समीर वानखेडे दोषीच! नवाब मलिक यांनी केलेले सर्व आरोप खरे; बिचारा आर्यन खान …

0

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणातून संपूर्ण जगाला आपली ओळख करून देणारे, एनसीबीचे अधिकारी समीर वानखडे आता पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. 2 ऑक्टोंबरला कार्डिलिया क्रुझवर छापा टाकत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला समीर वानखेडे यांनी अटक केली. आणि तेव्हापासून समीर वानखडे चर्चेत आले. आता पुन्हा एकदा समीर वानखडे अडचणीत आले असून, त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला आहे.

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात अटक केल्यानंतर, समीर वानखेडे देशभरात माध्यमांची हेडलाईन बनले होते. मात्र जस-जसा या प्रकरणाचा उलगडा होत गेला, तस-तसं हे प्रकरण फेक असल्याचं वाटू लागलं, आणि समीर वानखेडे यांच्या कारवाईवर अनेकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. आर्यन खानच्या हाताला पकडून एनसीबीच्या कार्यालयात पळवत नेणारा तो व्यक्ती एनसीबीचा कुठलाही अधिकारी नसल्याचे, समोर आल्याने या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले.

एकीकडे आर्यन खान प्रकरणावर अनेकजण शंका उपस्थित करत असतानाच, दुसरीकडे नवाब मलिक यांनी या प्रकरणात उडी घेतली. आणि प्रकरण फेक असून, समीर वानखेडे हा माणूस देखील फेक असल्याचं म्हटलं. वानखेडेंवर केलेल्या विविध आरोपामुळे या प्रकरणाला चांगलेच महत्त्व आल्याचे दिसून आले. समीर वानखेडे यांनी मिळवलेली नोकरी देखील खोटे कागदपत्र सादर करत मिळवली, असल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला.

समीर वानखेडे यांनी बेकायदेशीररित्या सद्गुरु बार अॅड रेस्टो परवाना मिळवला, असल्याचा देखील आरोप नवाब मलिक यांनी केला होता. त्यावेळी नवाब मलिक वानखेडेंच्या पाठीमागे चांगलेच हात धुऊन लागल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र आता या प्रकरणात तथ्य आढळले असून, राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे, ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात समीर वानखेडे यांच्याविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

 

समीर वानखेडे यांनी आपल्या वयाची खोटी माहिती देऊन, ‘सद्गुरू बार आणि रेस्टो’ या बारचा परवाना मिळवला असल्याचं, राज्य उत्पादन शुल्क विभागाने म्हटलं आहे. ‘मुंबईतील वाशी’मधील या बारचा परवाना हा २७ ऑक्टोबर १९९७ ला समीर वानखेडे यांच्या नावावर जारी करण्यात आला होता. 1996-97ला समीर वानखेडे यांचं वय वर्ष अठरा पूर्ण नसताना देखील, त्यांनी आपल्या वयाची खोटी माहिती दिली. आणि म्हणून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या आरोपांना उत्तर देताना समीर वानखेडे म्हणाले होते, मी आयआरएसमध्ये रुजू झाल्यानंतर हा परवाना आपल्या काढला होता. मी २००६ ला आयआरएसमध्ये रुजू झालो. तसेच या परवान्याचे कायदेशीर सगळे हक्क मी त्याचवेळी वडिलांच्या नावे केले होते. समीर वानखेडे यांनी त्यावेळी दिलेले हे स्पष्टीकरण आता खोटे असल्याचे सिद्ध झाले आहे. नवाब मलिक यांनी सद्गुरू बार संदर्भात केलेले आरोप आता खरे ठरले असून, वानखेडे आता चांगलेच अडकले असल्याचे पाहायला मिळत आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.