PM Kisan 16th Installment: सोळाव्या हप्त्याविषयी मोठी अपडेट समोर; तरच मिळणार 16 वा हप्ता, जाणून अधिक..

0

PM Kisan 16th Installment: देशातील गरीब शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून केंद्र सरकारकडून दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. हा हप्ता पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येतो. (Pm kisan Yojana) देशातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत दोन हजाराचे 15 हप्ते देण्यात आले आहेत. आता पिएम किसान लाभार्थी शेतकरी सोळाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. सोळाव्या हप्त्याविषयी महत्त्वाची अपडेट आता समोर आली आहे. (PM Kisan 16th Installment date)

शेतीच्या मशागतीसाठी आर्थिक मदत व्हावी, यासाठी केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देण्यात येतात. हे सहा हजार रुपये तीन हप्त्यासह देण्यात येतात. दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांचे असे तीन हप्ते या योजनेच्या शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये केंद्र सरकार जमा करते.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा पंधरावा हप्ता शेतकऱ्यांना यावर्षी 15 नोव्हेंबरला वितरीत करण्यात आला आहे. आता सोळाव्या हप्त्याविषयी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे 16 व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना आता फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा मार्चच्या शेवटच्या आठवड्यात दोन हजार रुपयांचा 16 प्राप्त जमा होणार असल्याची माहिती आहे.

पीएम किसान योजनेचा पंधरावा हप्ता जर शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा झाला नसेल, तर सोळाव्या हप्त्या बरोबर पंधरा हप्ता देखील जमा होणार आहे. मात्र त्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना eKyc प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. जस जसे या योजनेचे हप्ते वाढत गेले, तसतशी लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या कमी होत गेली. जर तुम्हालाही पंधरावा हप्ता मिळाला नसेल, तर तुम्ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, तुम्हाला पंधराव्या हप्त्याबरोबर 16 वा हप्ता देखील तुमच्या बँक खात्यात जमा केला जाईल.

नवीन अर्ज आणि e KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पिएम किसानच्या pmkisan.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. त्यांनतर नवीन शेतकरी नोंदणी हा पर्याय पाहायला मिळेल. त्यावर क्लिक करा. त्यांनतर आधार क्रमांक टाकून कॅप्चा कोड भरा. त्यानंतर सविस्तर तपशील भरून तुम्ही अर्ज करू शकता.

जर तुम्हाला तुमच्या खात्याची स्थिती तपासायची असेल, तुमचा मोबाईल मधील क्रोमवर जाऊन pmkisan.gov.in असं सर्च करा. त्यानंतर वेबसाईट ओपन होईल. वेबसाईट ओपन झाल्यानंतर, तुम्हाला “शेतकरी कॉर्नर” हा पर्याय पाहायला मिळेल. त्यावर क्लिक केल्यानंतर, लाभार्थी स्थिती हाही पर्याय तुम्हाला ओपन झालेला दिसेल. त्यात तुम्हाला आधार कार्ड क्रमांक, किंवा तुमचा बँक खाते क्रमांक टाकून, “डेटा मिळवा” या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यांनतर तुमच्या खात्याची सविस्तर माहिती तुम्हाला मिळेल.

हे देखील वाचा IND vs SA 1St test: रोहित शर्माच्या त्या गाढव चुकीमुळे भारत पहिल्या कसोटीत पराभवाच्या छायेत..

Ajit pawar vs Amol kolhe: ..म्हणून अजित पवारांना फुल कॉन्फिडन्स; काय आहे शिरूर लोकसभेचे गणित? खरचं कोल्हे पडतील?

Rohit Sharma ची संपत्ती तुम्हाला माहिती आहे का? आकडे पाहिल्यानंतर तुमचीही उडेल झोप..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.