PAN Card Apply Online: घरबसल्या तुमच्या मोबाईलवर पॅन कार्ड कसं काढाल? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत.. 

0

PAN Card Apply Online: पॅन कार्ड शिवाय कुठलाही आर्थिक व्यवहार करता येत नाही, हे कोणालाही वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि म्हणून पॅन कार्डचे ( Pan card) महत्व खूप आहे. अनेकजण ‘पॅन कार्ड’ काढण्यासाठी धडपड करत असतात. पूर्वी पॅन कार्ड काढण्यासाठी अनेकांना खूप त्रास सहन करावा लागत होता. परंतु आता पॅन कार्ड काढणे सहज शक्‍य झालं आहे तेही विनाखर्च आणि घरबसल्या. मात्र याविषयी फारसं कोणाला माहिती नाही. आणि म्हणून आज आम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवर आधारकार्डच्या मदतीने PAN Card कसं काढायचं? हे सविस्तर सांगणार आहोत. 

सर्वप्रथम आपण पॅन कार्ड म्हणजे काय हे जाणून घेऊया..

इन्कम टॅक्स (income tax department) विभागाकडून प्रत्येक नागरिकाला दहा अंकी क्रमांक दिला जातो. हा दहा अंकी क्रमांक ‘कायम खाते क्रमांक’ म्हणून दिला जातो. म्हणजेच परमनंट अकाऊंट नंबर (Permanent Account Number) असतो. इन्कम टॅक्स विभाग तुम्हाला दिला जाणारा कायम खाते क्रमांक म्हणजे, परमनंट अकाऊंटमुळे तुमच्या सगळ्या आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवण्याचे काम करत असते. आता आपण पॅन कार्ड काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे पाहूया..

असा करा ऑनलाईन अर्ज (Free PAN Card Apply Online)

पॅन कार्ड काढण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. इन्कम टॅक्स डिपारमेंटच्या अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला ‘न्यू पेन’ साठी अर्ज करावा लागेल. यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकावा लागणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे. याचे कारण म्हणजे, पॅन कार्डसाठी अर्ज करताना केवायसी पूर्ण करण्यासाठी आधार कार्डशी लिंक असणाऱ्या मोबाईलवर ओटीपी पाठवला जातो.

आता आपण ऑनलाईन अर्ज ‘स्टेप-बाय-स्टेप’ कसा करायचा हे सविस्तर जाणून घेऊ..

सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या क्रोमवर जाऊन https://www.incometax.gov.in/iec/foportal असं सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर आयकर विभागाचे अधिकृत वेबसाइट ओपन झालेली दिसेल.

आयकर विभागाची अधिकृत वेबसाइट ओपन झाल्यानंतर उजव्या बाजूला तुमच्या समोर ‘Instatant PAN Card Adhaar’ हा ऑप्शन पाहायला मिळेल. तुम्हाला बरोबर यावर ‘क्लिक’ करायचं आहे. ‘Instatant PAN Card Adhaar’ पर्यायावर क्लिक केल्यानंतर त्याच्यासमोर दोन पर्याय ओपन झालेले दिसतील, त्यापैकी तुम्हाला ‘get new pancard’ या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

‘get new pancard’ या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुमच्या समोर ओपन झालेल्या पर्यायवर ‘aadhar card’ क्रमांक टाकावा लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला समोर ‘कॅप्च्या’ या रकान्यात कॅप्च्या कोड किंवा अक्षरे दिसतील, ती व्यवस्थित टाकायची आहेत.

यानंतर ‘सबमिट’ या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, आधार कार्डशी लिंक असणाऱ्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल. त्यानंतर तुम्हाला ओटीपी व्हेरिफाय करुन, आधार डिटेल प्रमाणित करावी लागणार आहे. यानंतर तुम्हाला तुमचे pancard डाऊनलोड (PAN Card Download) करता येऊ शकणार आहे.

हे देखील वाचा Viral video: माणसांप्रमाणे प्राणी देखील ठेवतात संबंध; २ कोटी ७० लाख लोकांनी पाहिलेल्या या व्हिडीओत आहे तरी काय? पहा तुम्हीच..

Pancard: दोन दिवसांत पॅन कार्ड आधारशी लिंक करा, नाहीतर भरावा लागेल दहा हजार दंड; फक्त एक मेसेज पाठवून करु शकता लिंक..

Air India AIASL Recruitment 2022: टाटा समुहाच्या एअर इंडियात विविध पदांसाठी मेगा भरती; असा करा अर्ज..

Hero MotoCorp: दुचाकीस्वारांची पेट्रोलच्या खर्चातून होणार सुटका; आता Hero Splendor इलेक्ट्रिक रूपात..

MahaGenco Recruitment: महाराष्ट्र राज्याच्या विद्युत कंपनीत मेगा भरती; जाणून घ्या सर्व डिटेल्स आणि करा असा अर्ज..

Viral video: मृत्यूच्या जाळ्यातून आईने वाचवलं लेकरू; मन सुन्न करणारा हा व्हिडिओ एकदा पहाच..

Viral video: स्टोअर रुममध्ये से क्स करताना मुख्याध्यापक आणि शिक्षिकेला गावकऱ्यांनी पकडले रंगेहाथ; तो व्हिडिओही झाला व्हायरल.. 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.