HURL Recruitment: ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! चाचणी, ग्रुप चर्चा आणि मुलाखतद्वारे केली जाणार निवड: जाणून घ्या अधिक..

0

HURL Recruitment: जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट असाल आणि नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. ‘हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेड’ (Hindustan Urvarak & Rasayan Limited) या कंपनीने भरती प्रक्रिये संदर्भात अधिसूचना जारी केली आहे. या कंपनीने अनेक विभागामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. जर तुम्ही या कंपनीत नोकरी करण्यास इच्छुक असाल, तर तुम्ही 11 मेपर्यंत अर्ज करू शकता. चला तर मग या भरती प्रक्रियेसंदर्भात आपण सविस्तर जाणून घेऊया..

हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेड (Hindustan Urvarak & Rasayan Limited) या कंपनीमध्ये इच्छुक उमेदवारांना 11मे 2022 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. या कंपनीने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार उमेदवारांना व्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक तसेच मुख्य अधिकारी या पदांसह 179 पदांवर नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. आता आपण या भरती प्रक्रियेत उमेदवारांसाठी काय पात्रता असणार आहे, याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

या पदांसाठी केली जाणार भरती

हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेड (Hindustan Urvarak & Rasayan Limited) या कंपनीने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, चीफमॅनेजर या पदासाठी 14 जागा भरण्यात येणार आहेत. तसेच मॅनेजर या पदासाठी तब्बल 36 जागा भरण्यात येणार आहेत. असिस्टंट मॅनेजर 57 जागांसाठी भरती केली जाणार आहे. ऑफिसर या पदासाठी २९ जागांची निवड करण्यात येणार आहे. इंजिनिअर या पदासाठी 42 जागांची निवड केली जाणार आहे. आणि या कंपनीच्या सेक्रेटरी पदासाठी एक जागा भरण्यात येणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी काय आहे शैक्षणिक पात्रता 

हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेड (Hindustan Urvarak & Rasayan Limited) या कंपनीत अर्ज मागवण्यात आलेल्या उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेचा विचार करायचा झाल्यास, उमेदवार कुठल्याच मान्यताप्राप्त संस्थेकडून बीएससी(B.Sc) एमएससी(M.Sc) एमबीए (MBA) PGDBM आणि PGDM या पदव्या संपादन केलेल्या असणे आवश्यक आहे. अभियंतासाठी देखील मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त करणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसंदर्भातली अधीसूचना वेबसाईटवर जाऊन पाहू शकता.

वयोमर्यादा आणि निवडीचा निकष

मुख्य व्यवस्थापक या पदासाठी वयाची मर्यादा ४५ वर्षे ठेवण्यात आली आहे. तर व्यवस्थापक या पदासाठी ४० वर्षे वयाची मर्यादा असणार आहे. तसेच सहाय्यक व्यवस्थापक आणि अधिकारी या पदासाठी ३५ वर्ष तर अभियंता या पदासाठी ३० वर्षे आणि कंपनीच्या सचिव या पदासाठी ४५ वर्षे वयोमर्यादा असणार आहे. आता आपण या पदांच्या निवडीचा निकष काय आहे? हे जाणून घेऊयात. 

या पदांसाठी निवडण्यात येणाऱ्या उमेदवारांची निवड संगणक आधारित चाचणीद्वारे तसेच गट चर्चा, आणि वैयक्तिक मुलाखतीच्या आधारावर केली जाणार आहे. उमेदवारांची मुलाखत ही ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्समार्फत घेतली जाईल.

कसा कराल अर्ज?

हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेड (Hindustan Urvarak & Rasayan Limited) या कंपनीत नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी HURL च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन या भरती प्रयेसाठी अर्ज करणे आवश्यक आहे. सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये क्रोमवर जाऊन https://hurl.net.in/ असं सर्च करायचं आहे. त्यांनतर तुम्ही ओपन झालेल्या अधीकृत वेबसाइटवर या भरती प्रक्रियेची अधिसूचना पाहू शकता. अधिसूचना पाहिल्यानंतर तुम्ही नोकरीसाठी अर्ज देखील करू शकता. अर्ज भरण्याची शेवटची तारीख ११ मे देण्यात आली आहे.

हे देखील वाचा MahaGenco Recruitment: महाराष्ट्र राज्याच्या विद्युत कंपनीत मेगा भरती; जाणून घ्या सर्व डिटेल्स आणि करा असा अर्ज..

BRO Recruitment:10वी आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या सविस्तर..

Flipkart Big Saving Days Sale: फ्लिपकार्टचा धूम धडाका! नवीन स्मार्टफोसह सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर तब्बल 80 टक्‍क्‍यांपर्यंत डिस्काउंट..

Viral Video: हळदी कार्यक्रमात मुलगा पडला मुलीच्या प्रेमात; नाचत नाचत हातवारे करून असा दिला मोबाइल नंबर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.