mental health: ही चार लक्षणे सांगतात तुम्ही आतुन तुटलेले, अन् केवळ बाहेरूनच आहात आनंदी..

0

mental health: जीवनामध्ये आनंदाचे मोल होऊ शकत नाही. हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. तुम्ही आनंदी असाल, तर जगात कुठेही गेला तरी तुम्ही तुमचं वेगळं अस्तित्व निर्माण करू शकता. मात्र नेहमी आनंदी राहणं, इतकही सोपं नाही. जीवन जगत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. साहजिकच त्यामुळे निराशा पावलोपावली भेटत असते. त्यातून नैराश्य देखील येते. मात्र या सगळ्यांचा सामना करून तुम्हाला पुढे जावे लागते.

जीवनामध्ये अनेकांना अनेक अडचणी असतात. अनेकांच्या आयुष्यात मोठ्या प्रमाणात दुःख देखील असते. मात्र काही लोकांच्या जीवनात प्रचंड दुःख असून देखील बाहेरून आपण प्रचंड आनंदी असल्याचा दिखावा देखील करतात. अनेकदा अनेकांना आपण प्रचंड दुःखी आहोत, त्याची कल्पना नसते. मात्र काही गोष्टींकडे गांभीर्याने पाहिले, तर तुम्हाला दुःखाची उकल होऊ शकते. जाणून घेऊया अधिक.

जर तुम्ही तुमच्या आणि इतरांच्या भावनांना बगल देत असाल, इतरांचे दुःख काय आहे हे जाणून घेत तुम्ही केवळ आनंदी राहण्याचा सल्ला देत असाल, तर समजून जा, तुम्ही आतुन दुःखी आणि बाहेरून केवळ आनंद दाखवण्याचा प्रयत्न करत आहात.

कोणत्याही दुःखातून अडचणीतून बाहेर येण्यासाठी तुम्हाला त्यावर मात करावी लागते. त्यावर उपाय शोधावा लागतो. जी माणसं दुःख, अडचणींकडे दुर्लक्ष करतात. अशी माणसं आतून दुखी असतात. जर तुम्ही सगळं काही ठीक होईल, असा सल्ला इतरांना देत असाल, तर तुम्ही आतुन दुःखी आहात.

जी माणसं दुःखी असतात, आणि ज्यांना दुःखी असण्याची लाज वाटते, अशी माणसं इतरांना त्यांच्या दुःखावरून चिडवतात. ज्यांना आपले दुःख इतरांना सांगायची लाज वाटते, अशा माणसांची नकारात्मकता विषारी असते. आपण जर नकारात्मक असू, आणि केवळ इतरांना आनंदी दाखवण्यासाठी प्रयत्न करत असू, तर हे किंचितही सकारात्मक नाही, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

हे देखील वाचा SJVN Limited Recruitment 2023: SJVN मध्ये या उमेदवारांसाठी विविध पदांच्या 400 जागांची भरती.

IPL auction 2024: दिल्ली कॅपिटल्सने रोहीत शर्माला दिली कॅप्टन पदाची ऑफर; पत्नी रितिकाची कमेंटही चर्चेत..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.