Viral video: सिंहाच्या जबड्यातून झेब्राच्या पिल्लाला आईने कसं वाचवलं? व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल आई आईच असते..

0

Viral video: आईला आपलं लेकरू किती प्रिय असतं, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. मग आई मानवाची असो किंवा प्राण्याची. आई आईचं असते, आपलं लेकरू वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची देखील ती पर्वा करत नाही. दोन दिवसांपूर्वी एका हरणाने आपल्या लेकराला स्वतःचं बलिदान देऊन मगरीच्या तावडीतून कसं वाचवलं होतं, हे तुम्ही पाहिलेच असेल. आता असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. एका सिंहाच्या जबड्याततून झेब्राने आपल्या लेकराला वाचवल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

सिंहाला जंगलाचा राजा का म्हणतात, हे कोणालाही वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. सिंहाच्या जेव्हा मनात येईल, तेव्हा तो कुठल्याही प्राण्याची शिकार करू शकतो, हे देखील आपल्याला चांगलंच माहिती आहे. सिंहाच्या नादी कोणी लागत नाही, सिंहाच्या वाटेला जर कोणी केला, तर त्याची खैर नाही. सिंहाला पाहिल्या पाहिल्या अनेक प्राणी धूम ठोकून पळून जातात, या संदर्भातले अनेक व्हिडीओ देखील आपण नेहमी पाहतो. सिंह हत्तीची देखील शिकार करताना आपण पाहिलं असेल. मात्र एक झेब्रा आपल्या लेकराला सिंहाच्या जबड्यातून सुखरूप सोडवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

अनेकांना या घटनेवर विश्वास बसणार नाही, मात्र हे खरं आहे. समोरचा कितीही ताकदवान असला, तरी जेव्हा आपलं लेकरू संकटात सापडतं, तेव्हा त्याच्या आईच्या अंगात बारा हत्तीचं बळ येत. हे कोणालाही वेगळे सांगण्याची गरज नाही. आई आपल्या लेकरावर जिवापाड प्रेम करत असते, वेळप्रसंगी आपल्या लेकरासाठी आपल्या जिवाचा त्याग देखील आई करते. या संदर्भातली अनेक उदाहरणे, तुम्ही ऐकलीही असतील. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत सिंह झेब्राच्या पिल्लाला आपल्या जबड्यात पकडून शिकार करण्याचा प्रयत्न करत असताना अचानक झेब्र्याच्या पिल्लाची आई येते, आणि आपलं लेकरू या सिंहाच्या जबड्यातून सुखरूप बाहेर काढून घेऊन जात असल्याचा, हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

काय घडलं नक्की?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत, सिंहाने एका झेब्राचं पिल्लू आपल्या जबड्यात पकडून त्याची शिकार करण्याच्या प्रयत्नात असल्याचे पाहायला मिळत आहे. इतक्यात या झेब्राच्या पिल्लाची आई येते, आणि सिंहाला जोरदार धडक देण्याचा प्रयत्न करते. आपलं पिल्लू सिंहाच्या जबड्यात अडकलंय हे पाहून, या झेब्र्याच्या अंगात बारा हत्तीचं बळ येतं. मोठ्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आपलं लेकरू या सिंहाच्या तावडीतून वाचवण्यात या झेंब्राला यश येतं.

आपल्या लेकराला सिंहाच्या जबड्यात वाचल्यानंतर, झेब्रा सिंहाला दोन्हीं पायांनी जोरात लाथ मारते, आणि आपले लेकरु पुढे घालून, त्या ठिकाणाहून पळून देखील जात असल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. आपलं लेकरू संकटात सापडले असताना, जीवाची कसलीही पर्वा न करता या झेब्राने आपल्या लेकराला वाचवल्याने, सोशल मीडियावर झेब्र्याचे मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात येत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ अनेकांनी लाईक्स करून मोठ्या प्रमाणात शेअर देखील केला आहे.

काय म्हणाले नेटकरी

सिंहाच्या तोंडातून आपल्या लेकराला वाचल्यानंतर अनेकांनी झेब्राचं कौतूक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ अनेकांनी शेअर देखील केला आहे. एका युजर्सने या व्हिडिओला लाईक करताना म्हटलं आहे, या जगात आईपेक्षा कोणीही महान नाही. आपल्या लेकरासाठी फक्त आईच जीव देऊ शकते.

हे देखील वाचा Viral video; लँडिंग होताना विमानाचे झाले चक्क दोन तुकडे; व्हिडिओ पाहून होईल काळजाचं पाणी..

Viral video: रिक्षा अडवायला गेलेल्या पोलिसाला रिक्षाचालकाने हवेत उडवून लावलं; हृदयाचे ठोके चुकवणारी घटना सीसीटीव्हीत कैद..

Viral video: लेकराला वाचवण्यासाठी आईने दिले बलिदान; आईचं प्रेम दर्शवणारा हृदयस्पर्शी व्हिडीओ एकदा पहाच..

         यावर क्लिक करून पहा व्हिडिओ..

Viral video: मगरीने क्षणात हरणाचे तुकडे-तुकडे केले; तुम्हीच पहा काळजाचं पाणी करणारा व्हिडिओ..

Viral video: काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ! अजगर जिवंत हरणाला गिळत असताना घडलं असं काही..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.