Viral video: सशाची आणि सापाची ‘झुंज’ कधी पाहिलीय का? काळजाचं पाणी-पाणी करणारी ही लढाई एकदा पहाच..

0

Viral video: सोशल मीडियावर प्राण्यासंदर्भातले नवनवीन व्हिडीओ रोजच तुफान व्हायरल होत आहेत. नेटकऱ्यांना देखील हे व्हिडिओ जाम आवडत असल्याचे पाहायला मिळत आहे. प्राण्यांच्या जीवनशैली विषयी जाणून घेणं प्रत्येकाला आवडत असतं. अनेक बलाढ्य प्राणी शिकार करतानाचे व्हिडिओ आपण नेहमी पाहतो. मात्र ताकतवान प्राण्यांना देखील काही प्राणी पराभूत करत असतात, असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत ससा आणि सापाची जबरदस्त झुंज पाहायला मिळत आहे.

साफ हा अतिशय घातक प्राणी म्हणून ओळखला जातो. सापाला आपण लांबून पाहिलं तरी आपल्या काळजाचं पाणी-पाणी होतं. आपल्या ताकदीच्या जोरावर साप अनेकांना धोबीपछाड करतो. सापाच्या कोणी फारसा नादी लागत नाही. मात्र एक छोटा ससा चक्क भल्यामोठा सापाला भिडला. सोशल मीडियावर या दोघांच्या झुंजीचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून, यात साप आपला जीव वाचवून पळून जाण्याचा प्रयत्न करतानाही पाहायला मिळत आहे.

अनेकांना या घटनेवर विश्वास बसणार नाही, मात्र हे खरे आहे. अनेकांना प्रश्न पडला असेल, साप सशाला कसा काय ऐकेल. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ एका रस्त्याच्या बाजूला भला मोठा ससा सापाची पळताभुई करत असताना पाहायला मिळत आहे. अनेकांनी हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर शेअर केला असून, यावर कमेंट देखील केल्या आहेत.

काय घडलं नेमकं

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत एका रस्त्याच्या कडेला एक ससा आणि सापाची झुंज सुरू असताना पाहायला मिळत आहे. तसं पाहायला गेलं तर, ससा हा प्रचंड भित्रा प्राणी म्हणून ओळखला जातो, मात्र हा ससा चक्क सापाला भिडल्याचं या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. सशाची आणि सापाची झुंज सुरु असताना साप आपला जीव वाचवून पळून जात करताना पाहायला मिळत आहे.

ससा मात्र पळून जाणाऱ्या सापाला आपल्या तोंडाने पुन्हा वडून आणत जोरदार झिंजाडताना पाहायला मिळत आहे. ससा आणि साप या दोघांमध्ये सुरू असलेली झुंज फारच आक्रमक सुरू असल्याचे दिसत आहे. सापाला काही कळायच्या आत ससा आपल्या तोंडात पकडून वाऱ्याचा वेगासारखा झिंजाडताना दिसून येत आहे. साप बिचारा आपला जीव वाचवून कल्टी मारताना देखील या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला असून, कमेंट्स देखील भन्नाट केल्या आहेत.

काय म्हणाले नेटकरी

ससा आणि सापाच्या या झुंजीचा व्हिडीओ predator.unity या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ जवळपास पन्नास हजाराच्या आसपास पहिला गेला आहे. सुरुवातीला हा व्हिडिओ पाहताना अनेकांच्या काळजाचं पाणी होत असल्याचे देखील पाहायला मिळत आहे. या व्हिडिओवर कमेंट करताना एका युजर्सने म्हटलं आहे, ‘किलर रॅबिट’ तर दुसरा एका युजर्सने म्हटलं आहे, Killer Bunny. like the one in Monty python.

हे देखील वाचा Viral video: पाच वर्षानंतर कुत्र्याने मालकाला पाहिलं अन् फोडला हंबरडा; पुढे जे घडलं ते पाहून तुमच्या डोळ्यातून वाहतील अश्रू..

Viral video: रानडुकराची शिकार कराय गेली वाघीण, रानडुकरानेही केला जोरदार प्रतिकार; पण शेवटी..

यावर क्लिक करून पहा व्हिडिओ 

Viral video: सिंहाच्या जबड्यातून झेब्राच्या पिल्लाला आईने कसं वाचवलं? व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल आई आईच असते..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.