अकेला फडणवीस क्या करेगा.., सुप्रिया सुळेंनी असं कशाला म्हणायचं? झाला ना करेक्ट कार्यक्रम,आता भोगा फळं; राजकारण पेटलं..

0

नवाब मलिक (Nawab Malik) यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी (money laundering) ईडीने (ED) अटक केल्यानंतर, राज्याचे राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपच्या सांगण्यावरून केंद्रीय यंत्रणा काम करत असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला असून, नवाब मलिक यांच्यावर झालेली कारवाई ही त्याचेच एक उदाहरण असल्याचं, महाविकास आघाडी सरकारने (mahavikas aagadi) म्हंटले आहे. एकीकडे सत्ताधारी नवाब मलिक यांच्यावर झालेल्या कारवाई विरोधात रस्त्यावर उतरत आहे, तर दुसरीकडे विरोधक देखील नवाब मलिक यांचा राजीनामा मंजूर करावा म्हणून आंदोलन करत आहेत.

निवडणुका जवळ आल्या की केंद्रीय यंत्रणा विरोधकांच्या नेत्यांवर धाडी टाकायला सुरुवात करते, असा आरोप गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पार्टीला सोसावा लागत असल्याचे दिसून येते. फक्त महाराष्ट्रातच नाही तर, ज्या-ज्या राज्यांत भारतीय जनता पार्टीची सत्ता नाही, त्या राज्यात विरोधकांवर मोठ्याप्रमाणात केंद्रीय यंत्रणा कारवाई करत असल्याचा दिसून येतं. पश्चिम बंगालमध्ये देखील विधानसभा निवडणुकीदरम्यान ममता बॅनर्जीच्या निकटवर्तीयांवर केंद्रीय यंत्रणांनी कारवाई केली होती.

केंद्रीय यंत्रणा भारतीय जनता पार्टीच्या ताटाखालचे मांजर झाल्याचा आरोप विरोधक सातत्याने करतात. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा नुकताच एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत देखील हा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र यावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, या केंद्रीय यंत्रणा आपलं काम करत आहेत. यात आमचा कसलाही हस्तक्षेप नाही. या यंत्रणा नेहमी आपलं काम करत असतात मात्र, कारवाईमध्ये निवडणुका येतात. त्यामुळे विरोधकांना असं वाटू शकतं असं विधान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं.

केंद्रीय यंत्रणा या भारतीय जनता पार्टीच्या ईशाऱ्यावर काम करतात, हा विषय आता नवीन राहिलेला नाही. मात्र महाराष्ट्रात नवाब मलिक यांच्यावर झालेल्या कारवाईचा थेट संबंध आता देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांच्या सोबत जोडला जात आहे. आर्यन खान ड्रग्स प्रकरणात नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे चांगलंच राजकारण त्यावेळी तापल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस नवाब मलिक हे कधी अडचणीत येतायत याचीच वाट पाहत होते. अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

एका कार्यकर्ता मेळाव्यात सुप्रिया सुळे ( Supriya Sule) भाषण करताना म्हणाल्या होता, देवेंद्र फडणवीस शरद पवार (Sharad Pawar) यांना निवृत्ती घ्या म्हणाले. मात्र “अकेला फडणवीस क्या करेगा..” पवार साहेबांसोबत महाराष्ट्राची जनता आहे. असं विधान सुप्रिया सुळे यांनी केलं होतं. आणि आता याच विधानाचा थेट संबंध देवेंद्र फडणवीस यांच्याशी जोडला जात आहे. देवेंद्र फडणवीस यांना हे वाक्य आवडलं नाही आणि म्हणून त्यांनी नवाब मलिक यांचा करेक्ट कार्यक्रम केला अशी चर्चा आता सोशल मीडियावर रंगल्या आहेत.

हेही वाचा-.  राष्ट्रवादीनंतर ईडीचा शिवसेनेला दणका; शिवसेनेच्या या नेत्यावर धाड, संध्याकाळी होणार अटक..

महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या जखमांवर मोदी सरकारने चोळले मीठ; दर कमी व्हावा म्हणून घेतला हा निर्णय..

या कारणामुळे देशमुख,भुजबळ यांना अटक झाल्यानंतर राष्ट्रवादीने पाठ फिरवली; अजित पवार स्वतः म्हणाले…

 या कारणांमुळे  हसीना पारकर आणि नवाब मलिक यांच्या बैठका व्हायच्या; ईडीनेच केला धक्कादायक खुलासा..

ओ माय गॉड! नवाब मलिक वेश्याव्यवसाय चालवायचे; ईडीकडे पुरावे..,”

कृषी विभागाचा ऐतिहासिक निर्णय; शेतकऱ्यांना ‘या’ योजनेतून मिळणार तब्बल ‘एवढे’ लाख अनुदान..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.