Nawab Malik: मुंबईत महाविकास आघाडीचे लक्षणीय आंदोलन; मग् शिवसेनेने का फिरवली पाठ? हे आहे कारण..
महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते, नवाब मलिक (Nawab Malik) यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक केली. न्यायालयाने नवाब मलिक यांना 3 मार्च पर्यंत कोठडी सुनावण्यात आली असून, या विरोधात महाविकास आघडी सरकार आता चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. सुढबुद्धीने केलेली ही कारवाई असून, याचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने मंत्रालयाजवळ (Mantralay) महात्मा गांधी पुतळ्यापशी अनेक बड्या नेत्यांच्या उपसथितीत आंदोलन केले.
नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ महाविकास आघाडीचे अनेक बडे नेते, या आंदोलनात सहभागी झाले असले तरी, दुसरीकडे अशीही एक चर्चा राज्याच्या राजकारणात घडल्याचे पाहायला मिळाले. आज मुंबईत महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापशी महाविकास आघाडी नेत्यांनी आंदोलन केले खरे, मात्र या आंदोलनात शिवसेनेने पाठ फिरवल्याची चर्च देखील सोशल मीडियावर रांगल्याचे पाहायला मिळाले.
गेल्या काही महिन्यांपासून किरीट सोमय्या सातत्याने शिवसेनेवर हल्ला चढवताना पाहायला मिळत आहे. तरी देखील शिवसेनेने या आंदोलनाकडे का पाठ फिरवली? अशी चर्चा रंगली. मात्र यात काहीही तथ्य नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं आहे. सध्या आम्ही गोवा उत्तर प्रदेशमध्ये प्रचारात व्यस्त आहोत. त्यामुळे काही नेते या आंदोलनात भाग घेऊ शकले नाहीत, ही गोष्ट खरी आहे. मात्र आमचे शुभाष देसाई या आंदोलनात सहभाग झाले आहेत, असंही आदित्य ठाकरे यांनी म्हंटले आहे.
महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना काल भल्या पहाटे चौकशीसाठी ईडी कार्यालयात पकडून नेण्यात आलं. आणि आठ तास चौकशी केल्यानंतर अखेर अटक केली. सक्तवसुली संचालनालयाने आर्थिक मनी लॉन्ड्रिंग म्हणजेच आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांना अटक केली आहे. नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर आता राजकारण चांगलेच तापले असून, नवाब मलिक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून नावाब मलिक सातत्याने भारतीय जनता पार्टीच्या अनेक बड्या नेत्यांवर विविध आरोप करत होते. आणि त्यामुळेच त्यांच्यावर ही सूडबुद्धीने झालेली कारवाई असल्याचे, एकीकडे राष्ट्रवादीने म्हटलं आहे. मात्र दुसरीकडे विरोधक नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करत असून, रस्त्यावर देखील उतरल्याचं पाहायला मिळत आहे.
हेही वाचा-. यामुळे दाऊदची बहीण हसीना पारकर आणि नवाब मलिक यांच्या बैठका व्हायच्याईडीनेच केला धक्कादायक खुलासा
ओ माय गॉड! नवाब मलिक वेश्याव्यवसाय चालवायचे; ईडीकडे पुरावे..,”
कृषी विभागाचा ऐतिहासिक निर्णय; शेतकऱ्यांना मिळणार तब्बल ‘एवढ्या’ लाखांची मदत
महाविकास आघाडी सरकार बुळ आहे काय? दिग्गजांच्या संतप्त सवालानंतर पवार आक्रमक!म्हणाले..,
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम