Acharya Chanakya thought: या सात जणांना झोपेतून चुकूनही उठवू नका; सहावा आहे, फारच भानायक..

0

आजही आचार्य चाणक्य (acharya chanakya) यांनी सांगितलेल्या नितीनुसार आपलं जीवन जगणाऱ्यांची संख्या पुष्कळ पहायला मिळते. चाणक्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं आहे. मनुष्याच्या जीवनावर देखील चाणक्य यांनी वेवस्थित मांडणी केली आहे. जर तुम्हाला देखील जीवनात यशस्वी व्हायचं असेल, आयुष्यामध्ये संकटे येऊ नये, असे वाटत असेल तर चाणक्यांनी सांगितलेल्या सात जीवांना चुकूनही उठवू नका.

आयुष्य जगत असताना आपल्या मित्रांपेक्षा आपला शत्रू कोण आहे, हे वेळीच ओळखणे फार आवश्यक असतं. ज्यांच्यापासून आपल्याला धोका आहे, अशा लोकांपासून नेहमी चार हात लांब राहण्याचा सल्ला अनेकजण देतात. चाणक्य यांनी देखील हेच सांगितलं आहे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर तुम्हाला कोणापासून धोका आहे हे ओळखणे आवश्यक असल्याचे चाणक्य सांगतात. तुम्ही चुकूनही उठवण्याचा प्रयत्न करू नका. जाणून घेऊ सविस्तर..

आचार्य चाणक्य म्हणतात, साप या प्राण्याला तुम्ही चुकूनही झोपेतून उठवण्याचा किंवा डिवचण्याचा प्रयत्न करू नका. साप हा विषारी आणि बदला घेणारा प्राणी आहे. त्यामुळे त्याच्या वाटेला तुम्ही जाण्याचा प्रयत्न करू नका. सिंह, बिबट्या या प्राण्यांना देखील तुम्ही झोपेतून उठवण्याचा आणि डिवचण्याचा प्रयत्न करू नका. या प्राण्यांना त्रास देणे तुमच्यासाठी धोकादायक आहे. हे प्राणी स्वतःहून कधीही तुमच्या वाटेला जात नाहीत. मात्र तुम्ही यांना झोपेतून उठवलं, तर हे प्राणी प्रचंड चिडतात.

जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल, तर मूर्ख लोकांना कधीही उठवण्याचा प्रयत्न करू नका. असं आचार्य चाणक्य सांगतात. मनुष्याने एकमेकांची मदत करण्यात काही गैर नाही. अनेकदा अनेकांची मदत घ्यावीच लागते. मात्र काही मूर्ख माणसं देखील समाजात असतात. त्यांना कधीही उपदेश देण्याचा किंवा जागं करण्याचा प्रयत्न करू नका. असे चाणक्य सांगतात. अशी लोकं तुमच्यासाठी प्रचंड धोकादायक असतात. अशा लोकांपासून चार हात लांब राहणं अधिक फायदेशीर ठरतं.

आचार्य चाणक्य सांगतात, लहान मूल जर झोपलेलं असेल, तर त्याला देखील उठवण्याचा प्रयत्न करू नका. लहान मुलांना बोलता येत नाही, समजतही नाही. त्यामुळे विनाकारण त्यांना त्रास देणं योग्य नसल्याचे चाणक्य सांगतात. आचार्य चाणक्य सांगतात, दुसऱ्याचा कुत्रा झोपला असेल तरीदेखील त्याला उठवण्याचा प्रयत्न करू नका. कुत्र्याची झोप मोड झाल्यानंतर तोही प्रचंड संतापतो. खास करून इतरांचा पुत्र असेल, तर तो तुम्हाला फारसं महत्त्वही देणार नाही. त्यामुळे त्याच्यापासून इजा होण्याची शक्यता असते.

हे देखील वाचा malaika arora Viral video: तो फोटो काढायला आला, अन् थेट मलायकाच्या कंबरेतच हात घातला; पाहा खतरनाक व्हिडिओ..

Rohit Sharma In CSK: दिल्लीच्या पदरी निराशा! रोहित आता चेन्नई कडून खेळणार? चेन्नईकडून खुलासा..

Mumbai Indians: IPL Auction मध्ये कमाल केल्याने, मुंबई विजेतेपदाची दावेदार; रोहितच्या जाण्यानेही नाही पडणार फरक, पाहा संघ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.