पशुसंवर्धन विभागाचा ऐतिहासिक निर्णय; शेळी पालनासाठी तब्बल ‘एवढे’ अनुदान, ‘असे’ मिळवा अनुदान

0

शेती ही पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे. आणि अलीकडच्या काळात वातावरणात होणाऱ्या सतत बदलामुळे शेती हा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी आता एखाद्या जुगरा सारखा झालाय, हे आता सगळ्यांच्याच लक्षात आले आहे. आणि म्हणूनच शेतकरी आता शेतीपूरक व्यवसायाकडे वळला असल्याचे, अलीकडच्या काळात अधिकतेने जाणवतं. शेळीपालन या व्यवसायाकडे शेतकरी आता मोठ्या प्रमाणात वळल्याचे दिसत असून, शासनाने देखील यासाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

शेतीला जोड धंदा म्हणून शेळीपालन हा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी मोठी पर्वणी ठरतोय. शेतकरी देखील या व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणात वळल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती नसल्याने शेतकरी शेळीपालनाकडे दुर्लक्ष करतात. परंतु आता अशा शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकार ‘पोकरा’ ही योजना राबवत असून या योजेअंतर्गत शेतकऱ्यांना शेळीपालन हा व्यवसाय आता सुरू करता येणार आहे.

सुरवातीला कमी शेळ्या विकत घेवून, हळूहळू या व्यवसायात शेतकरी चांगला जम बसवू शकतो. आर्थिक दुर्लभ शेतकरी सुरवातीला मोठे शेळीपालन करू शकत नाहीत ही वतुस्थिती आहे. त्यामुळेच अशा शेतकऱ्यांसाठी सरकारने शेळी पालनसाठी अनुदान जाहीर केले आहे. पोकरा योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्याला शेळी पालन करण्यासाठी अनुदान दिले जात आहे. शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर, अर्ज भरण्याची प्रक्रीया देखील शासनाकडून करण्यात आली आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईनच अर्ज करायचा आहे. या संदर्भात आम्ही तुम्हाला लिंक सहित संपूर्ण माहिती देणार आहोत. त्यामुळे संपूर्ण माहिती नीट व्यवस्थित वाचा.

सर्वप्रथम आपण ही योजना काय आहे हे पाहू.

महाराष्ट्र सरकारकडून पोकरा या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेळी पालन करण्यासाठी अनुदान दिले जात आहे. सरकारने या योजनेसाठी ज्या गावांची निवड केलेली आहे, अशाच गावातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.

     या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?

या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार हा याच राज्याचा रहिवासी असणे आवशयक आहे. अर्जदाराने यापूर्वी या योजनेचा कधीच लाभ घेतलेला नसावा. कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. लाभार्थी शेतकऱ्यांना किमान एक बोकड आणि ३ शेळ्या घेणं आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे 

अर्जदाराचे आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो( स्कॅन केलेला) अर्जदाराचे रेशन कार्ड आणि रेशनवरील सर्व सदस्यांचे आधार नंबर. बेरोजगार स्वयंरोजगार नोंदणी कार्ड Employment registration number

सातबारा उतारा ‘आठ’अ आणि बँक पासबुक

असा करा शेळी पालन ऑनलाईन अर्ज

सर्वप्रथम तुम्हाला गुगल सर्च बारमध्ये https://ah.mahabms.com/ अशी वेबसाईट सर्च करायचं आहे. ही वेबसाईट सर्च केल्यानंतर तुमच्या मोबाईल स्क्रीनवर पशुसंवर्धन विभागची अधिकृत वेबसाईट ओपन झालेली दिसेल. यानंतर ज्या आडव्या तीन रेषा आहेत, त्या रेषांवर टच करायचं आहे. टच केल्यानंतर, तुम्हाला वेगवेगळे पर्याय दिसतील. पण तुम्हाला बरोबर अर्जदार नोंदणी हा पर्याय निवडायचा आहे. या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला, आधार कार्ड आणि पासवर्ड टाकून लॉगीन करायचं आहे. ही सगळी प्रोसेस झाल्यानंतर तुमची नोंदणी पूर्ण झाली.

हेही वाचा-. कृषी विभागाचा ऐतिहासिक निर्णय; शेतकऱ्यांना ‘या’ योजनेतून मिळणार तब्बल ‘एवढे’ लाख अनुदान…

 महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या जखमांवर मोदी सरकारने चोळले मीठ; दर कमी करण्यासाठी घेतला हा निर्णय..

अलिकडच्या काळात डाळिंबागा नष्ट का होतायत? त्यावर मात कशी करायची? चिंता मिटली! केंद्रीय पथकाने सांगितले उपाय

नवरा असतानाही बाहेर चाळं करणाऱ्या बायकांना हायकोर्टाने फटकारलं; काय म्हणालं हायकोर्ट

नवाब मलिक कधीच महसूल मंत्री झाले नाहीत,मग ईडीने महसूल मंत्री असताना घोटाळा झाला असं का म्हटलं? शरद पवार आक्रमक…

अकेला फडणवीस क्या करेगा.., सुप्रिया सुळेंनी असं कशाला म्हणायचं? झाला ना करेक्ट कार्यक्रम,आता भोगा फळं; राजकारण पेटलं..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.