Viral video: फोनवर बोलत रेल्वे रूळ करत होती क्रॉस तेवढ्यात आली ट्रेन..”, पुढे काय झालं? तुम्हीच पहा थरकाप उडवणारा व्हिडिओ…

0

Viral video: रेल्वे रूळ क्रॉस करताना झालेले अनेक अपघात आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्षात देखील पाहिले असतील. प्लॅटफॉर्म वरून किंवा सिग्नल लागला तरचं, रेल्वे रूळ क्रॉस करा अशा वारंवार सूचना करून देखील, अनेक जण सूचनांचे पालन न करता रेल्वे रूळ क्रॉस करतात. आणि आपला जीव गमावतात. हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. आता या संदर्भातलाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. एक मुलगी फोनवर बोलत रेल्वे रूळ क्रॉस करत असताना व्हायरल झालेल्या या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. मात्र अचानक समोरून ट्रेन येते, आणि मोठा अपघात होतो.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत एक मुलगी फोनवर बोलत प्लॅटफॉर्मवरून खाली उतरल्याचं पाहायला मिळत आहे. ही मुलगी फोनवर बोलतच रेल्वे रूळ क्रॉस करताना पाहायला मिळत आहे. तेवढ्यात समोरून मालगाडी येते. मात्र ही मुलगी किंचितही घाबरत नाही, आणि दोन रूळाच्यामध्ये झोपुन राहते. विशेष म्हणजे, या मुलीच्या अंगावरून मालगाडी जाऊन देखील या मुलीला काहीही होत नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहताना अनेकांच्या काळजाचा थरकाप उडतोय. मात्र ही मुलगी अजिबात घाबरत नाही. अंगावरून ट्रेन गेल्यानंतरही, काहीच झालं नसल्यासारखं ही मुलगी आरामात उठून पुन्हा फोनवर बोलू लागते.

आपल्या अंगावरून ट्रेन गेल्यानंतर, देखील ही मुलगी किंचितही घाबरली नसल्याचे पाहायला मिळत आहे. काहण झालं नाही, या अविर्भावात ही मुलगी ट्रेन अंगावरुन गेल्यानंतर उठून पुन्हा फोनवर बोलू लागते. अनेकांना या घटनेचे आश्चर्य वाटत आहे. मात्र या मुलीला याचा काहीच फरक पडत नसल्याचं दिसत आहे. या मुलीच्या अंगावरुन मालगाडी जात असताना अनेकांच्या काळजाचं पाणी पाणी झालं. मात्र या घटनेला मुलगी किंचितही घाबरली नाही, आणि काही झालं नाही, अशा पद्धतीने निघूनही गेली.

काय घडलं नक्की?

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ, आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना त्यांनी “फ़ोन पर gossip, ज़्यादा ज़रूरी है” असं कॅप्शनही दिलं आहे. एक मुलगी प्लॅटफॉर्मवरून फोनवर बोलत रूळ क्रॉस करत असताना अचानक मालगाडी येत असल्याचं, पाहायला मिळत आहे. समोरून मालगाडी येत आहे, हे पाहून मुलगी किंचितही घाबरली नाही, आणि दोन्हीं रूळाच्यामध्ये जमिनीबरोबर झोपुन राहिली.

अखेर मालगाडी या मुलीच्या अंगावरून जाते, मात्र या मुलीला काहीही होत नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत या मुलीच्या अंगावरून मालगाडी गेल्यानंतर, ही मुलगी काहीच झालं नसल्यासारखं उठून पुन्हा फोनवर बोलत रेल्वे रूळ क्रॉस करत असताना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, या मुलीचं संपूर्ण तोंड स्कार्फने बांधलं होतं. जर स्कार्फ रेल्वेच्या एखाद्या पार्टला अडकला असता, तर मुलीचा हकनाक जी व गेला असता. मात्र एवढं सगळं असून देखील या अपघातातून ती वाचली.

काय म्हणाले नेटकरी

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला असून, हा व्हिडिओ आतापर्यंत एक लाखाच्या आसपास पहिला गेला आहे. या व्हिडिओवर कमेंट करताना अनेकांनी या मुलीचं मानसिक संतुलन बिघडलं असल्याचं म्हटलं आहे. तर एका युजर्सने म्हटलं आहे, काळ आला होता, पण वेळ आली नव्हती. तर काही युजर्सने म्हटले आहे, या मुलीने केलेले धाडस म्हणजे मूर्खपणाचा कळस आहे. मोबाईल एक दिवस माणसाचा जीव घेणार, असं देखील एका युजर्सने कमेंट करताना म्हटलं आहे.

हे देखील वाचा Viral video: मगरीच्या पाठीवर बसून, डान्स करु लागला वयोवृद्ध व्यक्ती पण पुढे जे घडलं ते पाहून तुम्हीच पहा हा व्हिडीओ..

Viral video: सशाची आणि सापाची zunj कधी पाहिलीय का? काळजाचं पाणी-पाणी करणारी ही लढाई एकदा पहाच..

Viral video: पाच वर्षानंतर कुत्र्याने मालकाला पाहिलं अन् फोडला हंबरडा; पुढे जे घडलं ते पाहून तुमच्या डोळ्यातून वाहतील अश्रू..

नालायक पणाचा कळस..! आरोग्य विभागाने आपल्या ट्विटरवर शेअर केली पॉ र्न हबची लिंक..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.