Onion: शेतकऱ्यांनो कांदा विकण्याची गडबड करू नका; ‘या’ कारणामुळे महिन्याभरातच कांदा सत्तर रुपये किलोने विकला जाणार..
Onion: देशात महागाई दिवसेंदिवस वाढत असून, सर्वसामान्यांचे या महागाईमुळे कंबरडे मोडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. इंधनाच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत, असल्याने त्याचा परिणाम शेतकऱ्यांना देखील भोगावा लागत आहे. इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने शेती उपयोगी वस्तू महाग होत आहेत. एवढंच नाही, तर ट्रान्सपोर्ट खर्च वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळून देखील शेतकऱ्यांना तोटाच सहन करावा लागत आहे. मात्र आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कांदा जुलैमध्ये 60 ते 70 रुपये किलो दराने विकला जाणार असल्याची महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे.
देशात सध्या महागाईने विक्रमी उच्चांक गाठला असून, इंधन दरवाढ याबरोबरच आता भाजीपाल्याच्या किंमती देखील गगनाला भिडल्या आहेत. भाजीपाला खूप महाग झाला असला तरी, याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत नाही, हे देखील चित्र आहे. खतांच्या वाढत्या किमती, ट्रान्सपोर्ट खर्च, आणि वातावरणात होणाऱ्या बदलामुळे शेतकऱ्यांना भाजीपाल्याच्या उत्पादनात अधिक खर्च करावा लागत आहे. यामुळे सहाजिकच दर मिळाला तरी देखील शेतकऱ्यांना फारसा नफा रहात नसल्याचे चित्र आहे. गेल्या दोन महिन्यांपासून कांदा उत्पादक शेतकरी तर पुरता हवालदिल झाल्याचे चित्र आहे. तसं पाहायला गेलं तरी कांदा उत्पादक शेतकरी यावर्षी चांगलाच संकटात सापडला आहे.
सुरुवातीला कांद्याला दर चांगला होता, मात्र वातावरणात होणारे सतत बदल, अवकाळी पाऊस, अचानक पडलेले धुकं, यामुळे यावर्षी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कांद्यावर मोठ्या प्रमाणात रोग पडला. यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाली, तरीदेखील शेतकऱ्यांना दरवर्षीच्या तुलनेत उत्पन्न मिळाले नाही. वातावरणामुळे एकीकडे उत्पादन खर्च वाढला, तरीदेखील कांदा पूर्वीसारखा आला नाही. दर वर्षीच्या तुलनेत या वर्षी कांद्याचा दर देखील फार काळ टिकून राहिला नाही. आणि कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला. आज घडीला तर कांदा एक रुपया किलो प्रमाणे विकला जात असल्याच्या बातम्या देखील तुम्ही ऐकत असाल.
मात्र आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार असल्याची बातमी समोर आली आहे. कांद्याची मागणी अचानक वाढली असून, जुलैपर्यंत कांदा तब्बल 60 ते 70 रुपये किलो दराप्रमाणे विकला जाणार असल्याची माहिती आहे. जुलैमध्ये कांदा महाग होण्याचं कारण म्हणजे नाफेडकडून कांदा मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात येत आहे. फक्त नाफेडची नाही, तर आता व्यापाऱ्यांकडून देखील कांदा मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे. त्यामुळे आता कांद्याची अचानक मागणी वाढल्याने जुलै-ऑगस्टमध्ये कांद्याचा भाव विक्रमी होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
नाफेडकडून कांद्याची खरेदी
गेल्या महिन्यात कांद्याची विक्रमी घसरण झाल्याचे, आपण पाहिलं. कांद्याची मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यामुळे नॅशनल अॅग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया म्हणजेच,औ नाफेडने त्याचा पुरेपूर फायदा उठवत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करायला सुरुवात केली. सध्या कांद्याचा मागणीपेक्षा पुरवठा मोठ्या प्रमाणात होत असल्याने कांद्या किरकोळ भावाने विकला जात आहे. मात्र लवकरच म्हणजे येत्या जुलै-ऑगस्ट मध्ये हा कांदा 60 ते 70 रुपये किलो प्रमाणे विकला जाणार असल्याचं बोललं जात आहे.
हे देखील वाचा India Post Bharti: पोस्ट ऑफिसमध्ये 40 हजार पदांची मेगा भरती; दहावी पास उमेदवारांची अशी केली जाणार निवड..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम