Viral video: मृत्यूच्या जाळ्यातून आईने वाचवलं लेकरू; मन सुन्न करणारा हा व्हिडिओ एकदा पहाच..

0

Viral video: सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत आहेत. सोशल मीडियाचे वापरकर्ते असंख्य असल्याने, आपल्या आसपास घडणाऱ्या, अनेक घटनांचे व्हिडिओ लगेचच व्हायरल होतात. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंना मोठ्या प्रमाणात लाईक्स करून अनेकजण विविध प्लॅटफॉर्मवर शेअर देखील करतात. सोशल मीडियावर व्हायरल झालेले व्हिडिओ अनेकदा काळजाचा थरकाप करून टाकणारे असतात. तर कधी मन सुन्न करणारे, देखील असतात. आता असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

आईसाठी लेकरू किती प्रिय असतं, हे शब्दात व्यक्त करता येणं अशक्य आहे. जगात सर्वात जास्त प्रेम आई आपल्या लेकरावर करत असते. आपल्या लेकरासाठी स्वतःचा जीव देखील द्यायला आई मागेपुढे पाहत नाही. हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मग आई कोणाचीही असो. अगदी प्राण्यांची आई असली, तरी देखील अनेकदा आपल्या लेकरासाठी जीव देत असल्याच्या घटना आपण अनेक वेळा पाहिल्या, वाचल्या, ऐकल्या असतील. गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्या लेकरावर मगर ह ल्ला करत असताना हरणाने कसं वाचवलं होतं, यासंदर्भातला व्हिडीओ तुम्ही पाहिला असेल. आईसाठी लेकरू किती प्रिय असतं, हे सांगणाराच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

रोड ॲक्सिडेंट हे आपल्यासाठी काही नवीन नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओत देखील अशाच एका हायवेवरून टू-व्हीलरवर फॅमिली जात असताना त्यांचा एक्सीडेंट झाला‌. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा एक्सीडेंटचा व्हिडिओ पाहताना अनेकांच्या काळजाचं पाणी पाणी होतं. एका टू-व्हीलरवर दोन नवरा-बायको आणि त्यांचं एक लेकरू प्रवास करत असताना अचानक एका फोर व्हीलरला धक्का बसतो, आणि गाडीचा बॅलन्स बिघडतो.

टू-व्हिलरचा बॅलन्स बिघडल्याने, पाठीमागे बसलेली मायलेकरं रस्त्यावर पडतात. तेवढ्यात समोरून भरधाव वेगाने ट्रक येत असतो. आणि बरोबर हे दोघेही ट्रकच्या चाकामध्ये पडतात, मात्र त्यापुढे जे घडतं त्यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही.

काय घडलं नेमकं? 

व्हायरल झालेल्या व्हिडिओत एका हायवेने मोटरसायकलीवर नवरा-बायको आणि त्यांचे छोटे लेकरू प्रवास करत असताना दिसत आहे. हायवेवर अनेक वाहने येत-जात असल्याने, अचानक एका फोर-व्हीलरचा धक्का या टू-व्हीलरला बसतो. जोरदार धक्का बसल्याने टू-व्हिलरचा बॅलन्स बिघडतो, आणि पाठीमागे बसलेली माय लेकरं जमिनीवर पडतात. टू-व्हीलरचा वेग कमी असल्याने, पडल्यानंतर यांना फारसं लागल्याचं दिसत नाही, मात्र हे दोघेही पडल्यानंतर क्षणात समोरून भरधाव वेगाने ट्रक जात होता.

जमिनीवर पडल्यानंतर भरधाव वेगाने समोरून येणाऱ्या ट्रकच्या दोन्हीं चाकांच्या मधेच पडल्याने, व्हिडिओ पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहतो. सोशल मीडियावर व्हायरल, झालेल्या व्हिडिओत आई ट्रकच्या थोडसं बाजूला पडते, मात्र आईच लेकरू चाकांच्या बरोबर मध्येच पडल्याचं दिसतं. मात्र पुढे आईने जे केलं त्यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. लाईट येते तेवढ्या वेगाने आईने आपले लेकरु अंगाभोवती लपेटून पलटी मारली. आणि मोठा अनर्थ टळला. लेकरावर आईने पुन्हा एकदा आपला जीव ओवाळून टाकल्याचं हे जिवंत उदाहरण या व्हिडिओतून पाहायला मिळालं.

व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया देताना आईचं कौतुक केलं. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ आत्तापर्यंत 50 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर दोन लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाईक देखील केला आहे. या व्हिडिओ खाली कमेंट करताना अनेकांनी आई पेक्षा मोठं या जगात कोणीही नसल्याचे म्हटले आहे. तर काहींनी KGF-2 चा “इस दुनियामें सबसे बडी योद्धा मा होती है” हा डायलॉग लगावला आहे. @vibeforvids या ट्विटर अकाउंट वरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

हे देखील वाचा Ration Card: आता या लोकांचे रेशन कार्ड होणार बंद! सरकारचा महत्वपूर्ण निर्णय 

MahaGenco Recruitment: महाराष्ट्र राज्याच्या विद्युत कंपनीत मेगा भरती; जाणून घ्या सर्व डिटेल्स आणि करा असा अर्ज..

Viral video: अटक कराय गेले अन् आरोपींसोबतच मटन खाऊन आले; खाकी वर्दीला काळिमा फासणारी घटना..

Viral video: स्टोअर रुममध्ये से ;क्स करताना मुख्याध्यापक आणि शिक्षिकेला गावकऱ्यांनी पकडले रंगेहाथ; तो व्हिडिओही झाला व्हायरल.. 

Viral video: केक खाल्ला नाही म्हणून लग्न मंडपातच नवरा आणि नवरीची तुफान मारामारी; पहा viral video..

Viral video: चरत असणाऱ्या उंटाला विनाकारण मारलं काठीने; संतापलेल्या उंटाने ताणून मालकाचा केला भुगा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.