IPL auction 2024 Live: उद्या ठरणार रोहित शर्माचं भवितव्य; जाणून घ्या या तीन शक्यता..

0

IPL auction 2024 Live: आयपीएल 2024 (ipl 2024) स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच कमालीची चर्चेत आली आहे. हार्दिक पांड्या (Hardik Pandya)मुंबई इंडियन्समध्ये (mumbai Indians) परतल्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, आणि मुंबई इंडियन्स ट्रेडिंगवर असल्याचं पाहायला मिळत आहे. हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला असला तरी मुंबई इंडियन संघातील खेळाडूंना या निर्णयाचा आनंद झालेला दिसत नाही, अगदी हार्दिक पांड्याला कर्णधार घोषित केल्यानंतरही मुंबईच्या काही खेळाडूंनी त्याला शुभेच्छा दिल्या नाहीत.

हार्दिक पांड्याची कर्णधारपदी निवड केल्यानंतर, त्याला मुंबईच्या कोणत्याही खेळाडूने शुभेच्छा दिल्या नाहीत. याउलट कर्णधार निवडी नंतर संघातील काही खेळाडूंनी नाराजी देखील व्यक्त केली. सूर्यकुमार यादवने आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून तुटलेल्या हृदयाचा इमोजी पोस्ट केल्याने मुंबई इंडियन संघात सगळं काही अलबेल नाही, हे स्पष्ट झाल

केवळ संघातील खेळाडूच नाही, तर रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह (ritika sajdeh) हीने देखील हार्दिक पांड्याच्या कर्णधार निवडीवर आपली नाराजी बोलून दाखवली आहे. स्पष्ट शब्दात तिने आपली नाराजी बोलून दाखवली नसली, तरी अप्रत्यक्ष मुंबई इंडियन्सचा हा निर्णय आपल्याला पटला नसल्याचं, चेन्नईने रोहित शर्माला मानवंदना दिलेले व्हिडिओ खाली कमेंट करून दाखवून दिले.

रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघाकडून आता खेळण्यासाठी इच्छुक नसून, तो ट्रेड होण्यासाठी सज्ज देखील झाला असल्याची माहिती आहे. उद्या आयपीएल 2024 चा लिलाव दुबईत पार पडणार आहे. या लिलावात कोणता खेळाडू कोणत्या संघासोबत करारबद्ध होणार, हे स्पष्ट होणार असलं तरी सगळ्यांच्या नजरा रोहित शर्मा कुठून खेळणार यावर खिळल्या आहेत.

रोहित शर्माला मुंबई इंडियन्स शिवाय इतर संघात जाण्याची अजूनही संधी आहे. मात्र केवळ रोहित शर्माच्या म्हणण्यानुसार निर्णय घेतला जाणार नाही. शर्माच्या इच्छेबरोबर मुंबई इंडियन्स फ्रेंचाइजीची देखील सहमती आवश्यक आहे. अजूनही रोहित शर्माला ट्रेड होता येणार आहे. दिल्ली कॅपिटल्स रोहित शर्माला ट्रेड करण्यास इच्छुकही आहे. अगदी कर्णधार पदाची ऑफेही दिली आहे.

दिल्ली कॅपिटल्स रोहित शर्माला कर्णधारपद देण्यास तयार असली तरी, मुंबई इंडियन्सने मात्र रोहित शर्माचा ट्रेड करण्यास नकार दिला तर नाईलाजाने रोहित शर्माला मुंबई इंडियन्स मधूनच खेळावं लागणार आहे. रोहित शर्माकडे आयपीएलमध्ये कोणत्याही संघाचे कर्णधारपद नसल्याने, तो आता आगामी टी ट्वेंटी वर्ल्ड (t20 world Cup) कपमध्ये देखील भारतीय संघात खेळताना पाहायला मिळणार नाही.

हे देखील वाचा mental health: ही चार लक्षणे सांगतात तुम्ही आतुन तुटलेले, अन् केवळ बाहेरूनच आहात आनंदी..

Hardik Pandya MI captain: मुंबई इंडियन्स नंतर हार्दिक पांड्या भारताच्या T20 संघाचाही कर्णधार; रोहीतच्या वाढल्या या तीन अडचणी..

Maratha Reservation: भुजबळ नौटंकी करून समाजात तेढ निर्माण करत आहेत? हे कृत्य करण्यासाठी सरकारचाही पाठिंबा..

Age for Marriage: या गोष्टी टाळण्यासाठी आणि नातं दीर्घकाळ टिकण्यासाठी याच वयात लग्न करणं आवश्यक; संशोधनातून धक्कादायक माहिती समोर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.