Rohit Sharma ची संपत्ती तुम्हाला माहिती आहे का? आकडे पाहिल्यानंतर तुमचीही उडेल झोप..

Rohit Sharma सध्या खूपच चर्चेत आहे. मुंबई इंडियन्स संघाचे कर्णधापद काढून घेतल्याने त्याचे चाहते प्रचंड नाराज आहेत..

Rohit Sharma Net Worth: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या खूपच चर्चेत आहे. मुंबई इंडियन्स संघाच्या (Mumbai Indians) कर्णधार पदावरून रोहित शर्माला पायउतार केल्यापासून रोहित शर्मा क्रिकेट विश्वात तसेच मीडियाच्या केंद्रस्थानी असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधार पदावर उत्तम कामगिरी करून देखील रोहित शर्मा ऐवजी हार्दिक पांड्याची कर्णधार पदी निवड केल्याने रोहित शर्माचे चाहते प्रचंड नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. याच कारणाने रोहित सध्या प्रचंड चर्चेचा विषय आहे. आज आपण रोहित शर्माच्या संपत्ती (Rohit Sharma Net Worth)बाबत जाणून घेणार आहोत.

 

Rohit Sharma ला BCCI कडून किती पैसे मिळतात?ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट कंपनी स्टॉक ग्रोने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार रोहित शर्माची एकूण संपत्ती (Rohit Sharma Net Worth) 214 कोटी रुपये एवढी आहे. रोहित शर्माने ही संपत्ती क्रिकेट, जाहिरातींद्वारे आणि गुंतवणुकीद्वारे मिळवली आहे. BCCI कडून रोहित शर्माला ग्रेड A पगार मिळतो. याचाच अर्थ रोहित शर्मा हा दिग्गज पगार घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत येतो. बीसीसीआयकडून (BCCI ) रोहित शर्मा वर्षाला सात करोड रुपये मानधन घेतो. एका वनडे मॅचसाठी (One Day Match) रोहित शर्माला सहा लाख रुपये अतिरिक्त मानधन मिळते. तसेच एका टी-ट्वेंटी मॅच (T20 Match) साठी रोहित शर्माला तीन लाख रुपये मिळतात तसेच टेस्ट मॅचसाठी पंधरा लाख रुपये मिळतात. आयपीएलसाठी मुंबई इंडियन्स टीम (Mumbai Indians) कडून रोहित शर्माला करोडो रुपये मिळतात. 2022 च्या लिलावापूर्वी, मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने रोहितला कायम ठेवण्यासाठी 16 कोटी रुपये दिले होते.

 

Rohit Sharma वेगवेगळ्या ब्रँडच्या जाहिरातीतून पैसे मिळतात?

रोहित शर्माची प्रसिद्धी आणि क्रिकेट प्रेमींच्या मनावर अधिराज्य करत असल्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात जाहिरातींच्या ऑफर मिळत असतात. रोहित शर्मा बऱ्याच वेगवेगळ्या कंपन्यांच्या जाहिराती करतो. त्यासाठी ब्रँड्स रोहित शर्माला (Rohit Sharma) करोडो रुपये देत असतात. सध्या तो 28 वेगवेगळ्या ब्रँडच्या जाहिराती करत आहे. यामध्ये जियो सिनेमा (Jio Cinema), मैक्‍स लाइफ इंश्‍योरेंस (Max Life Insurance), गोइबिबो (Goibibo) , सिएट टायर (Ceat Tyres), ह्यूब्लोट (Hublot), ऊषा (Usha), ओप्‍पो(Oppo), हाईलैंडर (Highlander), Dream 11, आदिदास (Adidas), निसान (Nissan) अशा वेगवेगळ्या 28 कंपन्यांच्या जाहिराती रोहित शर्मा करतो. Adidas या कंपनीसोबत 2013 पासून रोहित शर्मा जोडला गेला आहे. प्रत्येक ब्रँड डीलसाठी तो ५ कोटी रुपये घेतो.

 

Rohit Sharma चीस्थावर मालमत्ता:

रोहित शर्माचे राहते घर हे 30 कोटी रुपयांचे आहे. त्याचे 4BHK घर मुंबईतील वरळी भागातील आहुजा टॉवर्सच्या 29व्या मजल्यावर आहे. हे घर घेतल्यानंतर रोहित शर्मा खूपच चर्चेत आला होता. रोहितचे हे घर खूपच आलिशान आहे. याच घरात रोहित शर्माचे वास्तव्य असते. त्याच्याकडे हैदराबाद शहरात पाच कोटी रुपयांची एक हवेली आहे.

 

महागड्या गाड्या (Cars): Rohit Sharma ला कार कलेक्शनची देखील प्रचंड आवड आहे. त्याच्या ताफ्यात लॅम्बोर्गिनीपासून, बीएमडब्ल्यू (BMW) सारख्या महागड्या कार आहेत. रोहितडे असणाऱ्या लक्झरी कारपैकी सर्वात महाग कार लॅम्बोर्गिनी उरुस (Lamborghini Urus) ही आहे. या कारची किंमत तब्बल ५ कोटी रुपयांच्या घरात आहे. या कारचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ 3.33 सेकंदात किमी प्रति तासचा वेग घेऊ शकते. त्याच्याकडे बीएमडब्ल्यू (BMW M5) ही 1 कोटी 73 लाख रुपयांची कार आहे. तसेच मर्सिडीज (Mercedes GLS 400d) ही 1 कोटी 29 लाख रुपयांची कार रोहितकडे आहे. क्रिकेटरकडे बीएमडब्ल्यू (BMW X3), टोयोटो फोरचुनर, स्कोडा कंपनीची Skoda Laura ही कारदेखील आहे.

 

रोहित शर्माची गुंतवणूक: Rohit Sharma ने दोन कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. रॅपिडोबॉटिक्स आणि व्हेरुट्स वेलनेस सोल्यूशन्स या दोन कंपन्यांमध्ये त्याने 88 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. रॅपिडोबॉटिक्स ही रोबोटिक ऑटोमेशन सोल्यूशन्स क्षेत्रात काम करते तर व्हेरुट्स वेलनेस सोल्यूशन्स ही हेल्थकेअर कंपनी आहे. तर त्याने 7.6 कोटी रुपयांची गुंतवणूक स्टॉकमध्ये केली आहे.

हेही वाचा:IPL 2024: कागदावर 15 कोटी पण प्रत्यक्षात तीन आकडी संख्या; पाहा हार्दिक पांड्यासाठी मुंबईने किती आणि कशी रक्कम मोजली..

IND vs SA: या खेळाडूचे करिअर उध्वस्त व्हायला विराट कोहली जबाबदार; हर्षा भोगलेच्या ट्विटने खळबळ, कारणही सांगितलं..

Hardik Pandya injury concern: रोहित शर्मा पुन्हा मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी विराजमान? हार्दिक पांड्या T20 world Cup मधूनही बाहेर..

Chanakya Niti About Parenting : या 10 गोष्टींची काळजी पालकांनी घेतली पाहिजेच, अन्यथा होईल सत्यानाश

Raha pics: रणबीर आणि विराट कोहलीची लेक म्हणजे कार्बन कॉपी; पाहा दोन्ही फोटो..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.