Rohit Sharma vs MI: हार्दिक पांड्या, मुंबई इंडियन्सला BCCI ची चपराक; रोहित शर्मावर घेतला हा मोठा निर्णय..

0

Rohit Sharma vs MI: हार्दिक पांड्या (Hardik Pandya) मुंबई इंडियन्समध्ये (mumbai Indians) परतल्यापासून रोहित शर्माच्या (Rohit Sharma) चाहत्यांसाठी काही चांगल्या बातम्या येताना दिसत नव्हत्या. मात्र रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी आता आनंदाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार म्हणून घोषित करण्यात आल्याने, रोहित शर्मा यावर्षी हार्दिक पांड्याच्याच नेतृत्वातच खेळणार आहे. हे आता जवळपास निश्चित झालं आहे.

उद्या आयपीएल 2024 चा लिलाव पार पडणार आहे. या लिलावानंतर ट्रेड प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे. आयपीएलच्या दोन फ्रेंचाइजींना खेळाडूंची देवाणघेवाण करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे शर्माला मुंबई सोडून इतर संघात जाता येण्याची संधी आहे. मात्र या प्रक्रियेसाठी मुंबई इंडियन्सची देखील सहमती आवश्यक आहे. मुंबई इंडियन्सच्या सहमती शिवाय रोहित शर्माला कुठेही जाता येणार नाही.

पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये रोहित शर्माला हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळावं लागणार आहे. रोहित शर्मा कुठल्याही आयपीएल संघाचा कर्णधार नसल्याने t20 विश्वचषकात हार्दिक पांड्या हाच भारतीय संघाचा कर्णधार असेल, असं बोललं जात होतं. मात्र बीसीसीआयने हार्दिक पांड्याच्या मनसुब्यावर पाणी फिरवलं आहे. हार्दिक पांड्या ऐवजी रोहित शर्मा हाच आगामी टी ट्वेंटी वर्ल्डकप संघाच्या कर्णधार पदासाठी BCCI ची पहिली पसंती असल्याची माहिती आहे.

2022 मध्ये झालेल्या टी ट्वेंटी वर्ल्डकप पासून भारतीय सीनियर खेळाडूंना t20 संघाचा भाग बनवण्यात आले नाही. रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल 2022 पासून एकही t20 सामना खेळले नाहीत. 2022 पासून भारतीय संघाने अनेक टी-ट्वेंटी मालिका खेळल्या. या मालिकांमध्ये हार्दिक पांड्याने भारतीय संघाचे नेतृत्व केले. २०२४ मध्ये होणाऱ्या t20 वर्ल्ड कपची तयारी म्हणून हार्दिक पांड्याला संघाची धुरा देण्यात आल्याचंही सांगण्यात आले.

आता मात्र रोहित शर्मालाच BCCI ने ट्वेंटी संघाच्या कर्णधार पदासाठी पहिली पसंती दिल्याची माहिती आहे. BCCI च्या या निर्णयामुळे हार्दिक पांड्याचे मनसुबे एक प्रकारचे उधळले गेले असल्याचेही बोलले जाऊ लागले आहे. जर रोहित शर्माकडे टी ट्वेंटी संघाची धुरा देण्यात आली, तर t20 संघात विराट कोहलीला देखील संधी दिली जाईल. त्यामुळे BCCI चा हा निर्णय विराट कोहलीच्या चाहत्यांसाठी देखील आनंददायी ठरणार आहे.

हे देखील वाचा Dawood Ibrahim: अखेर दाऊद इब्राहिमचा विष देऊन खात्मा? कोणी दिले विष? कसा झाला मृत्यु? वाचा सविस्तर..

IPL auction 2024 Live: उद्या ठरणार रोहित शर्माचं भवितव्य; जाणून घ्या या तीन शक्यता..

Hardik Pandya MI captain: मुंबई इंडियन्स नंतर हार्दिक पांड्या भारताच्या T20 संघाचाही कर्णधार; रोहीतच्या वाढल्या या तीन अडचणी..

mental health: ही चार लक्षणे सांगतात तुम्ही आतुन तुटलेले, अन् केवळ बाहेरूनच आहात आनंदी..

SJVN Limited Recruitment 2023: SJVN मध्ये या उमेदवारांसाठी विविध पदांच्या 400 जागांची भरती.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.