या कारणामुळे देशमुख,भुजबळांना अटक झाल्यानंतर राष्ट्रवादीने पाठ फिरवली होती; अजित पवार स्वतः म्हणाले…

0

महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते, नवाब मलिक (Nawab Malik) यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक केली. न्यायालयाने नवाब मलिक यांना 3 मार्च पर्यंत कोठडी सुनावण्यात आली असून, या विरोधात महाविकास आघडी सरकार आता चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. सुढबुद्धीने केलेली ही कारवाई असून, याचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने मंत्रालयाजवळ (Mantralay) महात्मा गांधी पुतळ्यापाशी अनेक बड्या नेत्यांच्या उपसथितीत आंदोलन केले.

नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ महाविकास आघाडीचे अनेक बडे नेते, या आंदोलनात सहभागी झाले होते. तर दुसरीकडे नवाब मलिक यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचे नेते देखील आक्रमक झाले असून, त्यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र सरकारने नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच नाही. असं स्पष्ट केलं आहे. शिवाय या कारवाईच्या विरोधात राष्ट्रवादी (ncp) आणि महाविकास रस्त्यावर देखील उतरली आहे.

नवाब मलिक यांना राष्ट्रवादीकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतं आहे. एवढंच नाही तर शरद पवार यांनी देखील आपण नवाब मलिक यांचा पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे म्हंटले. महाविकासआघाडी सरकारकडून देखील नवाब मलिक यांना मोठया प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. एकीकडे अशी परिस्थिती असली तरी, दुसरीकडे मात्र आता वेगळाच प्रश्न उपस्थित झाला आहे. ज्या प्रकारे नवाब मलिकांच्या पाठीशी राष्ट्रवादी ठामपणे उभी राहिली. त्या पद्धतीने भुजबळ आणि अनिल देशमुख यांच्या पाठीशी उभी राहिली नसल्याचे बोललं जात आहे. याची जोरदार चर्चा देखील सोशल मीडियावर होताना पाहायला मिळत आहे.

भारतीय जनता पार्टी सत्तेत आल्यापासून केंद्रीय यंत्रणांना चांगलेच काम पडल्याचे पाहायला मिळाले. महाराष्ट्रात देखील या यंत्रणांनी आपला जलवा दाखवत अनेक नेत्यांना नोटीस पाठवल्याचं पाहायला मिळाले. एवढंच नाही तर छगन भुजबळ( Chagan bhujbal) यांना, दिल्लीतील कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात तब्बल दोन वर्ष जेलची हवा खावी लागली. मात्र आता या प्रकरणात त्यांना क्लीन चीट मिळाली आहे.

भुजबळ नंतर ईडीने अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना १०० कोटी रुपयांच्या वसूली प्रकरणात अटक केली. राज्याच्या गृहमंत्री पदावर असताना देखील सक्तवसुली संचलनालयाने (ED) अनिल देशमुख यांना अटक केली. राष्ट्रवादीच्या या दोन्हीं महत्वाच्या नेत्यांवर मोठी कारवाई करून देहील या नेत्यांना राष्ट्रवादीची मदत मिळाली नसल्याची, चर्चा आता जोर धरू लागली आहे. ज्या प्रकारे नवाब मालिकांच्या पाठीशी राष्ट्रवादी उभी राहिली, त्या तुलनेत या दोन नेत्यांच्या मागे राष्ट्रवादी उभी राहिली नाही, असं आता बोललं जाऊ लागलं आहे.

एकीकडे ही परिस्थिती असली तरी, दुसरीकडे मात्र आपण आणखी गप्प बसलो तर, हा भाजप प्रेरित केंद्रीय यंत्रणांचा धडाका असाच सुरू राहील. आपण वेळीच यांना आवर घातला नाही तर, ही लोकं एक-एक करून सगळ्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये टाकलं जाईल. आणि म्हणून राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीने ईडीच्या आणि भाजपाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली असल्याचंही बोललं जातं आहे‌.

हेही वाचा-.   उत्तमराव जानकर करणार माळशिरसचा कायापालट; ‘अशी’ होणार जलक्रांती

Nawab Malik: मुंबईत महाविकास आघाडीचे लक्षणीय आंदोलन; मग् शिवसेनेने का फिरवली पाठ, हे आहे कारण..

म्हणून दाऊदची बहीण हसीना पारकर आणि नवाब मलिक यांच्या बैठका ईडीने 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.