Facebook, WhatsApp वर अनोळखी महिलेशी, मुलींशी बोलताय हे एकदा वाचा, अशी होईल तुमची फसवणूक..

0

सोशल मीडियामुळे जग आपल्या मुठीमध्ये आल्याचे जरी वाटत असले तरी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. त्यामुळे बरेच तोटे देखील होत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आपण सोशल मीडियावर आपल्या मित्रांशी मैत्रिणींशी बोलत होतो इथपर्यंत ठीक होते. परंतु त्याच व्हॉट्सॲप फेसबुकवर आपण अनोळखी स्त्री, तरूणी यांच्या सोबत बोलत असाल तर हा संपूर्ण लेख तुमच्यासाठी. जर असा प्रकार घडलाच तर काय करायचे?

 

मध्यंतरी एक प्रकरण एका शेतकरी तरुणाच्या बाबतीत घडलेले आपल्याला पहायला मिळाले होते. एक तरुणी त्या शेतकऱ्याला फेसबुकवरून (Facebook) मैत्रीची (Facebook Friend Request) पाठवते. त्यातून दोघे एकमेकांशी बोलायला लागले. त्यानंतर तिने त्या शेतकऱ्याचा व्हॉट्सॲप (WhatsApp) नंबर घेतला. त्यावरून बोलणे चालू झाले. व्हिडिओ कॉल होऊ लागले.

 

पुढे तर तिने त्या तरुणाला कपडे काढण्यास प्रोत्साहित केले. तरुणाने कपडे काढल्याचे व्हिडिओ शूट केला. आता तुम्ही म्हणाल व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल करत असताना व्हिडिओ कसा शूट करता येईल परंतु स्क्रीन रेकॉर्डिंग नावाची सर्व्हिस मोबाईल वर मिळते. ती बऱ्याच लोकांना माहिती नसेल. मग त्या शेतकऱ्याचा उगडा नागडा व्हिडिओ शूट केल्यानंतर ती तरुणी तिच्या लायकीवर आली.

 

त्या शेतकरी तरुणाला तो व्हिडिओ त्या तरुणीने पाठवला व मला पाच हजार पाठव नाहीतर हा व्हिडिओ मी सर्वांना पाठवेल अशी धमकी दिली परंतु त्याला वाटले की हे नाही पाठवणार मग त्याने नकार देताच त्याच्या फ्रेंड लिस्ट मध्ये असलेल्या एक दोन मित्रांना तो व्हिडिओ पाठवून त्याचा स्क्रीनशॉट त्याला पाठवण्यात आला. नाईलाजाने त्या तरुणाने त्या तरुणीला पाच हजार रुपये पाठवले.

 

त्यानंतरही त्या तरुणीने अजून पाच हजार रुपये मागण्यास सुरुवात केली. मग मात्र तरुणाने पोलीस ठाण्यात धाव घेतली. घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितल्यानंतर सायबर पोलिसांनी त्या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यामुळे अशी घटना घडली तर ती कुणालाही पैसे देऊ नका कारण तुम्ही एकदा पैसे दिले तर ते अजून तुम्हाला पैशांची मागणी करू शकतात.

 

एकाच्या बाबतीत तर भलतच घडलं..                        एका तरुणाच्या बाबतीत पण असाच प्रकार घडला. तरुणीने तरुणाच्या फेसबुक अकाऊंटवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली मग काय तरूणी अनोळखी होती तरी तिची मैत्री विनंती (Friend Request) त्याने फेसबुकला स्वीकारली. तरुणीने त्याला मेसेज केला तरुणानेसुध्दा तरुणीला एसएमएस पाठवला. त्याला वाटले आता आपली ही मैत्रीण झाली.

 

मग त्या दोघांचे 4 ते 5 दिवस बोलणे झाले. मग त्या तरुणीने त्याचा व्हॉट्सॲप क्रमांक घेऊन त्याला व्हिडिओ कॉल केला. त्या व्हिडिओ कॉल मध्ये तरूणी नग्न अवस्थेत पाहायला मिळाली. मग तरुणाने 10 सेकंद मध्ये व्हिडिओ कॉल बंद केला असता. पुढील अश्लील व्हिडिओ दुसऱ्या एकाचा त्याच्या पुढे जोडण्यात आला आणि तो व्हिडिओ त्या तरुणाला पाठवून पैशांची मागणी चालू झाली.

 

त्याने पैशाला नकार देताच त्याचा अश्लील बनावट व्हिडिओ त्याच्या फेसबुक वरील मित्रांना पाठवण्यात आला. त्यानंतर तरुणाने पोलीस ठाण्यात लागलीच धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलीस देखील अशा प्रकरणात गुप्तता ठेवतात. त्यामुळे असा काही प्रकार तुमच्या बाबतीत घडला असेल तर कृपया पोलीसांकडे तक्रार करा. कारण एकदा तुम्ही पैसे दिले तरी तुमची सुटका नाही.

 

मित्रांनो आणि अशी फसवणूक होणाऱ्या तरुणांनो आपली लैंगिक भूक सोशल मीडियावर येऊन पूर्ण करण्याचा कधीही विचार करू नका. कारण 90 टक्के तरी तुमचे यामधून नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. एकदा तुमच्या आयुष्यात असा काही प्रकार झाला तर मग तुमच्या कुटुंबाला देखील तुमच्या कर्माची फळे भोगावी लागतात.

 

असा काही प्रकार जर तुमच्या कडून चुकून घडला तर एक गोष्ट लक्षात ठेवा. लगेच आपले फेसबुक खाते डिलीट करून टाकायचे किंवा जे कोणी तुमची फसवणूक करत आहे त्याला Unfriend करून आपले फेसबुक प्रोफाईल लॉक करून टाकायचे. जेणेकरून तुमचे फेसबुकला असलेले मित्र त्या व्यक्तीला दिसणार नाहीत.

 

असा प्रकार घडू नये यासाठी काय काळजी घ्यावी:  सोशल मीडियावर म्हणजे फेसबुक, व्हॉट्सॲप किंवा इंस्टाग्रामवर अनोळखी व्यक्तींशी संपर्क टाळा.एखादी तरुणी, महिला आपली तिच्याशी काहीही ओळख नसताना आपल्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्यावी. एखाद्या तरुणीला किंवा स्त्रीला व्हिडीओ कॉल्स, अश्लील संवाद करूच नये. जर पैशांची मागणी झाल्यास लागलीच नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करा.

 

आमचा हा लेख तुमच्या तुमच्या जिवाभावाच्या माणसांना पाठवा. तुम्ही बाप असाल तर मुलाला पाठवा. कारण आता तुम्ही मुलांशी खुलेपणाने बोलणं गरजेचं आहे. तुमच्या मित्रांना पाठवा आणि सर्वांना सावध करा. कारण अशा झालेल्या बदनामीमुळे बऱ्याच लोकांनी आत्महत्यासारखे पाऊल उचलले आहे. आयुष्यात अशा चुकाच करू नका. क्षणिक मोहाला बळी पडू नका.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.