काय सांगता! शेळीपालन व्यवसायापासून महिन्याला आठ लाख रुपयांचे उत्पन्न?

0

पाथर्डी या दुष्काळग्रस्त तालुक्यातील राहुल खामकर आणि सतीश शेळके या दोन तरुणांनी एकत्र येऊन,शेळीपालन व्यवसायातून महिन्याला तब्बल आठ लाख रुपये उत्पन्न मिळवण्याचा कारनामा केला आहे.

कृषी सहाय्यक असणाऱ्या राहुल खामकर याने सरकारी नोकर सोडून मित्राच्या सहाय्याने शेती करायचा निर्णय घेतला. राहुल खामकर म्हणतो, शेतकऱ्यांच्या संपर्कात राहणं मला आवडत होतं. म्हणून मी शेळीपालन व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. राहुल खामकर सांगतात, सुरुवातीला मी 2009 साली विस शेळ्यांपासून शेळी पालन हा व्यवसाय करण्यास सुरुवात केली. कालांतराने हळूहळू मी १३ प्रकारच्या विविध जातींच्या शेळ्या शेडमध्ये आणल्या. विस शेळ्यांपासून सुरू केलेल्या या व्यवसायाचे रुपांतर मोठ्या कंपनीत झाले. आज आमच्याकडे तब्बल सातशे पन्नास शेळ्या आहेत.

या तरुणाने आपल्या उत्पन्नाविषयी माहिती देताना, वर्षाला एक कोटी चाळीस लाख शेळी विक्रीतून,शेळीच्या दूध विक्रीतून दोन लाख चाळीस हजार,लेंडीखतापासून दोन लाख, शेळीपालन कसे करावे,याच्या प्रशिक्षणा मधून बारा लाख रुपये वार्षिक उत्पन्न मिळत असल्याचे सतीश शेळके आणि राहुल खामकर यांनी सांगितले.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.