PM kisan: पीएम किसान योजनेच्या अकराव्या हप्त्यात मोठा बदल; फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार अकरावा हप्ता..

0

PM kisan: केंद्र सरकारकडून पंतप्रधान कृषी सन्मान योजने अंतर्गत देशातील शेतकऱ्यांना दर वर्षी सहा हजार रुपये निधी देण्यात येतो. आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एकूण १० हप्ते मिळाले आहेत. आणि आता अकराव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. वर्षात एकूण तीन हप्त्यांत सहा हजार रुपये केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करतं. म्हणजेच दर चार महिन्यांच्या अंतराने शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा हप्ता जमा होतो.

यापूर्वी या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना आपला आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे बंधनकारक नव्हतं, मात्र आता केंद्र सरकारने ज्या शेतकऱ्यांनी आपला आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलं आहे, म्हणजेच ई केवायसी केलं असेल, अशा शेतकऱ्यांना अकराव्या हप्त्याचा लाभ घेता येणार असल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत. अकरावा हप्ता आपल्या खात्यात जमा होतो, की नाही याविषयी अनेक शेतकऱ्यांना जाणून घ्यायचं असल्याचं निदर्शनास येत आहे. आणि म्हणून आम्ही या संदर्भात सविस्तर माहिती देणार आहोत.

पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या जवळपास 12 कोटी 50 लाखाहून अधिक असल्याचं निदर्शनास येत आहे. या शेतकऱ्यांना आता अकराव्या हप्त्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. जुलै 2022 चा 11 वा हप्ता केंद्र सरकार लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार आहे. ई-केवायसी बंधनकारक केल्यानंतर, या योजनेसाठी जे शेतकरी पात्र आहेत, अशा पात्र शेतकऱ्यांसाठी देशातील सर्व राज्य सरकारांनी RFT म्हणजेच रिक्वेस्ट फॉर ट्रान्सफर यावर स्वाक्षरी केली आहे. जर राज्य सरकारने अकरावी हप्त्यासाठी आरएफटी केली असेल, तर तुमच्या खात्यात अकरावा हप्ता जमा होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःहून येत्या ३ मे म्हणजेच अक्षय्य तृतीया दिवशी हा हप्ता जारी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. आता राज्य सरकारने कोणकोणत्या लाभार्थ्यांची रिक्वेस्ट फॉर ट्रान्सफर (RFT) केली आहे, हे जर तुम्हाला तपासायचं असेल, किंवा तुम्हाला अकरावा हप्ता येणार आहे की नाही, हे पाहायचं असेल, तर या संदर्भातली सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला सोप्या भाषेत समजावून सांगणार आहोत.

पी एम किसान योजना अंतर्गत अकरावा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार की आहे की नाही, हे तपासण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलवर क्रोमवर जाऊन, https://pmkisan.gov.in असं सर्च करायचं आहे. तुम्ही क्रोमवर जाऊन सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर ‘पीएम किसानची’ अधिकृत वेबसाइट ओपन झालेली असेल. वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर उजव्या बाजूला ‘फार्मर्स कॉर्नर’ हा पर्याय दिसेल. यानंतर तुम्हाला ‘Beneficiary Status’ या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

‘Beneficiary Status’ या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुमच्या समोर नवीन पेज ओपन झालेलं असेल. या पेजवर तुम्हाला “आधार क्रमांक” आणि “बँक क्रमांक” हे दोन पर्याय दिसतील. त्यापैकी तुम्ही एका पर्यायात या संबंधीची डिटेल्स टाकायची आहे. यानंतर “डाटा मिळवा” या पर्यायावर क्लिक करायचं आहे. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यावर आतापर्यंत किती हप्ते आले, यासंदर्भातील सविस्तर डिटेल्स मिळणार आहे. तसेच अकराव्या हप्त्यासंदर्भात राज्य सरकारने लिहिलेली RFT देखील मिळेल.

राज्य सरकारने स्वाक्षरी केलेल्या Rft चा अर्थ काय?

पीएम किसान सन्मान निधीच्या https://pmkisan.gov.in/ वेबसाइटला भेट देऊन तुम्ही खात्यावर जमा झालेल्या पेमेंटची स्थिती पाहू शकता. या वेबसाइटवर तुमच्या खात्यासमोर, तुम्हाला 1ली, 2री, 3री, 4थी, 5वी 6वी, 7वी, 8व्या हप्त्यांसाठी राज्यसरकारने स्वाक्षरी केलेल्या RFT मिळतील. Rft म्हणजेच रिक्वेस्ट फॉर ट्रान्सफर. याचा अर्थ नेमका काय आहे, हेही आपण पाहू या..! याचा अर्थ होतो. ”लाभार्थीचा डेटा राज्य सरकारने सत्यापित केला आहे” जो योग्य असल्याचे आढळले आहे.

आता FTO चा अर्थ जाणून घेऊया…

जर FTO हा मेसेज जनरेट झाला असेल, तर पेमेंट कन्फर्मेशन प्रलंबित आहे, असं स्टेटसमध्ये दिसणार आहे. याचा अर्थ तुमचा हप्ता लवकरच तुमच्या बँक खात्यात हस्तांतरित होणार आहे असा होतो. FTO म्हणजे ‘फंड ट्रान्सफर ऑर्डर’ असा याचा अर्थ आहे. यासंदर्भात अधिक जाणून घ्यायचं झाल्यास, “राज्य सरकारने तुमचे आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, तसेच बँकेचा IFSC कोड याची पडताळणी लाभार्थ्यांच्या तपशीलशी केली आहे. तुमची हप्त्याची रक्कम तयार असून, केद्र सरकार ती तुमच्या बँक खात्यावर पाठवेल. यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत, असा होतो.

हे देखील वाचा KCC: पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना आता ग्रामपंचायतमध्येच मिळणार किसान क्रेडिट कार्ड; जाणून घ्या सविस्तर..

Tata Consultancy Services: मध्ये ४० हजारांची मेगा भरती! IT सह या क्षेत्राच्या विद्यार्थ्यांनाही सुवर्णसंधी; असा करा अर्ज..

HPCL Recruitment 2022: डिप्लोमा आणि पदवीधर विद्यार्थ्यांना HPCL मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी! जाणून घ्या डिटेल्स..

Emergency Led Bulb: लाईट गेली तरी चालूच राहतिल हे एलईडी बल तब्बल एवढ्ये तास; ॲमेझॉनवर सेल सुरू..

Viral Video: या कारणामुळे वधूने भर मंडपात मारली वरच्या कानाखाली; पुढे काय झालं? पहा व्हायरल व्हिडीओ..

Dinesh Karthik: तुझ्या मित्राचं मूल माझ्या पोटात आहे! दिनेश कार्तिकच्या पत्नीने स्वतः त्याला सांगितलं आणि पायाखालची जमीन सरकली.,; वाचा ही कहाणी..

DCvRR: सामना हरायला लागला की, पंतने बॅटिंग करणाऱ्या बॅट्समनलाच बोलावलं मैदानाबाहेर; पुढे काय झालं पहा व्हिडिओ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.