Mumbai Indians: IPL Auction मध्ये कमाल केल्याने, मुंबई विजेतेपदाची दावेदार; रोहितच्या जाण्यानेही नाही पडणार फरक, पाहा संघ..

0

Mumbai Indians: आयपीएल 2024 लिलाव (IPL auction 2024) प्रक्रिया काल पार पडली. आतापर्यंत आयपीएलच्या लिलावामध्ये हा सर्वाधिक चर्चेत आणि विक्रम करणारा लिलाव राहिला. आयपीएल 2024 च्या लिलावामध्ये ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मलामाल झाले. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूने अक्षरशः आयपीएलला लुटून नेले. पॅट कमिन्स (Pat Cummins) ट्रॅव्हिस हेड (Travis Head) मिचेल स्टार्क (Mitchell Starc) या तिघांना 52 कोटीहून अधिक रक्कम मिळाली. मात्र यांच्या खरेदी पेक्षाही अधिक चर्चा मुंबई इंडियन्सने या लिलावामध्ये केलेल्या खरेदीची झाली.

मैदानात, मैदानाबाहेर आणि लिलाव प्रक्रियेमध्ये देखील मुंबई इंडियन्स पूर्णपणे तयारीने उतरते. असं बोललं जातं. गेल्या अनेक वर्षात निकालामध्ये हे दिसून देखील आलं आहे. 2024 च्या आयपीएल लिलावामध्ये देखील मुंबई इंडियन्सने अत्यंत चतुराईने खेळाडूंची खरेदी केली. आणि या आयपीएलमध्ये इतर संघांच्या तुलनेत आपला संघ तुल्यबळ आणि समतोल उभा केला.

एकीकडे मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, या दोन खेळाडूंना खरेदी करण्यासाठी तब्बल 45 कोटीहून अधिक रक्कम मोजावी लागली. दुसरीकडे मुंबई इंडियन्सने मात्र एका खेळाडूच्या रकमेहून कमी किमतीमध्ये अनेक स्मार्ट खेळाडू खरेदी केले. मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मा खेळू इच्छित नसल्याची माहिती आहे. हे खरं असलं तरी आता रोहित शर्मा गेला तरी मुंबईला फारसा फरक पडणार नाही. जाणून घेऊ, मुंबईने केलेली खरेदी आणि संपूर्ण संघ..

गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाकडे सर्वाधिक रक्कम होती. या दोन्ही संघांनी मिचल स्टार्कला खरेदी करण्यासाठी आपले पैसे राखून ठेवले होते. स्टार्कला आपल्याला खरेदी करता येणार नाही, हे लक्षात आल्यानंतर मुंबई इंडियन्सने स्मार्टपणे आपली पुढील रणनीती आपली. आणि श्रीलंकेचा गोलंदाज दिलशान मधुशंका अवघ्या 4 कोटी 60 लाख रुपयांना खरेदी केला.

नुवान तुषारा हा आणखी एक श्रीलंकन गोलंदाज मुंबईने केवळ चार कोटी 80 लाख रुपयांमध्ये खरेदी केला. दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जेराल्ड कोएत्झी याला देखील फक्त 5 कोटीमध्ये खरेदी केले. अफगाणिस्तान संघाचा ऑलराऊंडर मोहम्मद नबीलाही मुंबईने केवळ एक कोटी 50 लाख रुपयांना खरेदी केले.

संपूर्ण टीम; रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस,तिलक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला, आकाश मधवाल, जेसन बेहरेनडॉर्फ, रोमा, रोहित ब्रेव्हिस. हार्दिक पांड्या (कॅप्टन), जेराल्ड कोएत्झी, दिलशान मदुशंका, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमन धीर, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा. अर्जुन तेंडुलकर,

हे देखील वाचा IPL 2024 captain: मुंबईसह चार संघाच्या कर्णधार पदामध्ये मोठा उलटफेर; जाणून घ्या दहाही संघाचे कर्णधार..

Rohit Sharma left MI: अखेर रोहितचं ठरलं! रोहीत शर्मासाठी या दोन संघांनी पैसे ठेवले राखून; या पद्धतीने होणार डील..

Pat Cummins Travis Head: रचिन रवींद्र, ट्रॅव्हिस हेड, डॅरिल मिशेल, पॅट कमिन्सची रेकॉर्ड ब्रेक खरेदी; पाहा कोण कुठे गेलं..

abram aaradhya Viral video: ऐश्वर्याच्या मुलीची शाहरुख खानच्या मुलाला मारली कडकडून मिठी; पाहा तो व्हायरल व्हिडिओ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.