Viral video: ह ल्ला करणाऱ्या सापाशी उंदराने केले दोन हात; थरारक झुंजीत सापाने टाकली नांगी! विश्वास नाही बसत? पहा व्हिडिओ..

0

Viral video: अलिकडे प्राण्यासंदर्भातले रोज नवनवीन व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. नेटकरी यांना देखील हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात आवडत आहेत. अनेक जण हे व्हिडिओ लाईक करताना शेअर देखील करत आहेत. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, एका छोट्या उंदराने भल्यामोठ्या सापाशी पंगा घेतला आहे.

साप आपले भक्ष्य जिवंत गिळणारा प्राणी आहे. उंदीर हे सापाचे आवडते भक्ष्य मानले जाते. सापाच्या तुलनेत उंदीर खूपच कमकुवत आणि छोटं असल्याने सापाला पाहिल्यावर उंदीर सहाजिकच धूम ठोकून पळून जाणार यात शंका नाही. मात्र कधी-कधी तुम्ही कितीही कमकुवत असला तरी प्रतिकार केल्याने तुमचा विजय देखील होऊ शकतो, याची अनेक उदाहरणे देखील आपण नेहमी पाहतो, ऐकतो.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ देखील आपला जीव वाचवून पळून जाण्यात काही अर्थ नसून, या सापाची आपण दोन हात केले तर आपण जिवंत वाचू शकतो. या विचाराने उंदराचा जीव वाचल्याचे या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत, एक छोटा उंदीर भल्यामोठ्या सापाशी पंगा घेत असल्याचे, पाहायला मिळत आहे. पळून न जाता या सापाशी दोन हात करताना उंदीर या व्हिडिओ दिसत असल्याने अनेकांना याचं कौतुक वाटत आहे.

काय घडलं नेमकं?

“Saurabh Jadhav 2110” या नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर उंदराचा आणि सापाच्या झुंजीचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. मोस्टली आपण साप उंबराची शिकार करताना पाहतो. साप कितीही मोठा उंदीर असला तरी क्षणात गिळून टाकतो, हे आपण प्रत्यक्षात देखील अनेक वेळा पाहिलं असेल. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओत छोटा उंदीर भल्या मोठ्या सापशी दोन हात करताना दिसत आहे.

सापाने उंदरावर हल्ला केल्यानंतर, उंदीर पळून न जाता सापाशी लढताना या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. उंदीर सापाशी लढत आहे, हे पाहून साप देखील आश्चर्यचकित झाल्याचे या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. सापाच्या फणावर उडी मारू मारू उंदीर आपल्या छोट्याशा तोंडाने लचके काढत असल्याचं या व्हिडीओ दिसत आहे. साफ देखील उंदराने केलेल्या हल्ल्यामुळे थोडासा घाबरल्याचे दिसत आहे.

काय म्हणाले नेटकरी?

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ अनेकांनी लाईक करत शेअर देखील केला आहे. सोबतच या व्हिडिओखाली अनेकांनी मजेशीर कमेंट्स देखील केल्या आहेत. उंदराने सापाशी घेतलेला पंगा अनेकांना आवडला आहे. एका युजर्सने या व्हिडिओवर कमेंट करताना म्हटले आहे, ज्यांच्याकडे हिम्मत असते, तेच पाठ न दाखवता सामना करणं पसंत करतात.‌

हे देखील वाचा PM kisan: पीएम किसान योजनेच्या अकराव्या हप्त्यात मोठा बदल; फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार अकरावा हप्ता..

KCC: पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना आता ग्रामपंचायतमध्येच मिळणार किसान क्रेडिट कार्ड; जाणून घ्या सविस्तर..

Viral video: स्वतःहून सिंहाच्या कळपात जाऊन शिरलं हरीण, पुढे जे घडलं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का..

Viral video: सिंहाचं डब्यात अडकलं तोंड, निघावं म्हणून धावत सुटलं सैरावैरा पण्..,;तुम्हीच पहा सिंहाची केविलवाणी अवस्था

Viral video: काही कळायच्या आत मगरीने घेतला चित्त्याच्या नरडीचा घोट; व्हिडिओ पाहून तुमचाही उडेल थरकाप..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.