Hardik Pandya injury concern: रोहित शर्मा पुन्हा मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी विराजमान? हार्दिक पांड्या T20 world Cup मधूनही बाहेर..
Hardik Pandya injury concern: एकीकडे आयपीएलचे (IPL) बिगुल वाजले असताना दुसरीकडे मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. अचानकपणे रोहित शर्माला (Rohit Sharma) हटवून हार्दिक पांड्याची (hardik Pandya) कर्णधारपदी नियुक्ती करणं आता मुंबई इंडियन्सला चांगलच महागात पडला आहे. नुकत्याच पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेत हार्दिक पांड्याच्या पायाला दुखापत झाली होती. या दुखापतीतून हार्दिक पांड्या अद्यापही सावरलेला नाही.
विश्वचषकामध्ये गोलंदाजी करताना हार्दिक पांड्याच्या घोट्याला दुखापत झाली होती. ही दुखापत आता गंभीर असल्याचं समोर आलं आहे. अफगाणिस्तान विरुद्धच्या टी-ट्वेंटी सिरीज मधूनही अधिकृतरीत्या हार्दिक पांड्या बाहेर पडला आहे. याबरोबरच आगामी आयपीएल स्पर्धपर्यंत देखील तो पूर्णपणे तंदुरुस्त होणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई इंडियन्स टीम मॅनेजमेंटने हार्दिक पांड्याची कर्णधारपदी निवड केली. ही त्यांच्यासाठी आता डोकेदुखी ठरली आहे. आयपीएलमध्ये हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व कोण करणार? हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे. रिपोर्टनुसार रोहित शर्माने मुंबई इंडियन्सच्या कर्णधार पदाची जबाबदारी सांभाळावी अशी विनवणी टीम मॅनेजमेंट कडून रोहित शर्माला करण्यात आली आहे. मात्र रोहित शर्माने यासाठी नकार दिल्याचं कळतंय.
जानेवारीमध्ये अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या t20 मालिकेतून हार्दिक पांड्या बाहेर झाला आहे. रिपोर्टनुसार आयपीएल पर्यंत देखील हार्दिक पांड्या पूर्णपणे तंदुरुस्त होणार नसल्याचं कळतंय. हार्दिक पांड्या आयपीएलमध्ये खेळू शकणार नसल्याने, तो आता वेस्टइंडीज मध्ये होणाऱ्या टीट्वेंटी विश्वचषक स्पर्धेतही नसण्याची शक्यता आहे. त्याचे कारण म्हणजे, आयपीएलमध्ये जर तो खेळणार नसेल, तर डायरेक्ट t20 मध्ये त्याचा फॉर्म कसा असेल विषयी मोठी चिंता असेल.
हार्दिक पांड्याच्या कर्णधार पदावरून मोठा गदारोळ झाला होता. रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्सचे चाहते देखील या निर्णयावर खुश नसल्याचं पहिला मिळालं होतं. अगदी मुंबई इंडियन्सचे खेळाडू देखील या निर्णयाविरोधात आपली नाराजी व्यक्त करताना दिसून आले होते.
आता पुन्हा एकदा रोहित शर्माला मुंबई इंडियन्स संघाचे कर्णधार पद भूषवण्याची संधी आहे. मात्र रोहित शर्मा तयार नसल्याची माहिती मिळाली आहे. हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघाचे कर्णधार पद भूषवणार का? हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम