IPL 2024 captain: मुंबईसह चार संघाच्या कर्णधार पदामध्ये मोठा उलटफेर; जाणून घ्या दहाही संघाचे कर्णधार..

0

IPL 2024 captain: भारतीय क्रिकेट (Indian cricket) चाहत्यांना आता आयपीएलचे (IPL) वेध लागले आहेत. आज आयपीएल २०२४ चा मिनी लिलाव (IPL 2024 auction) प्रक्रिया पार पार पडत आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने अनपेक्षित कर्णधार पदामध्ये बदल केल्याने, चाहत्यांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळत आहे. रोहित शर्माला (Rohit Sharma) कर्णधार पदावून काढून टाकल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडिया का देखील दोनहून अधिक मिलियन फॉलोवर्सही कमी झाले आहेत. मुंबई इंडियन्स बरोबर आयपीएलच्या इतर संघाने देखील आपल्या कर्णधार पदामध्ये बदल केले आहेत. जाणून घेऊया दहाही संघाचे कर्णधार..

IPL २०२४ च्या हंगामात क्रिकेट चाहत्यांना अनेक संघाचे काही नवीन कर्णधार पाहायला मिळणार आहेत. मुंबई इंडियन्सने पुढील हंगामामध्ये आपल्या कर्णधार पदाची घोषणा उशीर केली. यापुढे हार्दिक पांड्या (Hardik Pandya) हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार असेल. यापूर्वी हार्दिक पांड्या गुजरात टायटन (gujrat Titans) संघाचा कर्णधार होता. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर गुजरात संघाने शुभमन गिलची निवड केली आहे. शुभमन गिल (shubman gill) पुढील हंगागा पासून गुजरात संघाचा नवा कर्णधार असेल.

यावर्षी झालेल्या आयपीएलमध्ये महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) पुन्हा एकदा आपल्या कॅप्टनसीची जादू दाखवली. चेन्नई सुपर किंगने धोनीच्या नेतृत्वाखाली एकूण पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. महेंद्रसिंग धोनीने यावर्षीही आयपीएल ट्रॉफी जिंकली. अनेकांना वाटलं फायनल जिंकल्यानंतर महेंद्रसिंग धोनी आयपीएलमधून देखील निवृत्ती घेईल. मात्र यावर्षी देखील महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग संघाचा कर्णधार असणार आहे.

यावर्षी झालेल्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स (Delhi capitals)आणि कोलकत्ता नाईट रायडर्स (Kolkata knight riders) या दोन संघांना आपल्या पारंपरिक कर्णधारा शिवाय आयपीएल सीझन खेळावा लागला होता. आता या दोन्ही संघांना आपापले कर्णधार मिळाले आहेत. अपघातानंतर, ऋषभ पंतही खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. दिल्लीने त्याला आपल्या संघाचा कर्णधार म्हणून घोषित केले आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाने देखील श्रेयस अय्यरला पुन्हा कर्णधार पदाची जबाबदारी दिली आहे.

उर्वरित सहा संघांनी मात्र आपल्या कर्णधारामध्ये कोणताही बदल केला नाही. यावर्षी झालेल्या आयपीएलमध्ये संघाची जबाबदारी ज्या खेळाडूंवर सोपवली होती, त्यांचीच पुन्हा कर्णधार पदावर नियुक्ती केली आहे. यावर्षीही पंजाब किंग्ज संघाचा कर्णधार शिखर धवन हाच असेल, लखनऊ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार केएल राहुल, राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसन, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिस, सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार ऍडेन मार्करम हेच असतील.

हे देखील वाचा IPL auction Live: IPL auction इतिहासात पहिल्यांदाच कर्णधार राहणार उपस्थित; जाणून घ्या कोणते कर्णधार आहेत लिलावाचा भाग..

abram aaradhya Viral video: ऐश्वर्याच्या मुलीची शाहरुख खानच्या मुलाला मारली कडकडून मिठी; पाहा तो व्हायरल व्हिडिओ..

Rohit Sharma vs MI: हार्दिक पांड्या, मुंबई इंडियन्सला BCCI ची चपराक; रोहित शर्मावर घेतला हा मोठा निर्णय..

Mumbai Indians: बुमराह नंतर सूर्यकुमार यादवचाही मुंबई इंडियन्सला दणका; पाहा नेमकं काय घडलं..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.