आपली रॅली सोडून भाजपचे हजारो कार्यकर्ते प्रियंका गांधींच्या रॅलीत; भर रस्त्यात असं काय घडलं? योगी म्ह..

0

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका आता अंतिम टप्प्यावर येऊन ठेपल्या असून, आपापल्यापरीने सत्ताधारी आणि विरोधक जोर लावताना पाहायला मिळत आहेत. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुक भाजपसाठी मोठं आव्हान मानले जातं असून, अनेकांनी या निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झाल्याचं देखील म्हंटले आहे. एकीकडे आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच, काल प्रियंका गांधी यांचा एक सुंदर व्हिडिओ समोर आला आहे.

समाजवादी आणि काँग्रेसच्या तुलनेत भाजपची नेतेमंडळी मानसिक दृष्ट्या पराभूत झाल्याचे, अनेक प्रचारसभेत पाहायला मिळत आहे. योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या ट्विटर अकऊंटवर प्रचार सभेचा एक फोटो एडिट करून टाकल्याचे देखील, पाहायला मिळाले होते. निवडणुका जिंकण्यासाठी भाजप नेहमी द्वेषाचे राजकारण करत असल्याचा आरोप विरोधकांकडून नेहमी केला जातं आहे.

भाजप वगळता इतर पक्षामध्ये असला प्रकार पहायला मिळत नाही. असही बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वी बुलंदशहरमध्ये प्रियांका गांधी आणि अखिलेश यादव एकमेकांसमोर आल्यानंतर दोघांनीही एकमेकांना नमस्कार केल्याचे चित्र सोशल मीडियावर पाहिलं मिळाले होते. आता पुन्हा एकदा राजकारणात लढाई फक्त वैचारिक असते, वयक्तिक नसते, याची प्रचिती आली आहे. बुलंदशहरनंतर हरदोईमधूनही आज राजकारणाचे सुंदर चित्र समोर आले आहे.

त्याचे झाले असे, काँग्रेस सरचिटणीस आणि उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियांका गांधी याची सभा माधौगंजमधील कस्बामध्ये होती. ज्या रस्त्याने प्रियांका गांधी जात होत्या, त्याच एक्स्प्रेसवेवर मल्लावां कस्बामध्ये योगी आदित्यनाथ यांची देखील सभा होती. दोन्हीं नेत्यांच्या सभास्थळी पोहचण्याचा एकच मार्ग होता. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा १वाजता होती तर प्रियांका गांधी यांची ४ वाजता होती. योगी आदित्यनाथ यांची सभा संपल्यानंतर कार्यकर्ते जात असताना त्यांना वाटेत प्रियांका गांधी भेटल्या.

भाजपच्या कार्यकर्त्यांची आणि प्रियांका गांधी यांची भेट, बंगारामू, मल्लवनला जाताना झाली. प्रियांका गांधीसमोर आल्यांनंतर, भाजपच्या कार्यकर्त्यांनी जय श्री राम नावाच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. मात्र यावेळी प्रियांका गांधी यांनी, त्या कार्यकर्त्यांचे स्वागत करताना, पुष्वृष्टी केली. प्रियंका गांधी यांच्या या कृत्याने ते कार्यकर्ते देखील प्रियांका गांधी यांच्या सोबत सेल्फी घेऊ लागले. राजकारणात फार दुर्मिळ असं चित्र पाहायला मिळतं. असं बोललं जाऊ लागलं आहे. या घटनेनंतर प्रियांका गांधी यांचे मोठ्या प्रमाणात कौतुकही होत आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.