Viral video: गप्पा मारत असताना अचानक पाचही जण गेले जमिनीत; पुढे काय झालं? तुम्हीच पहा व्हिडिओ

0

Viral video: माणसाचे आयुष्य हे क्षणभंगुर आहे, हे कोणालाही आज वेगळे सांगण्याची गरज नाही. चालता-बोलता माणसाच्या आयुष्यात कधी काय घडेल, हे कोणीही सांगू शकत नाही. आपल्या अवतीभवती अनेक अशा घटना घडतात, ज्यावर आपला विश्वासही बसत नाही. अशीच एक घटना सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेली आहे. एका दुकानात पाच जण गप्पा मारत असताना अचानक जमिनीत गेल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, अनेकांना यावर विश्वास बसत नाही.

सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडिओंचे व्यासपीठ झालं आहे, हे तुम्ही देखील मान्य कराल. सोशल मीडियावर तुमच्या अवतीभवती घडणाऱ्या अनेक घटनांचे व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर व्हायरल झालेले व्हिडिओ अनेकांना आवडतात, आणि अनेक जण शेअर देखील करतात. खासकरून प्राण्यासंदर्भातले व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस उतरतात. प्राणी एकमेकांची शिकार कशी करतात, हे जाणून घेण्याची अनेकांमध्ये नेहमी उत्सूकता असते.

सोशल मीडियावर प्राणी एकमेकांचे शिकार करत असतानाचे व्हिडीओ पाहून अनेक वेळा आपल्या काळजाचं पाणी पाणी होतं. प्राणी आपले भक्ष्य कसे गिळतात, हे तुम्ही अनेक वेळा पाहिलंही असेल. अशाच प्रकारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र या व्हिडिओत तब्बल पाच जणांना जमीनीने गिळल्याचं पाहायला मिळत आहे.

काय घडलं नेमकं?

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ राजस्थानमधील जसलमेर या ठिकाणचा आहे. जैसलमेर रेल्वे स्थानकापशी एका रस्त्याच्या कडेला एक टायर पंक्चरचे दुकान आहे. या दुकानात चार मित्र एकमेकांशी गप्पा मारत आहेत. तर त्यांच्या शेजारी एक मेकॅनिक टू-व्हीलर दुरुस्त करत असल्याचे दिसत आहे. मेकॅनिकल आणि हे चार जण आपापल्या कामात मग्न असतानाच, अचानक हे पाचही जण जमिनीत जातात.

दुकानात गप्पा मारत असणारे, हे चारही जण दुकानाच्या समोर एका दगडाने झाकलेल्या नाल्यावर उभा असतात. हा नाला दगडाने झाकला गेला असल्याने, या चौघांना आपण उभा राहिलो आहे, त्याखाली नाला आहे, याची कल्पना नव्हती. कदाचित अनेक वर्षांपासून या झाकलेल्या दगडातची मजबूती तपासणी केली नसावी, आणि या चौघांच्या वजनाने हा दगड नाल्यात कोसळतो, याबरोबर हे चौघेही नाल्यात कोसळतात. सोबत टू व्हिलर दुरुस्ती करत असणरा मेकॅनिकल देखील आतमध्ये कोसळतो.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सुरुवातीला नक्की काय घडलं, हे कोणालाही अंदाज लागत नव्हता मात्र, नंतर हा नाला असल्याचं स्पष्ट झालं. विशेष म्हणजे, हे पाचही जण नाल्यात पडले, याबरोबरच या नाल्याच्या कडेला उभी असणारी टुव्हिलर देखील यांच्या अंगावर पडते. या पाचही जणांना फारसा मार लागला नाही. मात्र या नाल्यात पाणी असतं तर मोठी दुर्घटना घडली असती, असं सांगण्यात येतंय. सुदैवाने नाला कोरडा असल्याने, कुठलीही जीवित हानी झाली नाही.

काय म्हणाले नेटकरी?

सोशल मीडियावर व्हायरल झालेली ही घटना सात एप्रिलला घडली असल्याचे सांगण्यात येतंय. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या घटनेनंतर नेटकऱ्यांनी प्रशासनाला जबाबदार धरत जोरदार टीका केली. या नाल्याचे काम खूपच निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे नेटकरी म्हणत आहेत.

हे देखील वाचा Viral video: हादरवून टाकणारा व्हिडिओ..! शरीरातून अचानक बाहेर काढला आत्मा; पुढे काय घडलं तुम्हीच पहा..

Viral video: फोनवर बोलत रेल्वे रूळ करत होती क्रॉस, तेवढ्यात आली ट्रेन पुढे काय झालं? तुम्हीच पहा थरकाप उडवणारा व्हिडिओ..

Viral video: मगरीच्या पाठीवर बसून, डान्स करु लागला वयोवृद्ध व्यक्ती पण पुढे जे घडलं ते पाहून..,” तुम्हीच पहा हा व्हिडीओ..

नालायक पणाचा कळस..! आरोग्य विभागाने आपल्या ट्विटरवर शेअर केली पॉ र्न हबची लिंक..

Yojana: काय आहे शरद पवार ग्रामसमृद्धी योजना? योजनेचा लाभ घेण्यासाठी असा  करा अर्ज आणि मिळवा दोन लाख अनुदान..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.