HPCL Recruitment 2022: डिप्लोमा आणि पदवीधर विद्यार्थ्यांना HPCL मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी! जाणून घ्या डिटेल्स..

0

HPCL Recruitment 2022: बेरोजगारीचा दर दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकजण नोकरीच्या शोधात आहे. मात्र बेरोजगारीच्या दुनियेत नोकरी मिळवणे, ही मोठी कसरत असल्याचे दिसून येते. त्यात सरकारी नोकरी मिळवणे, हे तर जवळपास अशक्यच आहे. मात्र अशात आता हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (Hindustan Petroleum Corporation Limited, HPCL विविध पदांसाठी भरती करणार असल्याचं जाहीर केलं आहे. तुमच्यासाठी HPCL मध्ये नोकरी करण्यासाठी ही एक सुवर्ण संधी असून, यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे.

गेली दोन वर्ष कोरोनामुळे अनेकांना चांगल्या पगाराची नोकरी गमवावी लागली. दोन वर्षात अनेक पदवीधर विद्यार्थी नोकरीसाठी कुठेही अप्लाय करू शकले नाहीत. अनेकांना दोन वर्ष घरातच बसून राहावे लागल्याने, मोठ्या आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागले. मात्र आता हळूहळू सर्व क्षेत्रे पूर्वपदावर येत आहेत. अनेक कंपनी आता भरती प्रक्रिया राबवत असल्याचे पाहायला मिळत आहे.

हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (Hindustan Petroleum Corporation Limited, HPCL) देखील आता आपल्या क्षेत्रात विविध पदांची भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. तसं पाहायला गेलं तर, कोरोणा काळात देखील या कंपनीने उत्तमरित्या परफॉर्मन्स केला होता. या कंपनीने आता आपल्या अधिकृत वेबसाईटवर या प्रक्रिया संदर्भातील नोटिफिकेशन जारी केली आहे.

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी केंद्र सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रामधील एक आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने (HPCL) आपल्या अनेक विभागात तंत्रज्ञ, प्रयोग विश्लेषक, कनिष्ठ अग्निशमन, सुरक्षा अधिकारी, अशा १८६ पदांची भरती करणार असल्याची अधिसूचना काढण्यात आली आहे. आता या कंपनीत ज्या इच्छुक उमेदवारांना सरकारी नोकरी करायची आहे, अशा उमेदवारांनी या कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करणे आवश्यक आहे.

अशी आहे ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीने, जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, एचपीसीएल तंत्रज्ञ भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांना 22 एप्रिल 2022 पासून 21 मे 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. इच्छुक उमेदवारांना या कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावे लागणार आहेत. या नोकरीसाठी उमेदवारांच्या पात्रतेचा विचार करायचा झाल्यास, उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेमधून संबंधित ट्रेडचा डिप्लोमा ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेला असणं आवश्यक आहे.

दिव्यांग तसेच कॅटेगिरीच्या उमेदवारांसाठी ही मर्यादा 50 टक्के गुणांची ठेवण्यात आली आहे. उमेदवारांच्या वयाचा विचार करायचा झाल्यास एक एप्रिल 2022 रोजी उमेदवारांचे वय अठरा वर्ष ते 25 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे. तरच तुम्ही या नोकरीसाठी पात्र होऊ शकणार आहात.

आता आपण अर्ज कसा करायचा हे पाहुयात…

ज्या उमेदवारांना या कंपनीत सरकारी नोकरी करायची आहे, तसेच यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी https://www.hindustanpetroleum.com/ या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. आता आपण सविस्तर माहिती घेऊया..

सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये क्रोमवर जाऊन, https://www.hindustanpetroleum.com/ असं सर्च करायचं आहे. यानंतर तुमच्यासमोर करिअर विभाग नावाचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करायचं आहे.

करिअर विभाग या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ‘रिफायनरीसाठी टेक्निशियन रिक्रुटमेंट’ हा पर्याय दिसेल. तुम्हाला बरोबर यावर क्लिक करायचं आहे. ‘रिफायनरीसाठी टेक्निशियन रिक्रुटमेंट’ या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, ड्रॉप डाउनलोड यामध्ये असणाऱ्या लिंकमधून उमेदवार भरती नोटिफिकेशन डाउनलोड करायचे आहे.

इथपर्यंत सगळे प्रोसेस व्यवस्थित झाल्यानंतर, तुम्हाला अर्जाच्या ऑनलाईन पेजवर जाऊन समोर दिसत असणारी माहिती व्यवस्थित भरायची आहे. यासाठी तुम्हाला ऑनलाईन 590 रुपये देखील भरावे लागणार आहेत.

हे देखील वाचा DCvRR: सामना हरायला लागला की, पंतने बॅटिंग करणाऱ्या बॅट्समनलाच बोलावलं मैदानाबाहेर; पुढे काय झालं पहा व्हिडिओ..

KCC: पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना आता ग्रामपंचायतमध्येच मिळणार किसान क्रेडिट कार्ड; जाणून घ्या सविस्तर..

Tata Consultancy Services: मध्ये ४० हजारांची मेगा भरती! IT सह या क्षेत्राच्या विद्यार्थ्यांनाही सुवर्णसंधी; असा करा अर्ज..

NPC Recruitment 2022: बारावी आणि पदवीधर विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! जाणून घ्या सविस्तर..

Emergency Led Bulb: लाईट गेली तरी चालूच राहतिल he एलईडी बल तब्बल एवढ्ये तास; ॲमेझॉनवर सेल सुरू..

Bank of India Recruitment 2022: बँक ऑफ इंडियात निघाली मेगा भरती; या पदांसाठी असा करा अर्ज..

Adani Wilmar Upper Circuit: Adani Wilmar चा शेयर दोन महिन्यांत वाढला तिप्पट; आता गुंतवणूक करायची की नाही? जाणून घ्या सविस्तर..

Dinesh Karthik: तुझ्या मित्राचं मूल माझ्या पोटात आहे! दिनेश कार्तिकच्या पत्नीने स्वतः त्याला सांगितलं आणि पायाखालची जमीन सरकली.,; वाचा ही कहाणी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.