Adani Wilmar Upper Circuit: Adani Wilmar चा शेयर दोन महिन्यांत वाढला तिप्पट; आता गुंतवणूक करायची की नाही? जाणून घ्या सविस्तर..

0

Adani Wilmar Upper Circuit: फॉर्च्यून ब्रँडच्या नावाखाली एफएफसीजी उत्पादने विकत असणाऱ्या ‘अदानी विल्मर’ या कंपनीचा स्टॉक 8 फेब्रुवारीला तोट्यात गेला होता. मात्र आता हा स्टॉक सातत्याने वाढताना पाहायला मिळत आहे. पाठींमागच्या दोन महिन्यामध्ये या समभागाने गुंतवणूकदारांना तब्बल 200% हून अधिक परतावा दिला असल्याने, याची जोरदार चर्चा होत आहे.

भारतातील आणि आशियातील सर्वात मोठे श्रीमंत गौतम आडानी यांच्या नेतृत्वाखाली हा समूह काम करतो. या कंपनीचा शेअर ८ फेब्रुवारीला २२१ रुपयांवर लिस्ट झाला होता. आणि मंगळवारी २२१ रुपयांची रक्कम ६७६ रुपयांवर बंद झाली. त्यामुळे गुंतवणूकदारांना या स्टॉकने मालामाल करून टाकलं आहे. बुधवारी सव्वा बारा वाजता हा स्टॉक 2.37 टक्क्यांच्या वाढीने तब्बल ६९२.०० रुपयांवर पोहचला होता.

विशेष म्हणजे, फॉर्च्युन या नावाने एफएफसीजी उत्पादने विकत असणाऱ्या या कंपनीचा स्टॉक हा फेब्रुवारीमध्ये आठ तारखेला तोट्यात गेल्याची नोंद झाली होती. मात्र यानंतर या स्टॉकने जोरदार मुसंडी मारली. ‘अदानी विल्मार’ हे अदानी समूहाची स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध होत असणारी ही आतापर्यंतची सातवी कंपनी म्हणून समोर आली आहे. अदानी ग्रुपचा हा समूह सिंगापूरचा विल्मार यांचा संयुक्त भागीदारी आहे. ही कंपनी 1999 मध्ये उभी झाली. फॉर्च्युन या ब्रँडच्या नावाखाली ही कंपनी तेल तसेच आणखी काही खाद्यपदार्थ विकत आहे.

आता गुंतवणूक करायची की नाही?

दोन महिन्यात या शेयरने विक्रमी उच्चांक गाठला असल्याने, आता गुंतवणूकदारांना या शेअरमध्ये गुंतवणूक करावी की नाही, हे समजत नसल्याचं पाहायला मिळत आहे. अदानी विल्मार ही खाद्यतेलाच्या उद्योगामधील सर्वात मोठी कंपनी मानली जाते. अलीकडच्या काळात तेलाच्या किमतीं प्रचंड वाढल्या असल्याने, या कंपनीला याचा फायदा होण्याची शक्यता आणखीन आहे. साहजिकच यामुळे या कंपनीचे शेअर्स देखील वाढत असल्याचे, चित्र आहे. त्यामुळे तुम्ही या कंपनीत इन्वेस्ट करू शकता असे देखील बोलले जात आहे.

ब्रोकरेज फर्म एडलवाईस रिसर्च म्हणतात, ‘अदानी विल्मार’च्या तेजीचा हा ट्रेंड लवकरच संपुष्टात येण्याची शक्यता आहे. या कंपनीने आपले कव्हरेज होल्डसह पुढच्या एका वर्षासाठी ५५९ रुपये एवढी लक्ष्य किंमत दिली आहे. ब्रोकरेज फर्म एडलवाईस रिसर्च यांच्या म्हणण्यानुसार, ही कंपनी उत्तमरीत्या कामगिरी करत असली तरी, अगोदरच या कंपनीच्या शेअरच्या किमतीं वाढल्या आहेत. श पाठी मागच्या काही महिन्यांपासून या कंपनीचा नफा प्रचंड वाढला असल्याने, आता शेयरच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा Bank of India Recruitment 2022: बँक ऑफ इंडियात निघाली मेगा भरती; या पदांसाठी असा करा अर्ज..

Tata Consultancy Services: मध्ये ४० हजारांची मेगा भरती! IT सह या क्षेत्राच्या विद्यार्थ्यांनाही सुवर्णसंधी; असा करा अर्ज..

Emergency Led Bulb: लाईट गेली तरी चालूच राहतिल हे एलईडी बल तब्बल ;एवढ्ये तास; ॲमेझॉनवर सेल सुरू..

Viral Video: या कारणामुळे वधूने भर मंडपात मारली वरच्या कानाखाली; पुढे काय झालं? पहा व्हायरल व्हिडीओ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.