DCvRR: सामना हरायला लागला की, पंतने बॅटिंग करणाऱ्या बॅट्समनलाच बोलावलं मैदानाबाहेर; पुढे काय झालं पहा व्हिडिओ..

0

DCvRR: राजस्थान रॉयल आणि दिल्ली कॅपिटल संघांमध्ये काल वानखेडेच्या मैदानावर ( wankhede cricket stadium) या हंगामातील (IPL 2022) 34वा सामना खेळविण्यात आला. फलंदाजीसाठी अनुकूल असणाऱ्या या खेळपट्टीवर अक्षरशः धावांचा पाऊस पडला. या हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या जोस बटलरने (Jose butler) पुन्हा एकदा शतक झळकावत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. 223 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरणार्‍या दिल्ली संघाने देखील अखेरपर्यंत झुंज दिली. मात्र दिल्लीचा पंधरा धावांनी पराभव झाला. Rajsthan royals beat Delhi capital) मात्र या सामन्यात चर्चा झाली ती ‘नो-बॉल’ असून देखील पंचांनी ‘नो बॉल’ (No Ball) न दिल्याची.

दिल्ली कॅपिटल संघाचा फलंदाज ‘रोमन पॉवेल’ विसाव्या षटकांत फलंदाजी करत असताना, ‘मॅकॉय’ या गोलंदाजाने टाकलेला तिसरा चेंडू हा कमरेच्यावर फुलटॉस पडला असल्याने, हा चेंडू नो बॉल असल्याचे स्पष्ट दिसत होतं. मात्र तो चेंडू नो बॉल दिला गेला नाही. पंचांनी दिलेल्या निर्णयावर ऋषभ पंत आणि दिल्ली कॅपिटल संघाचा बॅटिंग कोच प्रवीण आंब्रे चांगलेच भडकले. आणि खेळपट्टीवर फलंदाजी करत असणाऱ्या फलंदाजाला मैदानात बाहेर येण्याचा इशारा केला. यामुळे काही वेळ चांगलाच गोंधळ उडाला होता.

काय घडलं नक्की

शेवटच्या षटकांत दिल्ली संघाला विजयासाठी तब्बल 36 धावांची आवश्यकता होती. साहजिकच प्रत्येक चेंडूवर षटकाराची आवश्यकता असल्याने, हा सामना राजस्थान रॉयलच्या बाजूने पूर्णपणे झूकला होता. मात्र शेवटच्या षटकात पहिल्या तीन चेंडूवर लगातार तीन षटकार लगावत पॉवेलने दिल्ली संघाच्या आशा जिवंत ठेवल्या. त्यातच ‘मॅकॉय’ने टाकलेला तिसरा चेंडू हा कमरेच्यावर असल्याने नो बॉल असल्याचं स्पष्ट दिसत होतं. पंचांनी हा चेंडू नो बॉल दिला असता तर, दिल्ली संघाला एक एक्स्टा चेंडू खेळण्याची संधी मिळाली असती.

पॉवेल टाकलेला तिसरा चेंडू नो बॉल असताना देखील अंपायरने नो बॉल दिला नाही. आणि यामुळे दिल्ली संघाचा कर्णधार आणि बॅटिंग कोच पंचांच्या या निर्णयावर चांगलेच भडकले. ऋषभ पंत आणि प्रवीण आमरे या दोघांचं म्हणणं होतं, एटलिस्ट हा ‘नो बॉल’ आहे की नाही, हे थर्ड अंपायरने तरी चेक करावं. मात्र थर्ड अंपायरने देखील या ‘नो बॉलवर’ ऍक्शन घेतली नाही. यामुळे भडकलेल्या ऋषभ पंत आणि बॅटिंग कोच प्रवीण आमरे यांनी आपल्या फलंदाजांना मैदानाबाहेर येण्याचा इशारा केला.

दिल्ली कॅपिटल्स संघाला अखेरच्या षटकात 36 धावांची आवश्यकता असल्यामुळे, जवळपास हा सामना दिल्ली संघ पराभवाच्याच छायेत होता. मात्र आता सलग तीन षटकार लगावल्यामुळे दिल्ली संघाच्या आशा जिवंत झाल्या. अशातच तिसरा चेंडू असताना देखील पंचांनी तो नो बॉल दिला नाही. जर हा चेंडू नो बॉल दिला असता, तर दिल्ली संघाच्या जिंकण्याच्या आशा आणखीन वाढल्या असत्या. आणि म्हणून, ऋषभ पंत पंचांच्या निर्णयावर भडकला. सामना संपल्यानंतर पंतने यासंदर्भात जाहीर नाराजी देखील व्यक्त केली.

वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात अक्षरशः धावांचा पाऊस पडला. पंतने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला खरा, मात्र दिल्ली संघाच्या गोलंदाजांना ऋषभ पंचने घेतलेला हा निर्णय सार्थ ठरवण्यात अपयश आलं. राजस्थान रॉयल्स संघाने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात तब्बल 222 धावांचा डोंगर उभा केला. या स्पर्धेत तुफान फॉर्ममध्ये असणाऱ्या जोस बटलरने पुन्हा एकदा शतकी खेळी केली. या स्पर्धेत जोस बटलरने तिसरे शतक झळकावले आहे.

शेवटच्या षटकांत रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसनने देखील तुफान फटकेबाजी करत 19 चेंडूत 46 भावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. 223 धावांचा पाठलाग करणाऱ्या दिल्लीची सुरुवात ठिकठाक झाली. मात्र त्यानंतर दिल्ली संघाचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले. आणि हा सामना राजस्थान रॉयल्स संघाच्या बाजूने झूकला. राजस्थान रॉयल्स संघाने हा सामना पंधरा धावांनी जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. राजस्थान रॉयल्सचा संघ सात सामन्यात पाच विजयासह दहा गुण मिळवून अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे.

हे देखील वाचा Tata Consultancy Services: मध्ये ४० हजारांची मेगा भरती! IT सह या क्षेत्राच्या विद्यार्थ्यांनाही सुवर्णसंधी;असा करा अर्ज..

NPC Recruitment 2022: बारावी आणि पदवीधर विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! जाणून घ्या सविस्तर..

Emergency Led Bulb: लाईट गेली तरी चालूच राहतिल हे एलईडी बल तब्बल एवढ्ये तास; ॲमेझॉनवर सेल सुरू..

Renu Sharma: पाच कोटीची खंडणी मागणाऱ्या रेणू शर्मा आणि धनंजय मुंडेंचं हे आहे कनेक्शन; जाणून तुम्हीही म्हणाल..

Dinesh Karthik: तुझ्या मित्राचं मूल माझ्या पोटात आहे! दिनेश कार्तिकच्या पत्नीने स्वतः त्याला सांगितलं आणि पायाखालची जमीन सरकली.,; वाचा ही कहाणी..

Adani Wilmar Upper Circuit: Adani Wilmar चा शेयर दोन महिन्यांत वाढला तिप्पट; आता गुंतवणूक करायची की नाही? जाणून घ्या सविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.