उत्तमराव जानकर करणार माळशिरसचा कायापालट; ‘अशी’ होणार जलक्रांती

0

जनतेचे आमदार अशी तालुक्यात ओळख असणारे राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर (uttamrao jankar) यांनी आता माळशिरस (malshiras) तालुक्यात जलक्रांतीचा ध्यास हातात घेतला आहे. २०१९च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार पदाने थोडक्यात हुलकावणी दिल्याने, उत्तमराव जानकर यांनी आता आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी म्हणून, तालुक्याला जलमय करण्याचा निर्धार केला, असल्याचे पाहायला मिळत आहे.

दुष्काळ हा माळशिरस (malshiras) तालुक्याच्या पाचवीलाच पुजला आहे. आजही तालुक्यातील बऱ्याचशा गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याचं पाहायला मिळतं. सहकार क्षेत्रात तालुका अग्रेसर असला तरी, या तालुक्यातील शेतकरी (farmer? मात्र आजही पाण्याची आस लावून बसल्याचे पाहायला मिळते. आणि बरोबर हीच गोष्ट लक्षात घेऊन उत्तमराव जाानकर यांनी आता माळशिरस तालुक्यात माथा ते पायथा जलसंधारण कामांच्या माध्यमातून जलक्रांती घडवण्याचा ध्यास हाती घेतला आहे.

५२ पाझर तलाव, साखळी बंधारे, तलावांचे खोलीकरण, रूंदीकरण,उंची वाढवण्याचं काम, अशी अनेक जलसंधारणाची कामे उत्तमराव जानकर यांच्या प्रयत्नातून होणार आहेत. त्याच बरोबर, तलावांची गळती थांबवून, पॉलीथीन पेपर टाकण्यात येणार आहे. इस्त्राईल तंत्रज्ञानाचा वापर करून ठिंबक सिंचन यांत्रिकीकरण देखील करण्यात येणार, असल्याची माहीत उत्तमराव जानकर यांनी दिली आहे.

उत्तम जानकर यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे तालुक्यातील जनता आणि खासकरून शेतकरी सुखावल्याचे पाहायला मिळत आहे. उत्तमराव जानकर यांनी घेतलेला हा निर्णय अतिशय चांगला असून, लवकरच हे सत्यात उतरावं, अशी आमची प्रामाणिक इच्छा असल्याचं स्थानिकांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. उत्तमराव जानकर यांनी हाती घेतलेले हे काम राज्य सरकार तसेच विविध संस्थांच्या मदतीने पार पडणार असल्याची माहिती आहे.

माळशिरस तालुक्याचा कायापालट करण्यासाठी आपण आता अग्रेसर असून, या तालुक्यात फक्त राजकारण झालं. विकासाचं राजकारण झालं नाही, हे आता तालुक्यातील जनतेच्या लक्षात आलं आहे. तालुक्यातील शेतकरी सुखावण्यासाठी आता आम्ही माथा ते पायथा जलसंधारणाच्या माध्यमातून तालुक्यात जलक्रांती करण्याचा निर्धार केला आहे. राज्य सरकार आमच्या ठामपणे पाठीशी असून,विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संस्थांच्या मदतीने, आमचे हे स्वप्न लवकर सत्यात उतरणार असल्याचं उत्तमराव जानकर यांनी सांगितले आहे.

हेही वाचा- कृषी विभागाचा ऐतिहासिक निर्णय; शेतकऱ्यांना मिळणार तब्बल ‘एवढ्या’ लाखांची मदत..

अलिकडच्या काळात डाळिंबागा नष्ट का होतायत? त्यावर मात कशी करायची? चिंता मिटली! केंद्रीय पथकाने सांगितले उपाय

महाविकास आघाडी सरकार बुळ आहे काय? दिग्गजांच्या संतप्त सवालानंतर पवार आक्रमक!म्हणाले..,”

योगी आदित्यनाथ यांच्या विश्वासू नेत्याने भर सभेत कान पकडून उठाबशा काढल्या; कारण जाणून म्हणाल…

नवरा असतानाही बाहेर चाळं करणाऱ्या बायकांना हायकोर्टाने फटकारलं; काय म्हणालं हायकोर्ट

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.