राष्ट्रवादीनंतर ईडीचा शिवसेनेला दणका; शिवसेनेच्या ‘या’ नेत्यावर धाड, संध्याकाळी होणार अटक..

0

गेल्या काही महिन्यांपासून महाविकास आघाडीचे नेते केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर असल्याचं बोललं जात असतानाच, परवा नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर या बातमीला दुजोरा मिळाल्याचे पाहायला मिळाले. नवाब मलीक यांना अटक केल्यानंतर, राज्याचे राजकारण चांगलेच तापल्याचे पाहिला मिळत आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मालिक यांना ईडीने अटक केल्यानंतर नुकताच प्राप्तिकर विभागाने शिवसेना नेत्याच्या घरी छापा टाकला आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून केंद्रीय यंत्रणांकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांशा वारंवार टार्गेट केलं जात असल्याचं, बोललं जात आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचं काम देवेंद्र फडणीस यांच्या सांगण्यावरून केलं जात आहे. १०५ आमदार निवडून येऊन देखील, सत्ता स्थापन करता आली नाही. आणि म्हणून आकसापोटी फडणवीसही कारवाई करत आहेत असा आरोप आता विरोधकांकडून केला आहे.

शंभर कोटी वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांना जाणून बुजून लटकवण्यात आलं. अनिल देशमुख यांना अटक केल्यानंतर आता नवाब मलिक यांनाही बेकायदेशीररित्या ईडीने अटक केली. ही सगळी कारवाई देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून केंद्रीय यंत्रणा करत असल्याचा आरोप आता विरोधकांबरोबर अनेक राजकीय विश्लेषण देखील करताना दिसून येत आहेत. नवाब मलिक यांनी आर्यन खान ड्रग्स प्रकरणात अनेक धक्कादायक आरोप केले. हे आरोप भारतीय जनता पार्टी बरोबर देवेंद्र फडणवीस यांच्यावरही केले.

मलिक यांनी केलेल्या अनेक धक्कादायक आरोपांमुळे देवेंद्र फडणवीस आकसापोटी ही कारवाई करत असल्याचं बोलले जात आहे. नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केल्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांनी देखील पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत, देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, नवाब मलिक यांनी दिवाळीत फुसका बार फोडलाय, मी दिवाळीनंतर मोठा धमाका करणार आहे. त्यानंतर आता मलिक यांना झालेली अटक ही देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी मोठा धमाका करणार आहे, असं बोलून दाखवलं होतं, तो हाच धमाका असल्याचं देखील आता बोललं जात आहे.

एकीकडे ईडीने राष्ट्रवादीचे नेते नवाब मालिक यांना अटक अटक केली. तर आता दुसरीकडे इन्कम टॅक्स विभाग शिवसेना नेत्यांच्या मागे हात धूऊन लागल्याचे बोललं जात आहे. त्याचे कारण म्हणजे नवाब मलिकांप्रमाणे,पहाटेच इन्कम टॅक्स विभागाने शिवसेनेच्या नेत्यावर इन्कम टॅक्सची धाड टाकली आहे. शिवसेनेचे नेते आणि महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष, असणारे यशवंत जाधव यांच्या घरावर प्राप्तिकर विभागाने धाड टाकली. आता या प्रकरणामुळे पुन्हा एकदा राजकारण चांगलेच तापले आहे.

यशवंत जाधव हे शिवसेनेचे महत्त्वाचे नेते आहेत. यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव भायखळा मतदारसंघातून आमदार देखील आहेत. पालिकेच्या कंत्राट आणि अन्य आर्थिक व्यवहारांमध्ये स्थायी समितिची महत्वाची भूमिका असते. विशेष म्हणजे यापूर्वी देखील किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांच्यावर मनी लॉण्ड्रिंगचा आरोप केला होता. वरून केंद्रीय यंत्रणा या भाजपच्या नेत्यांच्या सांगण्यावरूनच काम करत असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध होताना पाहायला मिळत आहे.

आगामी महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून भाजपच्या सांगण्यावरून आमच्या नेत्यांना टार्गेट केले जात आहे. देशात गलिच्छ राजकारण सुरू आहे. हे गल्लीच राजकारण 2024 पर्यंत ते करतील. त्यानंतर आम्ही पाहू. महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या असल्याने, आता भारतीय जनता पार्टी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर देखील कारवाई करू शकते. कारण ते खिशाला धनुष्यबान लावतात. असं संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले.

हेही वाचा- महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या जखमांवर मोदी सरकारने चोळले मीठ; दर कमी व्हावा म्हणून घेतला हा निर्णय.

या कारणामुळे देशमुख,भुजबळ यांना अटक झाल्यानंतर राष्ट्रवादीने पाठ फिरवली; अजित पवार स्वतः म्हणाले...

उत्तमराव जानकर करणार माळशिरसचा कायापालट; ‘अशी’ होणार जलक्रांती

Nawab Malik: मुंबईत महाविकास आघाडीचे लक्षणीय आंदोलन; मग् शिवसेनेने का फिरवली पाठ, हे आहे कारण.

 या कारणांमुळे दाऊदची बहीण हसीना पारकर आणि नवाब मलिक यांच्या बैठका व्हायच्या; ईडीनेच केला धक्कादायक खुलासा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.