Viral video: केक खाल्ला नाही म्हणून लग्न मंडपातच नवरा आणि नवरीची तुफान मारामारी; पहा viral video..

0

Viral video: सोशल मीडियावर कधीही काहीही व्हायरल होऊ शकतं, हे आपल्याला वेगळे सांगण्याची गरज नाही. प्राण्यासंदर्भातले तर रोज नवनवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतातच, मात्र इतरही काही मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर आता व्हायरल होऊ लागले आहेत. लग्नासंदर्भातले देखील व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत असून, या व्हिडिओंना अनेक जण विविध प्लॅटफॉर्मवर शेअर देखील करत आहेत. आता या संदर्भातलाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर वायरल झालेल्या व्हिडिओत लग्नसमारंभात स्टेजवर वधू आणि वरामध्ये किरकोळ कारणावरून जोरदार भांडण झालं. या भांडणाचे तुफान मारामारीत रूपांतर झाल्याचा हा व्हिडिओ आहे. वधू आणि वर दोघांनी एकमेकांना हार घातल्यानंतर वधू वराला केक सारखा पदार्थ चारताना पाहायला मिळत आहे. मात्र वराचे लक्ष कॅमेराकडे असते. वधू थोडा वेळ वाट पाहते, मात्र तरीदेखील वरचं लक्ष कॅमेऱ्याकडे असल्याचे पाहून वधूचा पारा चढतो.

लग्नात आपण पाहतो, अनेकदा आपल्या मनासारख्या काही गोष्टी होत नाहीत, आणि अनेकदा आपल्याला कॉम्प्रोमाईज करावं लागतं. मात्र व्हायरल झालेल्या व्हिडिओत एका किरकोळ कारणामुळे वधु प्रचंड संतापते. आपल्या होणाऱ्या नवऱ्याने फक्त केक खाल्ला नाही म्हणून, वधूने चक्क केक होणाऱ्या नवऱ्याच्या तोंडाला चोळला. किरकोळ कारणासाठी आपल्या होणाऱ्या पत्नीने, आपल्या तोंडाला केक चोळल्याने, वराचा पारा देखील प्रचंड चढला. पुढे जे घडलं हे पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

काय घडलं नेमकं?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत लग्नसमारंभात स्टेजवर पती-पत्नी एकमेकांना हार घातल्यानंतर पत्नी आपल्या नवऱ्याला केक चारताना पाहायला मिळत आहे. मात्र वधूकडे वराच लक्ष नसल्याचे व्हिडिओत दिसत आहे. यामुळे वधू प्रचंड संतापली. आणि हातात असणारा केक चक्क वराच्या तोंडाला चोळला. वधूने वरच्या तोंडाला केक चोळल्याने वराचा पारा चढला, आणि वराने वधूच्या थेट कानशिलात लगावल्याचं या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. आपल्या कानाखाली वराने मारल्यानंतर वधू देखील गप बसली नाही, तिने देखील वराच्या थेट मुस्काटात मारली.

प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही, तर पुन्हा एकदा वराने वधूच्या कानशिलात लगावली. त्यानंतर पुन्हा वधूने वराचं थोबाड रंगवलं. अशाप्रकारे दोघांनीही एकमेकांसोबत जोरदार मारामारी केली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओतड दोघेही मारामारी करत असताना समोर एक महिला हातात ताट घेऊन, हा सगळा प्रकार पाहत आहे. मात्र त्या दोघांना सोडवताना दिसत नाही. याउलट ती या दोघांच्या मारामारीची मजा घेत, हसत देखील असल्याचं दिसत आहे.

only._.sarcasm_ या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून, हा व्हिडिओ अनेकांनी शेअर देखील केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, हा व्हिडिओ पाहून अनेक जण मजा घेत आहेत. एका युजर्सने व्हिडिओ खाली कमेंट करताना लिहिले आहे, आजच मारून टाकणार आहे की काय? सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओची सत्यता अद्याप समोर आली नाही, मात्र हा व्हिडीओ अभिनयासाठी बनवला गेला असल्याचं, बोललं जात आहे. या व्हिडिओखाली दोघांचाही अभिनय पाहायला मिळत असल्याचं युझर्सने म्हटलं आहे.

PM kisan: ऑनलाईन e-KYC प्रक्रिया पुन्हा सुरू; 31 तारखेपर्यंत करा e-KYC अन्यथा ३मे ला जमा होणार नाही अकरावा हप्ता..

KCC: पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना आता ग्रामपंचायतमध्येच मिळणार किसान क्रेडिट कार्ड; जाणून घ्या सविस्तर..

Flipkart Month-End Mobiles Fest: Flipkart ची करामत! २२ हजाराचा सॅमसंगचा हा फोन केवळ सहा हजारांत..

Viral video: मुलीच्या डोक्यात साप शिरल्याने उडाला गोंधळ; मुलगीही न घाबरता सापाला काढू लागली बाहेर पण..

NPC Recruitment 2022: बारावी आणि पदवीधर विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! जाणून घ्या सविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.