India Post Recruitment 2022: पोस्ट ऑफिसमध्ये ३९ हजार पदांची मेगा भरती; दहावी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी! परिक्षेविना ‘अशी’ केली जाणार निवड..

0

India Post Bharti:India Post Recruitment 2022: जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल आणि दहावीत तुम्हाला चांगली टक्केवारी असेल, तर तुमच्यासाठी भारतीय डाक ऑफिसमध्ये नोकरी करण्याची सुवरणसंधी आहे. अनेकांची कोरोणामुळे गेली दोन वर्ष वाया गेली. अनेकांना घरातच बसून राहावे लागले. एवढेच नाही तर, अनेकांना चांगल्या पगाराची नोकरी देखील गमवावी लागली. कोरोनामुळे अनेक क्षेत्रातील कामकाज ठप्प झाले. अनेक सरकारी भरतीला देखील खीळ बसली. मात्र आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे.

आता अनेक प्रायव्हेट आणि सरकारी क्षेत्रात देखील नोकर भरती मोठ्या प्रमाणात केली जात असल्याचे दिसत आहे. घरच्या परिस्थितीमुळे अनेकांना लहान वयातच नोकरी करावी लागते. अगदी काहीजण दहावी झाल्यावर नोकरीच्या शोधात असतात. आता अशा मुलांसाठी भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी आहे. भारतीय पोस्ट ऑफिसने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार पोस्ट ऑफिसमध्ये ग्रामीण डाक सेवक (GDS) या पदासाठी तब्बल 38926 पदांची भरती प्रकिया पार पडणार आहे. जर तुम्ही भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करू इच्छित असाल, तर तुम्ही ऑनलाईन अर्ज करून या नोकरीचा लाभ घेऊ शकता. आता आपण या भरतीची साविस्तर माहिती घेऊया..

सर्व राज्यांत केली जाणार भरती

भारतीय पोस्ट ऑफिसने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ग्रामीण डाक सेवक (GDS) या पदांसाठी देशातील सर्वच राज्यामध्ये ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. जे उमेदवार या पदासाठी पात्र असतील, आणि ज्यांना या नोकर भरतीचा लाभ घ्यायचा आहे, अशा उमेदवारांनी भारतीय पोस्ट ऑफिसच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करायचे आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांची वयोमर्यादा ४० ठेवण्यात आली आहे. आता आपण या भरती प्रक्रियेसाठी निवड कशी केली जाणार याविषयी सविस्तर जाणून घेऊया..

दहावीच्या टक्केवारीवर होणार निवड

भारतीय पोस्ट ऑफिसने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, पोस्ट ऑफिसमध्ये ग्रामीण डाक सेवक (GDS) या पदासाठी केली जाणारी भरती ही दहावीच्या टक्केवारीवर होणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छूक उमेदवारांनी indiapostgdsonline.gov.in या भारतीय डाक ऑफिसच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचे आहेत. अर्ज केलेल्या उमेदवारांची कोणतीही परीक्षा न घेता, दहावीच्या टक्केवारीच्या आधारे एक गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे. ज्या उमेदवारांना सर्वाधिक टक्केवारी आहे, अशांची निवड या भरती प्रक्रियेत होणार आहे.

अर्ज करण्याची मुदत आणि अर्ज कसा कराल?

भारतीय पोस्ट ऑफिसने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, पोस्ट ऑफिसमध्ये ग्रामीण डाक सेवक (GDS) या पदासाठी केल्या जाणाऱ्या भरती प्रक्रियेची मुदत ही कालपासून सुरू झाली असून, 5 जून 2022 पर्यंत उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी indiapostgdsonline.gov.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचे आहेत. तुमच्या मोबाईलवर क्रोमवर जाऊन तुम्ही indiapostgdsonline.gov.in असं सर्च केल्यानंतर भारतीय पोस्ट ऑफिसची अधिकृत वेबसाईट ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

पगार आणि अट?

भारतीय पोस्ट ऑफिसने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, पोस्ट ऑफिसमध्ये ग्रामीण डाक सेवक (GDS) या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना १२ हजार रुपये दरमहा पगार मिळणार आहे. पोस्टमास्तर (BPM), असिस्टंट पोस्टमास्तर (ABPM) या पदासाठी बारा हजार पगार मिळणार आहे. तर असिस्टंट पोस्टमास्तरसाठी दहा हजार पगार मिळणार असल्याचं अधिसूचनेत म्हंटले आहे.

अटी: भारतीय पोस्ट ऑफिसने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, पोस्ट ऑफिसमध्ये ग्रामीण डाक सेवक (GDS) या पदासाठी निवड करताना उमेदवाराला सायकल चालवता येते की नाही, याचा देखील विचार करण्यात येणार आहे. तर तुम्हाला स्कूटर किंवा सायकल चालवता येत असेल, तर तुम्हाला या भरती निवडीत प्राधान्य मिळणार आहे. दहावीच्या सर्वाधिक टक्केवारी बरोबरच या नोकर भरतीत निवड करताना याचा देखील विचार होणार आहे.

हे देखील वाचा Flipkart Big Saving Days Sale: फ्लिपकार्टचा धूम धडाका! नवीन स्मार्टफोसह सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर तब्बल 80 टक्‍क्‍यांपर्यंत डिस्काउंट..

HURL Recruitment: ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! चाचणी, ग्रुप चर्चा आणि मुलाखतद्वारे केली जाणार निवड: जाणून घ्या अधिक..

Viral Video: हळदी कार्यक्रमात मुलगा पडला मुलीच्या प्रेमात; नाचत नाचत हातवारे करून असा दिला मोबाइल नंबर..

Ration Card: आता या लोकांचे रेशन कार्ड होणार बंद! सरकारचा महत्वपूर्ण निर्णय 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.