Viral video: काही कळायच्या आत मगरीने घेतला ‘चित्त्या’च्या नरडीचा घोट; व्हिडिओ पाहून तुमचाही उडेल थरकाप..

0

Viral video: दिवसेंदिवस सोशल मीडियावर प्राण्यांच्या शिकारीचे नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत आहेत. प्राण्यांचे हे व्हिडिओ पाहणार्‍यांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अनेक जण सोशल मीडियावर प्राण्यांचे विविध व्हिडिओ शेअर देखील करत आहेत. प्राणी एकमेकांची शिकार करताना अनेकांच्या काळजाचा थरकाप उडतो. मात्र हे दृश्य अनेकांना पाहवंस वाटतं. आता असाच काळजाचा थरकाप उडवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

चित्ता, सिंह, वाघ, मगर, हे अतिशय हिंस्र प्राणी म्हणून ओळखले जातात. अनेकदा हे प्राणी मगरीची शिकार करताना आपण पाहतो. मात्र कधीकधी मगर देखील या प्राण्यांना आपले भक्ष्य बनवताना पाहायला मिळते. मात्र हे फार क्वचित पाहायला मिळते. विशेष म्हणजे हे दृष्य फारच थरारक असते. हे तुम्हाला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. आता याच संदर्भातला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भल्यामोठ्या चित्त्याच्या नरडीचा घोट मगरीने घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

काय घडलं नेमकं?

मगर किती हिंस्र प्राणी आहे, हे अनेकांना माहिती आहे. मगरीच्या जबड्यात एखादा प्राणी सापडला, तर त्याची खैर नाही. मग तो प्राणी कितीही मोठा असूद्या, तो संपलाच म्हणून समजा. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत देखील एका मगरीने भल्यामोठ्या चित्याची यशस्वी शिकार केल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचं झालं असं, तीन चित्ते एकामागे एक तलाव्यातच्या कडेला पाणी पिण्यासाठी येत असताना या व्हिडीओ दिसत आहे.

त्यातला एक चित्ता दोन चित्त्याच्या पुढे येऊन तलावाच्या कडेला पाणी पीत होता. हा चित्ता पाणी पीत असताना सावधगिरी बाळगून असल्याचं व्हिडिओ पाहायला मिळत आहे. चिता किती चपळ आणि चतुर असतो, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. यावेळेस देखील चित्त सावधगिरीने पाणी पीत होता. मात्र तरीदेखील पाण्यात असणाऱ्या मगरीने क्षणात चित्त्यावर ह ल्ला केला. हा ह ल्ला इतका जबर होता की, चित्त्याला रिअॅक्ट करण्याची संधी देखील मिळाली नाही.

पाण्यात राहून कोणालाही न दिसणे, ही मगरीची ताकत आहे. याचा पुरेपूर फायदा उठवत मगरीने अचानक चित्त्यावर हल्ला केला. हा हल्ला बरोबर तिने मानेच्या खालच्या भागावर केला. आणि चित्त्याला क्षणात पाण्यामध्ये घेऊन गेली. हा सगळा प्रकार चित्त्याचे दोन साथीदार उघड्या डोळ्याने पाहत होते. मात्र ते काहीच करू शकले नाही. अनेक वेळ हे दोघेही आपला साथीदार पाण्यात दिसतो का, हे काठावर थांबून पाहात राहिले. मात्र मगरीने चित्त्याची यशस्वी शिकार करून, आपले भक्ष्य बनवले होते.

Latest sightings या यूट्यूब चैनलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला असून, हा व्हिडिओ आतापर्यंत जवळपास सहा कोटी लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडीओ पाहताना अचानक मगरीने चित्त्यावर केलेला ह ल्ला पाहून, अनेकांच्या काळजाचं पाणी-पाणी होत आहे. हा व्हिडिओ समोरून कोणीतरी शूट केला असून, त्यालादेखील आश्चर्याचा धक्का बसल्याचं, या व्हिडिओत पाहायला मिळत आहे.

हे देखील वाचा Viral video: आई ती आईच..! पिल्लांना कोब्राच्या तावडीतून असं वाचवलं कोंबडीचे; अंगावर शहारे आणणारी ही झुंज एकदा पहाच..

Viral video: पाठलाग करून सापाने भल्यामोठ्या घोरपडीची शिकार केली; हृदयाचे ठोके चुकवणारा हा व्हिडीओ एकदा पहाच..

Viral video: थरारक व्हिडिओ..! मगरीने अफलातून केलेली शिकार पाहून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित; एकदा पहाच..

Viral video: अजगर बिबट्याला जिवंत गिळायला गेलं पण्  तुम्हीच पहा काळजाचं पाणी-पाणी करणारा video

Viral video: गप्पा मारत असताना अचानक पाचही जण गेले जमिनीत; पुढे काय झालं? तुम्हीच पहा व्हिडिओ

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.