Viral video: शिकार करायला टपलेल्या सिंहीणीला म्हशीने शिंगावर घेऊन अनेकवेळा चेंडूसारखं फेकून दिलंय

0

Viral video: प्राण्यांची जीवनशैली जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते. जंगलातील प्राण्यांचे अनेक व्हिडिओ आपण मोठ्या संख्येने पाहतो. सोशल मीडियावर प्राण्यांचे व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. अनेकदा आपण हरीण, अगदी म्हशीची देखील शिकार वाघ, चित्ता, सिंह करताना पाहतो. मात्र म्हैस सिंहाला उचलू उचलू आपटल्याचं आपण क्वचितच पाहिलं असेल. आता या संदर्भातलाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

सिंहीणीला लांबून जरी एखाद्या प्राण्याने पाहिला तरी, कितीही मोठा प्राणी असला तरी, जवळ येण्याचं धाडस करणार नाही. सिंहीण सिंहापेक्षा शिकार करण्यात खतरनाक असल्याचं बोललं जातं. मात्र आता याच सिंहीणीला एका मशिने आपल्या शिंगावर घेऊन चेंडूसारखं फेकून दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

काय घडलं नेमकं?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत म्हशीचा कळप जात असताना या कळपावर एक सिंहीण शिकार करण्यासाठी टपली असल्याचं दिसत आहे. मात्र या सिंहीणीकडे एका म्हशीचं अचानक लक्ष जातं, आणि मग या म्हशीचा पारा चढतो. रस्त्याने म्हशीचा कळप जात असताना, या कळपात म्हशीची काही छोटी लेकरं देखील जात असल्याचं दिसत आहे.

कदाचित आपली लहान बाळ आपल्या सोबत आहेत, आणि जर या सिंहीणीने त्यांच्यावर ह ल्ला केला तर त्यांचा जीव जाईल, या भीतीपोटीच म्हशीने या सिंहीणीवर, ह ल्ला केला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत अचानक म्हशीने सिंहीणीला आपल्या शिंगावर घेऊन, चेंडूसारखं हवेत फेकून दिलं. काही कळायच्या आत हा सगळा प्रकार घडल्याने सिंहीणी देखील जोरदार जमिनीवर आदळल्याचं या व्हिडिओत पाहायला मिळत आहे.

म्हशीने सिंहीणीला आपल्या शिंगावर घेऊन जमिनीवर जोरदार आपटल्यानंतर, म्हैस देखील तिथून पसार झाली. सिंहीणी मात्र पडलेल्या जागेवरच तशीच केवीलवाणा चेहरा करून म्हशीकडे पाहत बसली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओने अनेकांना आश्चर्यचकित करून टाकले आहे. अनेकांनी या दृश्याचा आनंद घेत म्हशीचे कौतुक केले आहे.

हे देखील वाचा KCC: पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना आता ग्रामपंचायतमध्येच मिळणार किसान क्रेडिट कार्ड; जाणून घ्या सविस्तर..

PM kisan: पीएम किसान योजनेच्या अकराव्या हप्त्यात मोठा बदल; फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार अकरावा हप्ता..

Chandramukhi: बरखा आणि गोपीनाथ मुंडे यांच्या संबंधांची आज नव्याने चर्चा का होतेय? तुम्हाला माहिती आहे का हे प्रकरण..

Viral video: चरत असणाऱ्या उंटाला विनाकारण मारलं काठीने; संतापलेल्या उंटाने ताणून मालकाचा केला भुगा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.