले अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हिडीओंना नेटकऱ्यांकडून देखील मोठ्या प्रमाणात पसंत केलं जातं. अनेकांमध्ये प्राण्यांच्या जीवनशैली विषयी जाणून घ्यायची उत्सुकता कायम असते. प्राणी इतर प्राण्याची कशी शिकार करतात? आपले भक्ष कसे टिपतात? काय खातात? कसे राहतात? यासंदर्भात अनेकांना जाणून घ्यायला आवडतं. आणि म्हणून प्राण्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. आता असाच एक रानडुकराची शिकार करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

         काय घडलं नक्की

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत एक वाघीण रानडुकराची शिकार करताना पाहायला मिळत आहे. @WildLense_India या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओला एका वाघीणीने रानडुकराची मान पकडल्याचे दिसत आहे. हे रान डुक्कर वाघिणीचा तोंडातून सुटण्यासाठी आरडाओरडा करताना पाहायला मिळत आहे. मात्र वाघीणीने रानडुकराची मान आपल्या जबड्यात घट्ट पकडली असल्याने, वाघीणीच्या तावडीतून रानडुक्कर सुटत नसल्याचे पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत, रानडुक्कर वाघिणीला आपल्या ताकतीने पाठीमागे रेटत असल्याचे देखील पाहायला मिळत आहे. मात्र वाघिणीने रानडुकराची मान आपल्या जबड्यात पकडली असल्याने, रानडुक्कराला स्वतःला वाचवणं कठीण झाल्याचं पाहायला मिळत आहे. रान डुक्कर मोठमोठ्याने ओरडताना देखील या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. मात्र वाघिणीच्या या हल्ल्यात ते स्वतःला वाचवू शकत नाही.

काय म्हणाले नेटकरी

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. हा व्हिडीओ अनेकांनी शेअर देखील केला असून, एका युजर्सने यावर कमेंट करताना म्हटले आहे. रानडुकराने थोड्याफार प्रमाणात प्रतिकार केला, मात्र वाघ-वाघ असतो. त्याच्याशी दोन हात करणं एवढं सोपं नाही. तर दुसर्‍या एका युजर्सने म्हटलं आहे, हे दृश्य फारच थरारक आहे.

हे देखील वाचा Viral video: सिंहाच्या जबड्यातून झेब्राच्या पिल्लाला आईने कसं वाचवलं? व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल आई आईच असते..

Viral video; लँडिंग होताना विमानाचे झाले चक्क दोन तुकडे; व्हिडिओ पाहून होईल काळजाचं पाणी..

Yojana: काय आहे शरद पवार ग्रामसमृद्धी योजना? योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज आणि मिळवा दोन लाख अनुदान..

Viral video: रिक्षा अडवायला गेलेल्या पोलिसाला रिक्षाचालकाने हवेत उडवून लावलं; हृदयाचे ठोके चुकवणारी घटना सीसीटीव्हीत कैद..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.