व्हिडिओ: योगी आदित्यनाथ यांच्या विश्वासू नेत्याने भर सभेत कान पकडून उठाबशा काढल्या; कारण जाणून म्हणाल…

0

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका आता अंतिम टप्प्यावर येऊन ठेपल्या असून, प्रत्येक जण मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन प्रयोग करताना पाहिला मिळत आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी सोनभद्र विधानसभेतला असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्याच्या प्रचार सभांची रणधुमाळी सुरु आहे. सातव्या टप्यासाठी 7 मार्च रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी सर्व नेते आपापल्या अंदाजात प्रचार करत जनतेला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. रॉबर्टसगंज मतदारसंघातून भाजपकडून “भूपेश चौबे” यांना उमेदवार मिळाली आहे. गेल्या वेळेस देखील ते या मतदार संघातून निवडून आले होते. मात्र पाठीमागच्या पाच वर्षात जनतेची कामं करू शकलो नसल्याचं त्यांनी भर सभेत स्टेज वरून कबूल केलं.

गेल्या पाच वर्षांत जनतेची कामं झाली नसल्याचे त्यांनी कबूल करतानाच, भर सभेत स्टेजवरून दोन्हीं हातांनी कान पकडून उठाबशाही काढल्या. आणि समोर जमलेल्या मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून, या व्हिडिओची जोरदार चर्चा सोशल मीडियावर होताना पाहायला मिळत आहे. गेल्या पाच वर्षात माझ्याकडून झालेल्या चुकांची मी माफी मागत असल्याचं त्यांनी भर सभेत भावूक होत, बोलून दाखवलं. आणि झालेल्या चुकां मान्य करत जनतेची माफी मागितली.

भाजपाचे आमदार आणि उमेदवार भूपेश चौबे म्हणाले, 2017 च्या निवडणुकीत ज्या प्रकारे तुम्ही सर्व देवभक्तांनी आशीर्वाद देत निवडून दिले, त्याचप्रमाणे यावेळीही मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. पुन्हा एकदा आपल्याला रॉबर्टसगंजमध्ये भारतीय जनता पक्षाचे कमळ फुलवायचे आहे. असंही त्यांनी उपस्थितांशी संवाद साधताना म्हटलं.

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकित भारतीय जनता पार्टीचा दारुण पराभव होणार असल्याच अनेक राजकीय विश्लेषकांनी म्हंटले आहे. भारतीय जनता पार्टीने मात्र या निवडणुकीत चांगलाच जोर लावल्याचे पाहायला मिळत आहे. नरेंद्र मोदींच्या सभा या निवडणुकीत चर्चेचा विषय ठरत असल्याचे, देखील पाहायला मिळत आहे. त्याचे कारण म्हणजे, नरेंद्र मोदींची विधानं. नुकतेच नरेंद्र मोदींनी एक धक्कादायक विधान केलं आहे. मोदी म्हणाले,एक माता मोदींचे मी मीठ खाल्ले आहे, म्हणून ती त्याला मत देणार असल्याचं, अजब वक्तव्य नरेंद्र मोदींनी केलं होत.

हे वाचलं का? आपली रॅली सोडून भाजपचे हजारो कार्यकर्ते प्रियंका गांधींच्या रॅलीत; भर रस्त्यात असं काय घडलं

समीर वानखेडे दोषीच! नवाब मलिक यांनी केलेले सर्व आरोप खरे; आर्यन खान बिचारा…

नवरा असतानाही बाहेर चाळं करणाऱ्या बायकांना हायकोर्टाने फटकारलं; काय म्हणालं हायकोर्ट..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.