Viral video: चरत असणाऱ्या उंटाला विनाकारण मारलं काठीने; संतापलेल्या उंटाने ताणून मालकाचा केला भुगा..

0

Viral video: सोशल मीडियावर प्राण्यासंदर्भातले रोज नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. काही व्हिडिओ हृदयाचे ठोके चुकवणारे असतात, तर काही मजेशीर देखील असतात. सोशल मीडियावर तुम्ही सिंह, वाघ, चित्ता, मगर यासारखे हिंस्र प्राणी शिकार करताना नेहमी पाहिलं असेल. मात्र तुम्ही पाळीवप्राणी मालकावर जीवघेणा हल्ला करताना कधी पाहिलं आहे का? नाही ना, सोशल मीडियावर यासंदर्भातलाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका ऊंटाने आपल्या मालकाचा पाठलाग करून जीवघेणा हल्ला केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

तसं पाहायला गेलं तर, उंट हा खूप शांत पाळीव प्राणी आहे. तो माणसासाठी किती उपयोगी आहे, हे तुम्हा सर्वांना चांगलेच माहिती आहे. तुम्ही यापूर्वी उंट कधीही कोणावर हल्ला करताना पाहिला नसेल. कारण तो विनाकारण कोणावरही हल्ला करत नाही. मात्र कधी-कधी विनाकारण तुम्हाला एखाद्याने त्रास दिला, तर तुमची तळपायाची आग मस्तकात जाते, आणि मग समोर कोणीही असलं तरी, आपण कशाचाही विचार करत नाही. हे उंटाच्या बाबतीत देखील घडले असून, विनाकारण काठीने मारणाऱ्या मालकाला उंटाने चांगलाच धडा शिकवला.

एका शेतात अनेक ऊंटाबरोबर हा देखील आपल्या दुनियेत शांत गवत चरत होता. मात्र अचानक कुठल्याही कारणाशिवाय त्याच्या मालकाने काठीने त्याला मारहाण करायला सुरुवात केली. विनाकारण आपल्याला मार बसत असल्याने, उंट देखील कमालीचा संतापल्याचं व्हायरल झालेल्या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. आपल्या मालकाचं हे कृत्य उंटाला अन्यायकारक वाटलं, आणि याचा बदला उंटाने व्याजासकट घेतला.

काय घडलं नेमकं?

@iftirass या ट्विटर अकाउंटवर हा भयानक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. कॅमेरात कैद झालेल्या व्हिडीओत उंट शांत हिरव्यागार शेतात चरत असताना पाहायला मिळत आहे. उंटाच्या आसपास अनेक उंट देखील आहेत. मात्र अचानक या उंटाच्या मालकाने काठीने त्याला बदडायला सुरुवात केली. विनाकारण आपल्याला मारहाण होत असल्याने उंट कमालीचा संतापला.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत शांत चरत असणाऱ्या उंटाला मारल्याने उंट संतापतो, आणि मारलेल्या व्यक्तीच्या पाठीमागे जोरदार धावत सुटतो. उंटाला काठीने मारणारा मालक आता कमालीचा घाबरल्याचे व्हिडिओत दिसत आहे. संतापलेल्या उंटाच्या तावडीतून स्वतःला वाचवण्यासाठी हा व्यक्ती पुढे पळताना दिसत आहे. मात्र उंट कसलीही दयामाया न दाखवता, या व्यक्तीवर जिवघेणा हल्ला करताना दिसत आहे.

अखेर या व्यक्तीला उंट पाठलाग करून गाठतो. उंट आपल्या पायाने या व्यक्तीला तुडवताना देखील या व्हिडिओ दिसत आहे. उंटाला काठीने मारणारा व्यक्ती खाली पडल्यानंतर उंट त्याच्या अंगावर पायाने जिवघेणा हल्ला करताना दिसत आहे. मात्र या दरम्यान जमिनीवरील माती मोठं वादळ आल्यासारखी उडाल्याने, खाली पडलेला व्यक्ती पाहता येणे शक्य होत नाही. आसपास असणारे अनेक लोक या व्यक्तीच्या मदतीला धावून येत असल्याचं देखील या व्हिडिओत दिसत आहे.

काय म्हणाले नेटकरी?

उंटाच्या हल्ल्यात हा व्यक्ती किती जखमी झाला आहे, हे समजू शकले नाही. मात्र, सोशल मीडियावर हा व्हिडीओ वाऱ्यासारखा पसरला असून, अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट करताना कर्माची फळे मिळाली असल्याचं म्हटलं आहे. एका युजर्सनी म्हटले आहे, विनाकारण एखाद्याला त्रास दिल्यावर त्याचे परिणाम हे तुम्हाला भोगावेच लागणार.

हे देखील वाचा Navneet Kaur Rana: पोलीस स्टेशनच्या बाहेरच शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांच्या हनुवटीतून काढलं रक्त; व्हिडिओ व्हायरल..

KCC: पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना आता ग्रामपंचायतमध्येच मिळणार किसान क्रेडिट कार्ड; जाणून घ्या सविस्तर..

Viral video: ह ल्ला करणाऱ्या सापाशी उंदराने केले दोन हात; थरारक झुंजीत सापाने टाकली नांगी! विश्वास नाही बसत? पहा व्हिडिओ..

Viral video: स्वतःहून सिंहाच्या कळपात जाऊन शिरलं हरीण, पुढे जे घडलं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.