Hardik Pandya vs Rohit Sharma: एअरपोर्टवर हार्दिक पांड्या दिसताच रोहितच्या नावाच्या घोषणा; चाहत्यांच्या त्या घोषणेमुळे पांड्याची पळताभुई..

0

Hardik Pandya vs Rohit Sharma: मुंबई इंडियन्सने (mumbai Indians) हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) कॅप्टनपदी निवड केल्यानंतर, रोहित शर्माचे (Rohit Sharma) चाहते प्रचंड नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधार पदावरून काढल्याने चाहते आपला राग देखील व्यक्त करताना दिसत आहेत. या निर्णयाचा परिणाम म्हणून मुंबई इंडियन्सच्या अनेक सोशल मीडिया अकाऊंट वरून तब्बल तीन मिलियन फॉलोवर्सही कमी झाले आहेत.

रोहित शर्माची कॅप्टन पदावरून हकालपट्टी झाल्यानंतर, मुंबई इंडियन्सवर रोहीत शर्माचे चाहते प्रचंड भडकले आहेत. केवळ चाहतेच नाही, तर खेळाडू देखील आपला राग व्यक्त करताना दिसून आले आहेत. हार्दिक पांड्याच्या निवडीवर एकाही खेळाडूला आनंद झाल्याचे पाहायला मिळत नाही. त्याचं कारण म्हणजे, हार्दिक पांड्याला कोणत्याच खेळाडूंनी शुभेच्छा दिल्या नाहीत. हार्दिक पांड्याला डिवचण्याची एकही संधी चाहते सोडताना दिसत नाहीत. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आपल्या आवडत्या खेळाडूंना सपोर्ट करण्यासाठी चाहते काहीही करू शकतात. सोशल मीडियावर वायरल झालेला व्हिडिओ पाहून तुमच्या हे लक्षातही येईल. वायरल झालेल्या व्हिडिओत हार्दिक पांड्या एअरपोर्टवर असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, हार्दिक पांड्या गाडीतून उतरल्यानंतर त्याच्या समोर रोहित शर्माच्या चाहत्यांनी “रोहित शर्मा मुंबईचा राजा” अशा घोषणा दिल्या.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ अनेकांनी शेअरही केला. या व्हिडिओत “रोहित शर्मा मुंबईचा राजा” या घोषणा सुरू असताना, हार्दिक पांड्याचा चेहराही पडलेला दिसत आहे. मात्र काही तासानंतर, हा व्हिडिओ जुना असल्याचं समोर आलं. अशा कोणत्याही घोषणा हार्दिक पांद्याच्या समोर दिल्या गेल्या नाहीत. व्हिडिओ फेक आणि एडिट केलेला आहे.

सोशल मीडियावर वायरल केला गेलेला हा व्हिडिओ अनेकांना खरा वाटला. त्याचे कारण म्हणजे, हा व्हिडिओ शेअर करण्याचा टाइमिंग. शर्माच्या चाहत्यांना मुंबई इंडियन्सने घेतलेला निर्णय आवडलेला नाही. त्यामुळे हार्दिक पांड्यावर रोहित शर्माचे चाहते आपला राग देखील व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल केला गेलेला व्हिडिओ अनेकांना खरा असल्याचे वाटत आहे. आणि म्हणून अनेकांनी हा शेअरही केला आहे.

हे देखील वाचा Mumbai Indians: IPL Auction मध्ये कमाल केल्याने, मुंबई विजेतेपदाची दावेदार; रोहितच्या जाण्यानेही नाही पडणार फरक, पाहा संघ..

Virat Kohli South Africa tour: त्या कारणासाठी विराट मालिका सोडून परतला भारतात; असा असेल आफ्रिकेविरूद्ध पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ..

Acharya Chanakya thought: या सात जणांना झोपेतून चुकूनही उठवू नका; सहावा आहे, फारच भानायक..

Flipkart Sale: 50MP कॅमेरा असलेला Motorola चा दमदार स्मार्टफोन मिळतोय केवळ 8,499 रुपयांत..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.