Viral Video: ‘या’ कारणामुळे वधूने भर मंडपात मारली वरच्या कानाखाली; पुढे काय झालं? पहा व्हायरल व्हिडीओ..

0

Viral video: अलिकडच्या काळात सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ नेहमी वायरल होत असतात. तुमच्या आसपास घडणारी कुठलीही गोष्ट सोशल मीडियाचा तावडीतून वाचली तर नवलच. असाच एक लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, वरमाला घालताना वधूने ‘वरा’च्या थेट कानशिलात लगावली. या घटनेने एकच खळबळ उडाली, मात्र वधु दोन-तीन कानशिलात लगावून स्टेट सोडून निघून जात असल्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

लग्न (marriage) हा प्रत्येक माणसाच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा क्षण असतो. अनेक जण आपला जोडीदार निवडताना अनेक गोष्टींचा विचार करत असतात. लग्नाअगोदर अनेकाजण लग्नानंतर आपले आयुष्य कसे असेल यासंदर्भात स्वप्ने रंगवतात. हे तुम्हाला चांगल्याप्रकारे माहिती आहे. मात्र या बरोबरच अनेकांमध्ये भीती देखील असते. आपला होणारा नवरा कसा असेल? तो आपल्याला समजून घेईल की नाही? असे अनेक प्रश्न मुलींसमोर उभा राहत असतात.

नवऱ्या मुलाला उत्तम नोकरी असली, तरी त्याचा स्वभाव अनेकांना माहीत नसतो. मुलगी बघायला आल्यानंतर देखील काही मुलं नेहमी स्वभावा व्यतिरिक्त डिल करत असतात. त्यामुळे कधीही कोणाचा खरं रूप लगेच ओळखता येत नाही. यासंदर्भातलाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. आपल्या लग्नात वर चक्क दारू पिला होता. आणि ‘वरमाला घालत असताना, वधूला हे माहित पडताच, वधूने कशाचाही विचार न करता होणाऱ्या नवऱ्याच्या थेट कानशिलात लगावल्या.

असं म्हणतात, पूर्वी लग्न झाल्यानंतरच नवरा आणि नवरी एकमेकांचे तोंड पाहायचे. मग लग्न होत असताना, काही बोलतील आणि काही एक्सप्रेशन देतील तर नवलच. मात्र अलीकडच्या काळात परिस्थिती बदलली आहे. मुली आता स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. लग्न असो किंवा कुठलाही कार्यक्रम असो मुली नेहमी व्यक्त होतात. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत वरमाला घालत असताना वधूला दारू पिल्याचे समजतच, वधूने कानशिलात लगावली. ही घटना उत्तर प्रदेश मधील ‘हमीरपूर’मध्ये घडली आहे.

वधूने वराच्या लगावली कानशिलात.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हमीरपूर या ठीकाणी लग्नामध्ये वरमाला घालत असताना वधूने वराच्या कानाखाली वाजवली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. ही घटना हमीरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये लालपुरा याठीकाणच्या स्वसा वडीलधारी या गावात घडली.

द्वारचारचा कार्यक्रम आटोपल्यानंतर नवरा मुलगा आपल्या जोडीदारांसह मंचावर गेला. दुसरीकडे वधू देखील आपल्या मैत्रिणींसोबत मंचावर आली. दोघेही स्टेजवर आल्यानंतर, ‘वरमाला’चा कार्यक्रम सुरू झाला. मात्र वधूच्या गळ्यात ‘वर’ ‘वरमाला’ घालायला गेल्यानंतर, वधूने वराच्या कानशिलात लगावली. व्हायरल झालेल्या व्हिडिओत वधू वराच्या दोन-तीन कानाखाली मारत असताना दिसत आहे. लग्नातच नवऱ्या मुलाने दारू पिली असल्याने, हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. तर काही जण वधूला ‘वर’ पसंत नव्हता, असंही म्हणत असल्याचं समोर आलं आहे.

हे देखील वाचा Tata Consultancy Services: मध्ये ४० हजारांची मेगा भरती! IT सह या क्षेत्राच्या विद्यार्थ्यांनाही सुवर्णसंधी; असा करा अर्ज..

Emergency Led Bulb: लाईट गेली तरी चालूच राहतिल हे एलईडी बल तब्बल एवढ्ये तास; ॲमेझॉनवर सेल सुरू..

Viral video: स्वतःहून सिंहाच्या कळपात जाऊन शिरलं हरीण, पुढे जे घडलं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का..

Viral video: सिंहाचं डब्यात अडकलं तोंड, निघावं म्हणून धावत सुटलं सैरावैरा पण्.., तुम्हीच पहा सिंहाची केविलवाणी अवस्था..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.