Viral video: पाच वर्षानंतर कुत्र्याने मालकाला पाहिलं अन् फोडला हंबरडा; पुढे जे घडलं ते पाहून तुमच्या डोळ्यातून वाहतील अश्रू…

0

Viral video: सोशल मीडियावर प्राण्यासंदर्भातले अनेक व्हिडिओ नेहमी व्हायरल होत असतात. प्राण्यांच्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून देखील मोठ्या प्रमाणात पसंती मिळते. अनेक जण प्राण्यांचे विविध व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना पाहायला मिळतात. सोशल मीडियाच्या या जमान्यात आपल्या सोबतच घडलेली एखादी घटना देखील कधी सोशल मीडियावर व्हायरल होते, हे आपल्यालाही कळत नाही. प्राणी एकमेकांची शिकार करतानाचे व्हिडीओ आपण नेहमी पाहतो, मात्र प्रेम म्हणजे काय? याचे जिवंत उदाहरण दर्शवणारा, एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, हा व्हिडिओ अनेकांनी विविध प्लॅटफॉर्मवर शेअर देखील केला आहे.

प्राणी आणि मानवाची मैत्री, एकमेकांसोबत असणारा जिव्हाळा, प्रेम हे काही नवीन नाही. या संदर्भातले अनेक व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर अनेकवेळा पाहिले असतील. माणसाप्रमाणेच प्राण्यांना देखील भावना असतात. किंबहुना माणसांपेक्षा जास्त भावना प्राण्यांना असतात, असं आपण अनेकदा ऐकलंही असेल. त्यातल्या त्यात जर मानवाने कुत्र्याला जीव लावला, तर कुत्रा आपल्या मालकासाठी जीव देखील देऊ शकतो, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही.

असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. एक महिला आणि कुत्रा पाच वर्षांनी एकमेकांना भेटल्यानंतर दोघांनी ज्या पद्धतीने हंबरडा फोडला आहे, हे पाहून अनेकांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहतील, अशा प्रकारचे हे दृश्य असल्याचं पाहायला मिळत आहे. एका महिलेने जिवापाड जपलेला कुत्रा अचानक चोरीला जातो. कुत्रा गेल्याने, ही महिला पाच वर्ष कुत्र्याच्या परतीची वाट पाहात बसते. आणि अचानक एक दिवस या महिलेची आणि कुत्र्याची भेट होते. या दोघांची भेट झाल्यानंतरचे, हे दृश्य फारच अफलातून असून, या भेटीचे वर्णन शब्दात करता येणं अशक्य आहे.

काय घडलं नेमकं

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत पाहायला मिळत आहे, एका कंपाऊंडच्या आत अनेक कुत्रे खेळत आहेत. अचानक एका महिलेची कंपाऊंडमध्ये खेळत असणाऱ्या एका कुत्र्यावर नजर पडते. ही महिला आपले सगळे भान हरपून, या कुत्र्याकडे धावताना पाहायला मिळत आहे. कुत्रा देखील कंपाऊंडच्या आतून महिलेला पाहिल्यानंतर तिच्याकडे धावत असताना पाहायला मिळत आहे. “द गुड न्यूज मूव्हमेंट” ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून, या संदर्भात त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

महिला कंपाउंड उघडून आतमध्ये आल्यानंतर, कुत्र्याला जोरदार मिठी मारताना या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. कुत्रा देखील अनेक वर्षांनी आपल्या मालकाला पाहिल्यानंतर, गहिवरून आल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. कुत्रा देखील आपल्या मालकाला जोरदार मिठी मारतो, आणि चाटू लागतो. मात्र कुत्र्यापेक्षा या महिलेची झालेली अवस्था मनाला स्पर्श करून जाणारी आहे. तब्बल पाच वर्षांनी कुत्र्याला पाहिल्यानंतर, या महिलांनी फोडलेला हंबरडा पाहून, व्हिडिओ पाहणाऱ्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहतील असं हे दृश्य आहे.

काय म्हणाले नेटकरी

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या, या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर अनेकांनी शेअर देखील केला आहे. एका यूजर्सने यासंदर्भात कमेंट करताना म्हंटले आहे, या दोघांची झालेली भेट ही खूपच अप्रतिम भेट आहे. तर दुसर्‍या एका युजर्सनी म्हटलं आहे, माणूस प्राण्यांवर एवढा जीव लावू शकतो, यावर विश्वास बसत नाही. तर दुसर्‍या एका युजर्सनी म्हटलं आहे, पाच वर्षानंतरही कुत्रा आपल्या मालकाला ओळखू शकतो, हे केवळ प्रेमामुळे शक्य आहे.

हे देखील वाचा Viral video: समाजाला उपदेश करणाऱ्या या प्रसिद्ध कीर्तनकराची से क्स क्लिप व्हायरल; तुम्हीच पहा हे घाणेरडं कृत्य

Viral video: झाडावरून नदीत उडी घेत, जग्वारने केली मगरीची शिकार; काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल..

Dhananjay Munde heart attack: सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका  ब्रीच कँडी रुग्णालयात..

Whatsapp:वर आलेले मेसेज किंवा न्यूज फेक आहेत हे कसं ओळखायचं? जाणून घ्या सविस्तर..

Yojana: काय आहे शरद पवार ग्रामसमृद्धी योजना? योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज आणि मिळवा दोन लाख अनुदान..

Viral video: रिक्षा अडवायला गेलेल्या पोलिसाला रिक्षाचालकाने हवेत उडवून लावलं; हृदयाचे ठोके चुकवणारी घटना सीसीटीव्हीत कैद..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.