Whatsapp: ‘व्हाट्सअप’वर आलेले मेसेज किंवा न्यूज ‘फेक’ आहेत हे कसं ओळखायचं? जाणून घ्या सविस्तर…

0

Whatsapp: आज प्रत्येकाकडे Whatsapp असल्याचं पाहायला मिळतं. जगात सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग ॲप कोणते असेल, तर ते ‘व्हाट्सअप’ आहे. व्हाट्सअपचे वापरकर्ते एकमेकांना चॅटिंग करण्यासाठी आणि स्वतःची माहिती शेअर करण्यासाठी तसेच अनेक डाक्युमेंट पाठवण्यासाठी वापर करत असतात. या बरोबरच अलीकडच्या काळात आता अनेक जण ‘फेक न्युज’ ( fake news) व्हाट्सअपवर ( whatsapp)  फॉरवर्ड करत असल्याचे देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. मात्र आता तुम्ही न्यूज फेक आहे की नाही, हे सहज तपासू शकता. आज आपण याच विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

‘व्हॉट्सअप’ हे कमालीचे लोकप्रिय असून, अनेक जण याचा वापर ‘चॅटींग’ आणि काही महत्त्वाची ‘डाक्यूमेंट्स’ शेअर करण्यासाठी करत असतात. मात्र अलीकडच्या काळात ‘व्हाट्सअप’चा वापर ‘फेक न्युज’ फॉरवर्ड करण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात केला जातो. फॉरवर्ड केलेल्या या फेक न्युजवर अनेक जण विश्वास देखील ठेवतात. मात्र आता तुम्ही कुठलीही न्यूज किंवा फॉरवर्ड ‘मेसेज फेक’ आहे की नाही, हे सहज तपासू शकता. चला तर मग फेक न्युज आहे की नाही, हे कसं ओळखायचं याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया.

भारतात फेक न्यूज चेक करण्याच्या तब्बल दहा संस्था उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही व्हाट्सअपवर आलेले मेसेज किंवा फेक न्युज आहे की नाही, हे सहज तपासू शकता. इंटरनॅशनल ‘फॅक्ट-चेकिंग नेटवर्क’ (IFCN) द्वारे न्यूज किंवा मेसेज पडताळून पाहिले जातात. आणि यातून फेक न्यूज आहे की नाही, हे स्पष्ट होतं. यामध्ये फोटो, व्हिडीओ, व्हॉइस रेकॉर्डिंग तसेच दिशाभूल करणारे संदेश तुम्ही पडताळून पाहू शकता. मराठी, हिंदी, इंग्रजीसह अनेक भाषांमध्ये आलेल्या फेक न्यूज तुम्ही सहज पडताळून पाहू शकता.

खाली दिलेल्या टिप्स लाईन नंबर वरून तुम्ही फेक न्यूज चेक करू शकता.

एएफपी: +९१ ९५९९९ ७३९८४

न्यूजचेकर: +91 99994 99044

बूम: +91 77009-06111 / +91 77009-06588

फॅक्टली: +91 92470 52470

इंडिया टुडे: +91 7370-007000

फॅक्ट क्रिसेंडो: +91 90490 53770

द हेल्दी इंडियन प्रोजेक्ट: +91 85078 85079

Quint WebQoof: +91 96436 51818

‘व्हाट्सअप’वर आलेले मेसेज किंवा न्यूज चेक करण्यासाठी तुम्ही वरील नंबरचा वापर करू शकता. याशिवाय तुम्ही IFCN च्या WhatsApp चॅटबॉटनुसार चेक करू शकता. जगामधील 70 हून अधिक देशातील संदेश आणि माहिती तुम्ही या ‘संस्था’मार्फत खरी आहे की खोटी आहे तपासू शकता.

आता आपण या नंबरद्वारे ‘फेक न्युज’ कशी चेक करायची हे पाहूया..

सर्वप्रथम तुम्हाला, वरीलपैकी कोणताही मोबाइल नंबर तुमच्या ‘फोनबुक’मध्ये सेव करावा लागला. तुम्ही ‘नंबर’सेव केल्यानंतर, तुम्हाला जो मेसेज किंवा बातमी खरी, आहे की खोटी, हे तपासायचे आहे, ती माहिती तुम्हाला या नंबरवर टाकणे आवश्यक आहे. या नंबरवर तुम्ही संबंधित माहिती किंवा न्यूज टाकल्यानंतर तुम्हाला काही काळ प्रतीक्षा करावी लागेल, हे लक्षात घ्या.

आता आपण फेक न्युज चेक करताना कोणता डाटा आवश्यक आहे हे पाहू…

WhatsApp वर आलेले मेसेज तसेच न्यूज खरी आहे की खोटी, हे तपासण्यासाठी काही महत्वाच्या बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे. ‘फॅक्ट’ चेक करण्यासाठी या संस्था वापरकर्त्याकडून फोटो, व्हिडीओ,व्हॉइस तसेच टेक्स्ट मेसेजची संपूर्ण माहिती मागवत असतात. तुम्हाला ती द्यावी लागते. आणि मग याविषयीची सविस्तर माहिती तुम्हाला उपलब्ध होत असते.

हे देखील वाचा Viral video: समाजाला उपदेश करणाऱ्या ‘या’ प्रसिद्ध कीर्तनकराची से क्स क्लिप व्हायरल; तुम्हीच पहा हे घाणेरडं कृत्य..

Dhananjay Munde heart attack: सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका ब्रीच कँडी रुग्णालयात..

Facebook, WhatsApp वर अनोळखी महिलेशी, मुलींशी बोलताय हे एकदा वाचा, अशी होईल तुमची फसवणूक..

Lifestyle: दररोज से’ ‘क्स’ केल्याने काय होतं माहिती आहे? से क्स विषयी जाणून घ्या सविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.