Flipkart Big Saving Days Sale: फ्लिपकार्टचा धूम धडाका! नवीन स्मार्टफोसह सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर तब्बल 80 टक्‍क्‍यांपर्यंत डिस्काउंट..

0

Flipkart Big Saving Days Sale: ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक ई-कॉमर्स वेबसाइट नेहमी सेलचं आयोजन करत असतात. अनेक ई-कॉमर्स वेबसाइटने आयोजित केलेल्या सेलकडे ग्राहक देखील आकर्षित होताना पाहायला मिळते. सगळ्यात जास्त ग्राहक ऑनलाइन शॉपिंग करण्यासाठी फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटचा वापर करताना दिसून येतात. फ्लिपकार्ट देखील आपल्या ग्राहकांसाठी नेहमी सेलचं आयोजन करत असतं. आता पुन्हा एकदा फ्लिपकार्डने Flipkart Big Saving Days Sale चे आयोजन केले आहे.

फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल, ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर ३ मे ते ८ मे दरम्यान हा बिग सेव्हिंग डेज सेल पार पडणार आहे. जर तुम्ही नवीन काही उत्पादन खरेदी करणार असाल, तर तुमच्यासाठी हा सेल खूप महत्वाचा ठरणार आहे. ‘फ्लिपकार्ट बिग सेविंग डेज सेल’मध्ये अनेक उत्पादकांवर मोठी सूट देण्यात आली आहे. यामध्ये अनेक नवीन स्मार्टफोन बरोबरच तुम्हाला फ्रीज, टीव्ही इत्यादी घरगुती उपकरणे मोठ्या सवलतीतमध्ये खरेदी करता येणार आहेत. या सेलमध्ये कोणकोणत्या वस्तू तुम्हाला सवलतीत खरेदी करता येणार आहेत, ते आपण सविस्तर जाणून घेऊ..

फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये या वस्तूंवर मोठी सूट

तुम्ही स्मार्टफोनचे चाहते असाल, तर तुम्हाला या सेलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक विकले जाणारे, नवीन स्मार्टफोन भन्नाट ऑफर्समध्ये खरेदी करता येणार आहेत. जर तुम्ही सॅमसंगचा स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असाल, तर तुम्हाला samsung smartphone  कमालीच्या डिस्काउंटमध्ये खरेदी करता येणार आहे. सॅमसंग शिवाय तुम्हाला POCO तसेच iphone देखील ऑफर्समध्ये खरेदी करता येणार आहे. फ्लिपकार्टने आयोजित केलेल्या सेलमधे तुम्हाला, नो कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज ऑफरचा देखील लाभ घेता येणार आहे.

स्मार्टफोन बरोबरच फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये तुम्हाला घरगुती उपकरणांवर देखील कमालीचा डिस्काउंट मिळणार आहे. टीव्ही आणि घरगुती उपकरणांच्या खरेदीबाबत बोलायचं झाल्यास, तुम्हाला तब्बल 75 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. Flipkart वर हा सेल आज रात्री १२ पासून सुरू होणार आहे. तर आठ तारखेला संपणार आहे. त्यामुळे तुम्हाला घरगुती उपकरणे खरेदी करायची असतील तर, तुम्ही फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये खरेदी करू शकता.

जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करणार असाल, तर तुमच्यासाठी या सेलमध्ये तब्बल 80 टक्‍क्‍यांपर्यंत डिस्काऊंट देण्यात आला आहे. या सेलमध्ये फ्लिपकार्टच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर तब्बल 80 टक्‍क्‍यांपर्यंत सूट देण्यात आली असून, इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करणाऱ्यांसाठी हा सेल मोठी पर्वणी ठरणार असल्याचं दिसत आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे अनेकजण फॅन, कुलर खरेदी करताना दिसून येतात. जर तुम्हाला देखील फॅन कुलर खरेदी करायचा असल्यास हा सेल तुमचे नक्कीच पैसे वाचवणार आहे.

हे देखील वाचा BRO Recruitment:10वी आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या सविस्तर..

PAN Card Apply Online: घरबसल्या तुमच्या मोबाईलवर पॅन कार्ड कसं काढाल? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत.. 

Viral Video: हळदी कार्यक्रमात मुलगा पडला मुलीच्या प्रेमात; नाचत नाचत हातवारे करून असा दिला मोबाइल नंबर..

PM kisan: ऑनलाईन e-KYC प्रक्रिया पुन्हा सुरू; 31 तारखेपर्यंत करा e-KYC अन्यथा ३मे ला जमा होणार नाही अकरावा हप्ता..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.